Tips: नितळ त्वचा आणि घनदाट केस हवेत तर प्या हे ५ प्रकारचे ज्यूस

तब्येत पाणी
Updated Apr 29, 2022 | 12:27 IST | टाइम्स नाऊ मराठी

केस आणि त्वचेला हेल्दी बनवण्यासाठी तुम्ही विविध प्रकारच्या ज्यूसचे सेवन करू शकता. यामुळे आरोग्यास पूर्ण फायदे मिळतात. 

skin care
नितळ त्वचा आणि घनदाट केस हवेत तर प्या हे ५ प्रकारचे ज्यूस 
थोडं पण कामाचं
  • चिया सीड्स, तीळ, सूर्यफुलाच्या बिया याशिवाय भोपळ्याच्या बियाही हेल्दी स्किनसाठी फायदेशीर आहेत.
  • पालक ही हिरवी पालेभाजी आहे. यात अनेक पोषकतत्वे असतात. यात व्हिटामिन ए, व्हिटामिन सी आणि लोह मोठ्या प्रमाणात असते.
  • डाळिंब त्वचेच्या सुंदरतेसाठी अतिशय फायदेशीर असते.

मुंबई: प्रत्येकाला आपली त्वचा(skin) ही नेहमी सुंदर आणि तजेलदार हवी असते. सोबतच चमकदार आणि मऊ केस(hair) तुमची सुंदरता आणखीन वाढवतात. अशातच असे अनेक प्रॉडक्ट बाजारात आहेत ज्यांच्या वापराने केसांची गळती होते तसेच त्वचेचा पोतही बिघडतो. अशातच तुम्हाला जर आकर्षक आणि तजेलदार त्वचा हवी असेल तर नैसर्गिक गोष्टींचा(natural things) वापर करणे गरजेचे असते. आरोग्यदायी त्वचा आणि घनदाट केस मिळवण्यासाठी तुम्ही अनेक पद्धतीच्या ज्यूसचा वापर करू शकता. यामुळे उन्हाळ्यात तुमची त्वचा हायड्रेट होईल तसेच सुंदरही दिसेल. यात तुम्ही मध, पालक, डाळिंब या फळांचा तसेच भाज्यांचा वापर करू शकता. यामुळे नैसर्गिक पद्धतीने तुमचे केस आणि त्वचा सुंदर करेल. यात व्हिटामिन्स, अँटी ऑक्सिडंट तसेच खनिजे मोठ्या प्रमाणात असतात. This 5 types of juice will give you good skin and hair

अधिक वाचा - या तारखेला जन्मलेली लोक खूप लकी असतात

त्वचा आणि केसांसाठी ज्यूसचे फायदे

पालक 

पालक ही हिरवी पालेभाजी आहे. यात अनेक पोषकतत्वे असतात. यात व्हिटामिन ए, व्हिटामिन सी आणि लोह मोठ्या प्रमाणात असते. यामुळे तुमची स्किन ग्लो होते तसेच चिरतरूण राहते. सोबतच केसही मजबूत होतात. यासाठी तुम्ही मूठभर पालक घेऊन त्याचा ज्यूस बनवू शकता. हवं असल्यास तुम्ही यात आणखीही काही भाज्या मिसळू शकता. यामुळे ज्यूसचा स्वादही वाढेल आणि हे फायदेशीर ठरेल. 

बियांचे मिश्रण

आपल्या डाएटमध्ये अनेक प्रकारच्या बियांचा समावेश असतो. जसे चिया सीड्स, तीळ, सूर्यफुलाच्या बिया याशिवाय भोपळ्याच्या बियाही हेल्दी स्किनसाठी फायदेशीर आहेत. या बियांमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर, ओमेगा ३ फॅटी अॅसिड, कॅल्शियम, आर्यन आणि झिंक असते. यामुळे स्किनला नैसर्गिक ग्लो मिळतो. तसेच चेहऱ्यावर गरजेचे फॅट टिकवून ठेवते ज्यामुळे त्वचेवर सुरकुत्या येत नाहीत. यामुळे ग्लायसेमिक इंडेक्स कमी होतो. तसेच पिंपल्सचीही समस्या दूर होते. 

डाळिंब

डाळिंब त्वचेच्या सुंदरतेसाठी अतिशय फायदेशीर असते. यात अँटी ऑक्सिडंट आणि प्युनिक अॅसिड असते जे त्वचेवरची सूज कमी करण्यास मदत होते. तसेच पिंपल्स आणि त्वचेची सूजही रोखते. यामुळे त्वचेला नैसर्गिक चमक येते आणि केसही सुंदर होतात. यासाठी तुम्ही डाळिंब सोलून त्याचा ज्यूस बनवू शकता. यामुळे खूप फायदे होतात. 

आंबट फळे

आंबट फळे त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर असतात. यामुळे इम्युनिटी सिस्टीम मजबूत होते. याशिवाय आंबट फळांमध्ये व्हिटामिन सी आणि अँटी ऑक्सिडंट मोठ्या प्रमाणात असतात जे त्वचेसंबंधित समस्या दूर करतात. यामुळे त्वचेवर पिंपल्स आणि काळे डाग होत नाहीत. केसही पातळ होण्यापासून वाचवतात. तुम्ही मोसमी आणि गोड लिंबाचा ज्यूसही आपल्या स्किन आणि हेअरकेअरमध्ये सामील करू शकता. 

अधिक वाचा - डोळा मारणाऱ्या प्रिया प्रकाशने आता केले बोल्ड फोटोशूट

मध

मध एखाद्या पेयाला वेगळाच स्वाद देतात. मधामुळे केवळ ज्यूस गोडच बनत नाही तर यामुळे पाचनतंत्रही सुधारते. सोबतच यात अनेक इन्फ्लामेंट्री आणि अँटी बॅक्टेरियल गुण असतात जे स्किनसाठी फायदेशीर ठरतात. सोबतच केसांना एक वेगळीच चमक देतात. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी