वजन कमी करण्यासाठी हे आहेत सुपरफूड्स

तब्येत पाणी
Updated Nov 23, 2020 | 18:26 IST | टाइम्स नाऊ मराठी वृत्तसेवा

Weight loss: तुमचे वजन वाढवणारे आणि तुम्हाला आजारी पाडणारे जेवण ज्याला फास्टफूड म्हणतात ते तुम्हाला कुठेही मिळेल. मात्र आरोग्यासाठी पोषक असे प्रोटीनयुक्त खाणे ओळखणे कठीण असते. 

weight loss
वजन कमी करण्यासाठी हे आहेत सुपरफूड्स 

थोडं पण कामाचं

  • जन कमी करायचे असेल तर तुम्हाला गायीच्या दुधापासून बनलेले लो फॅट पनीर खाल्ले पाहिजे
  • क्विनोआमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असतात ज्यामुळे भूक शांत होते.
  • दुधामध्ये प्रोटीनशिवाय मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असते

मुंबई: वजन कमी करण्यासाठी(weight loss) जेव्हा तुम्ही फॅट्सवरून कार्ब्स(carbs) आणि प्रोटीनवर(protein) येता तेव्हा सगळ्यात मोठी समस्या असते की काय खावे. कारण तुम्हाला लठ्ठ बनवणारे आणि तुम्हाला आजारी पाडणारे जेवण म्हणजेच फास्ट फूडही कुठेही सहज मिळेल मात्र शरीरास निरोगी बनवणारे आणि प्रोटीनने भरलेले खाणे ओळखणे कठीण असते. शरीराच्या विकासमध्ये प्रोटीन महत्त्वाची भूमिका बजावतात. ब्लड सेल्स बनवण्यासाठी प्रोटीन डाएट घेणे महत्त्वाचे असते. 

लो फॅट पनीर

प्रत्येक घरामध्ये पनीर खूप आवडीने खाल्ले जाते. प्रत्येक वयाचे लोक पनीर आवडीने खातात. पनीरमुळे शरीराला प्रोटीन मिळतात. तुम्ही कोणत्या दुधाचा वापर पनीर बनवण्यासाठी करता यावर त्यात किती प्रोटीन आणि कॅलरीज आहेत हे ठरते. जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर तुम्हाला गायीच्या दुधापासून बनलेले लो फॅट पनीर खाल्ले पाहिजे. पनीरमध्ये Conjugated Linoleic Acidअसते . हे एक प्रकारचे फॅटी अॅसिड आहे ज्यामुळे शरीरातील चरबी घटवण्यास मदत होते. 

क्विनोआ

गेल्या काही काळापासून क्विनोआची लोकप्रियता खूप वाढली आहे. क्विनोआची विशेष गोष्ट म्हणजे हे ग्लुटेन फ्री ाहे यासोबतच यात हाय प्रोटीन डाएट आहे.य. यात सर्व ९ अमिनो अॅसिड असतात. पोषणतत्वांनी भरपूर असलेल्या क्विनोओमध्ये फायबर आणि लो ग्लिसमिक इंडेक्स ब्लड शुगर लेव्हल कंट्रोल होण्यास मदत होते. क्विनोआमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असतात ज्यामुळे भूक शांत होते. जर तुम्हाला वजन घटवायचे असेल तर तुमच्या डाएटमध्ये लवकरात लवकर क्विनोआचा समावेश करा. 

डाळ आणि कडधान्ये

डाळीशिवाय भारतीय जेवणाची थाळी अपुरी आहे. मूग, हरभरे,राजमा आणि छोले ही कडधान्ये प्रोटीनचा चांगला स्त्रोत आहे. या डाळी शरीराला फायबर, फोलेट आणि झिंकचे पोषणही देतात. तसेच डाळ व्हेजिटेरियन आणि जिम जाणाऱ्या लोकांसाठी परफेक्ट मील आहे. दरम्यान, डाळी आणि कडधान्ये शिजवताना कमीत कमी तेलाचा वापर करा. 

ड्रायफ्रुट्स

सकाळची सुरूवात ड्रायफ्रुटने करा. बदाम आणि अक्रोडमध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन आणि फायबर्स असतात यातील मॅग्नेशियम, व्हिटामिन ई आणि हेल्दी फ्रट्स फ्री रेडिकल्सपासून सुरक्षा करतात. 

दूध

दूध ही प्रोटीनचा चांगला स्त्रोत आहे. दुधामध्ये प्रोटीनशिवाय मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असते. हे कॅल्शियम हाडांसाठी उपयुक्त असते. जर तुम्हाला वजन घटवायचे आहे तर लो फॅट दुधाचा वापर करा. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी