Diabetes Treatment : या आयुर्वेदिक उपचाराने 30 मिनिटांत नियंत्रणात येईल 'शुगर', मधुमेह होईल दूर

तब्येत पाणी
Updated Mar 31, 2023 | 17:49 IST | टाइम्स नाऊ मराठी

Diabetes Ayurvedic Treatment आयुर्वेदात मधुमेहावर एक उत्कृष्ट उपाय सांगितलेला आहे. तो उत्कृष्ट उपाय म्हणजे कारले! कारले खाल्ल्यानंतर अवघ्या 30 मिनिटांमध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होते, असे संशोधकांचे मत आहे. ते कसे? हे आपण जाणून घेऊयात.

मधुमेहावरील या आयुर्वेदिक उपायाचे नाव आहे कारले
झटक्यात कमी होते ब्लड शुगर  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • आयुर्वेदात मधुमेहावर एक उत्कृष्ट उपाय सांगितलेला आहे.
  • कारले खाल्ल्यानंतर अवघ्या ३० मिनिटांमध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होते
  • हाय शुगर समस्येवर कारले आहे रामबाण उपाय

Diabetes: मधुमेह झाल्यानंतर आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये खूप बदल करावे लागतात. काही गोड पदार्थाचे सेवन केल्यास लगेच रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. हाय ब्लड शुगरमुळे तोंडाला कोरड पडणे, तहान लागणे, थकवा, अंधुक दृष्टी आणि वारंवार लघवी होऊ शकते. मात्र, या आयुर्वेदिक उपचाराने मधुमेहाची लक्षणे कायमची दूर करणे शक्य आहे. (This Ayurvedic treatment will take your 'sugar' control in 30 minutes)

त्यासाठी खालील दिलेला एकमेव रामबाण उपाय करून पहा, करण हा उपाय इतका गुणकारी आहे की अवघ्या 30 मिनिटांमध्ये रक्तातील साखर नियंत्रणात येते. मधुमेहावरील या आयुर्वेदिक उपायाचे नाव आहे कारले. जे आपल्या सर्वांनाच माहित आहे!

अधिक वाचा: ​डास मारण्यासाठी लावलेल्या कॉईलमुळे घरात आग, 6 जणांचा मृत्यू

झटक्यात कमी होते ब्लड शुगर

Pubmed Central जर्नलवर भारतीय संशोधकांनी केलेल्या अभ्यासात असे म्हटले आहे की, करल्याचा रस प्यायल्याने रक्तातील अतिरिक्त साखर अवघ्या 30 मिनिटांत कमी होते. तसेच, 120 मिनिटांनंतर ती आणखीन कमी होऊन, नियंत्रणात येऊ शकते. 

हाय शुगरवर कारले आहे रामबाण उपाय

याच जर्नलवर आधारित असलेल्या दुसऱ्या संशोधकाने सांगितले की, करल्यामध्ये मधुमेह विरोधी गुणधर्म आहेत. जे ट्राइटेरपीन, प्रोटाइड, स्टेरॉइड, अल्कालॉइड, इनऑर्गेनिक, लिपिड आणि फिनोलिक कंपाऊंडमुळे होते. हे मधुमेहाला मूळापासून नष्ट करण्यास मदत करते.

अधिक वाचा : ​IPL Opening ceremony मध्ये झळकणार बॉलिवूड स्टार्स

कारल्यामध्ये 'इंसुलिन' असते

वेगवेगळ्या तज्ञांच्या मते कारल्याच्या आत एक महत्वपूर्ण घटक असतो. जो इंसुलिनप्रमाणेच कार्य करतो. जे पेशींना ग्लुकोजचा वापर करण्यास सहाय्य करते, ज्यामुळे रक्तातील अतिरिक्त ग्लुकोजचे प्रमाण कमी होते. 

प्री-डायबिटीजमध्ये ही कारले गुणकारी

जेव्हा रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू लागते तेव्हा त्या स्थितीला प्री-डायबेटिस असे म्हणतात. माधुमेहापासून मुक्त होण्यासाठी हा काळ खूप महत्वाचा आहे. या आयुर्वेदिक उपचारांचा अवलंब केल्यास मधुमेह होण्यापासून वाचू शकतो.

अधिक वाचा : ​घरात बाॅयफ्रेंडसोबत सुरू होता रोमांस, तेव्हा पोहोचला घरी

मधुमेह टाळण्याचा मार्ग

कारल्याच्या सेवनाने मधुमेह टाळू शकतो. ज्या लोकाना अद्याप मधूमेहाचे निदान झालेले नाही, अशा लोकांनी कारल्याचे सेवन करायला हवे. कारले खाल्ल्याने मधुमेहाचा धोका खूप कमी होतो. 

कारले खाल्ल्याने होणारे फायदे

  1. कारल्यामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, फोलेट हे महत्वाचे घटक असतात
  2. कर्करोगाशी लढण्याचे गुणधर्म आहेत
  3. खराब कोलेस्ट्रॉल कमी होते
  4. वजन कमी करण्यास मदत करते. 

*टीप - सदर माहिती तुमच्या सामान्य ज्ञानासाठी असून, मधुमेह संबंधित उपचारांबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी आपल्या डॉक्टरांचा सल्ला विचारात घ्या.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी