मुंंबई: प्रेग्नंसीचे(Pregnancy) दिवस हे प्रत्येक महिलेसाठी स्पेशल दिवस असतात. प्रेग्नंट असल्याचे समजल्यानंतर महिलेचे संपूर्ण आयुष्यच बदलून जाते. महिला आपल्या बाळाशी संबंधित प्लान करण्यास सुरूवात करतात. आपल्या बाळानुसार(baby) तिचे आयुष्य बदलून जाते. प्रेग्नंसीनंतर तिच्या जीवनात असेही बदल येतात ज्यामुळे तिचे रूटीनच बदलून जाते. आज आम्ही तुम्हाला प्रेग्नंसीनंतर महिलेच्या शरीरात होणाऱ्या बदलांबद्दल सांगणार आहोत.
प्रेग्नंसीनंतर महिलांमध्ये सेक्सची इच्छा कमी होते. एका रिपोर्टनुसार डिलीव्हरीनंतर महिलांमध्ये सेक्सची इच्छा पुन्हा निर्माण होण्यास एक वर्षांचा कालावधी लागतो. खरंतर प्रेग्नंसीदरम्यान महिलांमध्ये अस्ट्रोजन लेव्हल वाढते आणि डिलीव्हरीमध्ये याचे प्रमाण वाढते. यामुळे महिलांमध्ये सेक्सची इच्छा कमी होते. दरम्यान, काही कालावधीनंतर हे नॉर्मल होऊन जाते.
प्रेग्नंसीदरम्यान महिलांच्या शरीरात अनेक प्रकारचे बदल होत असतात ज्यामुळे त्रासही होतो., प्रेग्नंसीदरम्यान महिलांच्या पायांवर सूज येते. मात्र बाळाच्या जन्मानंतर तुमच्या पायाच्या आकारात कायमस्वरूपी बदल होऊ शकतो. रिपोर्टनुसार प्रमाणापेक्षा जास्त वजन असलेल्या महिलांचे प्रेग्नंसीदरम्यान २०-२५ किलो वजन वाढते ज्याचा भार पायांवर येतो आणि पायांचा आकारही वाढू शकतो. शरीरात होणाऱ्या हार्मोनल बदलांमुळेही हे होऊ शकते.
बाळाच्या जन्मानंतर ब्रेस्टफिडींगमुळे महिलांच्या स्तनाचा आकार वाढतो. मात्र बाळाला ब्रेस्टफीड करणे बंद केल्यास ब्रेस्टचाआकार पहिल्यापेक्षा कमी होतो.
मुलाच्या जन्मानंतर महिलांचे पोट पुन्हा आत येते. मात्र ते लगेचच होत नाही ज्याचा त्या विचार करतात. बाळाच्या जन्मानंतर अधिककरून महिला विचार करतात की त्यांचे पोट आधीसारखेच होईल मात्र असे होत नाही. पोट पुन्हा पूर्वीप्रमाणे होण्यासाठी ६ ते ८ आठवड्यांचा वेळ लागतो.
प्रेग्नंसीदरम्यान महिलांचे केस खूपच शाईनी आणि हेल्दी होतात. मात्र डिलीव्हरीनंर केस पुन्हा पूर्वीसारखेच होऊ लागतात. इतकंच नव्हे तर अनेक महिलांचे केस तुलनेत जास्तच गलतात. प्रेग्नंसीमध्ये अॅस्ट्रोजन लेव्हल वाढलेली असते मात्र डिलीव्हरीनंतर हा स्तर कमी हतो. त्यामुळे बाळाच्या जन्मानंर ३-४ महिन्यांमध्ये केस गळतीचे प्रमाण खूप असता. मात्र हे अस्थायी असते. ६-१२ महिन्यांपर्यंत हे नॉर्मल होऊन जाते.