Heart and high blood presure:हृदयाचे आजार ते उच्च रक्तदाबाचा प्रेशरही कमी करते ही चटणी; जाणून घ्या तज्ञांकडून फायदे

तब्येत पाणी
Updated Feb 18, 2023 | 14:35 IST | टाइम्स नाऊ मराठी

फ्लेक्ससीड्स अशा सुपरफूडमध्ये गणले जातात, ज्याच्या सेवनाने हृदयविकारांवर उपचार होतात, रक्तदाब नियंत्रित राहतो, वजन कमी होते आणि साखरही नियंत्रित राहते. आयुर्वेदानुसार, अंबाडीच्या बियांमध्ये भरपूर फायबर असते जे बद्धकोष्ठतेवर उपचार करते आणि पचन सुधारते.

From heart disease to high blood pressure, this chutney also cures, know the benefits from experts
Heart and high blood presure:हृदयाच्या आजारापासून हाय ब्लड प्रेशरचा पण उपचार करते ही चटणी, तज्ञांकडून फायदे जाणून घ्या  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • फ्लेक्ससीड्सच्या चटणीचे सेवन केल्याने हाय ब्लड प्रेशर नियंत्रणमध्ये ठेवता येतो
  • जवसाच्या बिया दह्यासोबत भाजल्यानंतर किंवा ताकासोबतही खाऊ शकता.
  • आयुर्वेदानुसार, अंबाडीच्या बियांमध्ये भरपूर फायबर असते जे बद्धकोष्ठतेवर उपचार करते आणि पचन सुधारते.

Flax seed benefits: आपल्या बदललेल्या जीवनशैलीमुळे हृदयाचे आजार वाढू लागले आहेत. तसेच वाढत्या तणावामुळे रक्तदाबाचा त्रास देखील वाढत असतो. या त्रासापासून आपल्या बचाव करायचा असेल तर आपल्या आहारात बदल करणं आवश्यक आहे. फ्लेक्ससीड्स अशा सुपरफूडमध्ये गणले जातात, ज्याच्या सेवनाने हृदयविकारांवर उपचार होतात. तसेच रक्तदाबदेखील नियंत्रित राहत असतो. याचबरोबर या सीड्समुळे वजनदेखील  कमी होत असते. तर रक्तातील साखरही नियंत्रित राहते. आयुर्वेदानुसार, अंबाडीच्या बियांमध्ये भरपूर फायबर असते जे बद्धकोष्ठतेवर उपयुक्त आहेत, तसेच पचनयंत्रणा देखील सुधारत असते. (This chutney also reduces heart disease and high blood pressure; Learn the benefits from experts)

फ्लेक्ससीड्स, प्रतिजैविक गुणधर्मांनी समृद्ध, गुद्द्वारातील संसर्ग दूर करतात आणि मूळव्याधांवर देखील उपचार करतात. प्रथिनेयुक्त अंबाडीच्या बियांचे सेवन केल्याने खराब कोलेस्ट्रॉल कमी होते आणि हृदयविकारांपासूनही बचाव होतो. वाईट कोलेस्टेरॉल हृदयविकार वाढवण्यास अत्यंत जबाबदार आहे.

 अधिक वाचा : महाशिवरात्री साजरी करा शुभेच्छा देऊन

आयुर्वेदिक तज्ञ आणि योगगुरू बाबा रामदेव यांच्या मते, फ्लेक्ससीड्समध्ये  लिग्नॅन्स, अँटिऑक्सिडंट्स, फायबर, प्रोटीन आणि पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड्स सारखे घटक असतात. या पोषक तत्वांचे सेवन केल्याने विविध आजारांचा धोका कमी होतो. अंबाडीच्या बियांचे सेवन अनेक प्रकारे केले जाते. काही लोक या बिया भाजून खातात, तर काही लोक या बियांचे सेवन त्याची पावडर बनवून करतात.

तुम्हाला माहित आहे का, फ्लेक्ससीड्सचे सेवन चटणी करूनही करू शकतो. फ्लेक्ससीड्सच्या चटणीचे सेवन केल्याने हाय ब्लडप्रेशर नियंत्रणात ठेवता येते आणि हृदयाचे आरोग्यही सुधारत असते. दरम्यान या बियाच्या अधिक आरोग्यदायी फायद्याविषयी जाणून घेऊया..

अधिक वाचा : Eknath Shinde Won party Symbol: निकालानंतर एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना खोचक सल्ला

फ्लेक्ससीड्सचे सेवन कसे करोयचे

फ्लेक्ससीड्सचे सेवन तुम्ही त्याची चटणी करूनही करू शकता. या चटणीला बनवण्यासाठी फ्लेक्ससीड्सला तव्यावर भाजून घ्या आणि थंड करत ठेवा. आता या बियांना मिक्सरमध्ये टाका आणि चिरलेल्या मिरच्या, लसूण, लिंबाचा रस आणि चविनुसार मीठ घालून  मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. या चटणीला बारीक वाटल्यानंतर या बियांचे सेवन करावे.  

  • जवसाच्या बिया दह्यासोबत भाजल्यानंतर किंवा ताकासोबतही खाऊ शकता.
  • पाण्यात भिजवल्यानंतर तुम्ही ते खाऊ शकता.
  • जर तुम्ही तुमच्या रोजच्या जीवनात गरम प्रभावाची फ्लेक्ससीड्सचे सेवन केले तरी तुम्हाला फायदा होईल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी