Ayurvedic medicine to reduce Cholesterol level: सध्याच्या काळात आरोग्याची काळजी घेणं खूपच गरजेचं आहे. कोलेस्ट्रॉल हा एक मेणासारखा पदार्त आहे जो रक्तवाहिन्यांमध्ये जमा होतो आणि रक्तवाहिन्या ब्लॉक करतो. परिणामी रक्तप्रवाह होण्यास अडथळा निर्णा होतो. अशा परिस्थितीत हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक, हृदयाच्या संबंधित इतर समस्या उद्भवण्याची दाट शक्यता असते.
कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठी अनेकजण दिवस-रात्र विविध औषधे घेतात. पण तज्ज्ञांच्या मते, योग्य आहार आणि व्यायाम यामुळे कोलेस्ट्रॉल कमी करता येऊ शकते. तुम्हाला 30 दिवसांत कोलेस्ट्रॉल कमी करायचं असेल तर तुम्ही आयुर्वेदिक औषधांचा उपयोग करु शकता.
हे पण वाचा : उन्हाळ्यात माठातले पाणी पिण्याचे अद्भूत फायदे
डॉक्टरांच्या मते, कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी अनेकजण स्टॅटिन सारखी औषधे घेतात. कोलेस्ट्रॉल कमी करण्याचा हा एक उपाय आहे. मात्र, याच्या तुलनेत आयुर्वेदिक उपचार उत्तम असल्याचं मानलं जातं. कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी खाण्या-पिण्याच्या सवयींकडे लक्ष देणे आवश्यक आहे. मालिश, योगासने, श्वासोच्छवास तंत्र, जीवनशैलीत बदल, व्यायाम, हीट थेरपी, एनीमा आणि हर्बल सप्लीमेंट यांचा समावेश आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आयुर्वेदिक उपचारांचे कोणतेही साईड इफेक्ट्स, दुष्परिणाम नाहीयेत.
हे पण वाचा : हे शाकाहारी पदार्थ तुमचे मसल्स बनवतील बळकट
हरितकी
शिलाजीत
अर्जुन पावडर
त्रिफळा
अश्वगंधा
हे पण वाचा : हात-पाय सुन्न होणे गंभीर आजाराचे लक्षण?
डॉक्टरांच्या मते, 3 आठवड्यांपर्यंत दिवसातून दोनवेळा 5 ग्रॅम अर्जुन पावडर घेतल्याने एचडीएल (चांगले) कोलेस्ट्रॉल वाढते आणि एलडीएल (खराब) कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते.
त्रिफळा चूर्ण आवळा आणि हरितकीच्या मिश्रणापासून बनवले जाते. दिवसातून एकदा 3 ग्रॅम ही पावडर घेतल्याने वाईट कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते.
हे पण वाचा : धूम्रपान करणे डोळ्यांसाठीही धोक्याचे
ही आयुर्वैदिक औषधी वनस्पती कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी फायदेशीर ठरू शकते. डॉक्टरांच्या मते दररोज 2 ग्रॅमपर्यंत वेगवेगळे डोस घेतल्याने खराब कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते.
जेवणानंतर दररोज 1.5 ग्रॅम हरितकी पावडर घेऊ शकता. खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आणि हृदय निरोगी ठेवण्यासाठी हे एक उत्तम औषध आहे.
हे पण वाचा : दूध प्यायल्याने कॅन्सर होऊ शकतो?
वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी 300 ते 500 मिलिग्रॅम शिलाजीत घेणे चांगले ठरेल असे डॉक्टरांचे मत आहे.
(Disclaimer: हा मजकूर इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे लिहिण्यात आलेला आहे. ही माहिती वैद्यकीय सल्ला म्हणून घेऊ नका. या संदर्भात आपल्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.)