मुंबई: सध्याच्या युगातील दर तिसरी व्यक्ती ही लठ्ठपणाने(obesity) ग्रस्त आहे. याचे मुख्य कारण म्हणजे खाण्यापिण्याच्या सवयी आणि बिघडलेली जीवनशैली(lifestyle). तज्ञांच्या मते कॅलरीज बर्न होत नसल्याने वजन वाढतच राहते. यासोबतच जंक फूड(junk food) आणि साखरेचे पदार्थ(sweets) अधिक खाल्ल्याने वजनही वाढते. सणांच्या दिवसांत लोक मोठ्या प्रमाणात मिठाई तसेच स्नॅक्स खातात ज्यामुळे वजन वाढतेच. दरम्यान तुम्हीही सणांच्या दिवसांत वाढत्या वजनाने ग्रस्त आहात तर या सीझनमध्ये खाली दिलेल्या ड्रिंकचे सेवन जरूर करा. यामुळे वाढते वजन नियंत्रित राहील. अनेकजण दिवाळीत मिठाईवर ताव मारतात. गोड पदार्थ मनाला आनंद देतात मात्र त्यानंतर वाढलेले वजन(weight gain) तुम्हाला त्रासदायक ठरू शकते.
तुम्हाला तुमचे वजन कमी करण्यासाठी योग्य आणि हेल्दी डाएट निवडावे लागेल. तसेच जेवणाचे प्रमाणही नियंत्रित ठेवावे लागेल. थोडे थोडे खाणे, सतत न खाणे, स्नॅक्स न खाणे, नियमित व्यायाम करणे या गोष्टी कराव्याच लागतील.आपल्या घरातीलच काही पदार्थ वापरून तुम्ही तुमचे वाढलेले वजन कमी करू शकता. तसेच हेल्दी शरीर मिळवू शकता वाढत्या वजनावर कंट्रोल मिळवण्यासाठी ग्रीन टी हे सर्वोत्तम पेय आहे. यात अँटी ऑक्सिडंट्स असतात ज्यामुळे वजन कमी करण्यास फायदा होतो. यात एक अँटी ऑक्सिडंट कॅटेचिन असते. एका संशोधनानुसार ग्रीनटीचे अनेक फायदे आहेत. ग्रीन टीच्या सेवनाने सूज कमी होते. तसेच मेंदूच्या विकासावर परिणाम होतो. ग्रीन टी सगळ्यात उत्तम डिटॉक्स ड्रिंक मानले जाते. यात अनेक औषधीय गुण असतात. ज्यामुळे टॉक्सिन शरीराबाहेर फेकले जाते.
एका भांड्यात पाणी गरम करा. आता पाणी थोड थंड होवू द्या. यानंतर यात पुदिन्याची पाने, लिंबाचा रस, आले, मध आणि ग्रीन टी मिसळा. ग्रीन टी ड्रिंक तयार आहे. हे ड्रिंक पिऊन तुम्ही तुमचे वजन कमी करू शकता.