heart Health : या कारणामुळे कमकूवत होऊ शकतात हृदयाच्या नसा, नका दुर्लक्ष करू या लक्षणांकडे

बदलती जीवनशैली (lifestyle) आणि चुकीचा आहार (Diet) यामुळे अनेक आजार तुम्हाला घेरतात. अशा परिस्थितीत स्वतःची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे शरिराच्या (body) अनेक अवयवावर परिणाम होत असतो.

This can weaken the nerves of the heart
या कारणामुळे कमकूवत होऊ शकतात हृदयाच्या नसा  |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
 • हृदयाच्या नसा कमकुवत झाल्यामुळे हृदयविकाराच्या झटक्यासारख्या गंभीर समस्या उद्भवू शकतात.
 • जर तुम्हाला उच्च रक्तदाब आणि उच्च रक्तदाबाची समस्या असेल तर हृदयाच्या नसा कमकुवत होऊ शकतात.

नवी दिल्ली: बदलती जीवनशैली (lifestyle) आणि चुकीचा आहार (Diet) यामुळे अनेक आजार तुम्हाला घेरतात. अशा परिस्थितीत स्वतःची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे शरिराच्या (body) अनेक अवयवावर परिणाम होत असतो. याचा परिणाम तुमच्या हृदयावरही परिणाम होऊ शकतो. बहुतेक लोकांना त्यांच्या हृदयाच्या शिरा का कमकुवत होत आहेत हे माहित सुद्धा नसते. हृदयाच्या नसा कमकुवत झाल्यामुळे तुम्हाला हृदयविकाराच्या झटक्यासारख्या गंभीर समस्या उद्भवू शकतात. आज आपण जाणून घेऊया हृदयाच्या नसा कमकुवत होण्याची कारणे आणि लक्षणे.

हृदयाच्या नसा कमकूवत होण्याची कारणे

 •  हृदयाच्या नसा कमकुवत होण्याचे पहिले कारण म्हणजे तुमचा खराब आहार आणि जीवनशैली. हृदयाच्या नसा कमकुवत होण्यामागे ही प्रमुख कारणे जबाबदार मानली जातात. 
 • याशिवाय जर तुम्हाला उच्च रक्तदाब आणि उच्च रक्तदाबाची समस्या असेल तर हृदयाच्या नसा कमकुवत होऊ शकतात. म्हणजेच उच्च रक्तदाबामुळे हृदयविकाराची समस्याही सर्वाधिक असते.
 • लठ्ठपणा अनेक आजार घेऊन येतो हे सर्वांनाच माहीत आहे. त्यामुळे हृदयविकाराचा धोकाही कायम राहतो. लठ्ठपणामुळे तुम्हाला हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता जास्त असते. 
 •  याशिवाय तुमच्या शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलमुळे तुमच्या हृदयाच्या नसाही कमकुवत होऊ शकतात. तसेच, जर तुम्ही धूम्रपान करत असाल तर तुम्हाला हृदयविकाराचा झटका येण्याचा धोकाही वाढतो. 
 • नैराश्यामुळे हृदयाच्या नसाही कमकुवत होऊ शकतात. वास्तविक, नैराश्यामुळे तुमच्या शरीरात उत्सर्जित होणारे स्ट्रेस हार्मोन्स तुमच्या नसांचं गंभीर नुकसान करत असतात.

हृदय कमकूवत होण्याची लक्षणे

 • श्वास घेण्यास त्रास होणं, फुफ्फुसात त्रास होणं 
 •  पाय दुखणे
 • पायावर सूज येणे. 
 • छाती दुखणे
 • नेहमी ताप आणि सर्दी असणे 

Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य गृहितकांवर आधारित आहे. आपणांस काही समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी