Exercise: या एक्सरसाईजने १ महिन्यात कमी होईल ब्रेस्ट साईज

तब्येत पाणी
Updated May 11, 2022 | 11:11 IST | टाइम्स नाऊ मराठी

जर तुम्हालाही ब्रेस्ट साईज कमी करायची असेल तर या आर्टिकलमध्ये सांगितलेली एक्सरसाईज जरूर करा. 

breast
Exercise: या एक्सरसाईजने १ महिन्यात कमी होईल ब्रेस्ट साईज 
थोडं पण कामाचं
  • ब्रेस्टची साईज मोठी असल्यास पाठदुखी तसेच मानदुखीचा त्रास सतावू शकतो.
  • काही एक्सरसाईज करून तुम्ही ब्रेस्टचा आकार कमी करू शकता
  • ब्रेस्टचा आकार कमी करण्यासाठी येथे काही एक्सरसाईज देण्यात आलेत. 

मुंबई: अनेकदा ब्रेस्टचा आकार नीट नसल्याने महिलांमध्ये आत्मविश्वासाचा अभाव आढळतो. लहान ब्रेस्ट असलेल्या महिला हा आकार वाढवण्यासाठी विविध औषधे, सर्जरी तसेच अन्य मार्गाचा वापर करत असतात तर ज्यांच्या ब्रेस्टजी साईज मोठी असते त्या महिला तो आकार कमी करण्यासाठी प्रयत्न करत असतात. हार्मोनल बदल, वंशागत कारणे, ब्रेस्टफिडींग, लठ्ठपणा, प्रेग्नंसी अथवा एखाद्या औषधाचा साईडइफेक्ट या बऱ्याच कारणांमुळे ब्रेस्टच्या आकारात बदल होतो.

ब्रेस्टची साईज मोठी असल्यास पाठदुखी तसेच मानदुखीचा त्रास सतावू शकतो. काही एक्सरसाईज करून तुम्ही ब्रेस्टचा आकार कमी करू शकता. ब्रेस्टचा आकार कमी करण्यासाठी येथे काही एक्सरसाईज देण्यात आलेत. 

अधिक वाचा - हिमंत असेल तर इथं मंदिर बनवा, मेहबुबा मुफ्तीचं BJP ला आव्हान

ब्रेस्ट साईज कमी करण्यासाठी एक्सरसाईज

वॉल पुशअप्स

हा सगळ्यात सोपा पुशअप्स आहे
हे करण्यासाठी भिंतीपासून काही अंतर दूर उभे राहा. 
आपले हात भिंतीवर ठेवूनन हाताचे खांदे सरळ ठेवा.
त्यानंतर श्वास आत घेऊन ढोपर वाकवून छाती भिंतीजवळ आणा
त्यानंतर श्वास सोडत पुशअप्स करा. 
त्यानंतर हात सरळ करून आधीच्या स्थितीवर या

नॉर्मल पुशअप्स

याला फ्लोर पुशअप्स असेही म्हणतात. जर तुम्हाला पायांच्या बोटांनी पुशअप्स करणे खूप आव्हानात्मक वाटते तर तुम्ही गुडघे टेकवून हे करू शकता. 

  1. तळहात जमिनीवर टेकवून गुडघे खाली टेकवून जमिनीवर राहा. 
  2. आपले खांदे आणि पाय सरळ ठेवा
  3. त्यानंतर शरीर इथपर्यंत झुकवा जेणेकरून आपली छाती जमिनीला स्पर्श करेल
  4. काही वेळ असेच थांबा. 
  5. अनेकदा असे करा. 

कार्डिओ वर्कआऊट

ब्रेस्ट साईज कमी करण्यासाठी तिसरी एक्सराईज कार्डिओ आहे. ही खूपच परिणामकारक एक्सरसाईज आहे. हे दररोज केल्याने तुम्ही दिवसांत फरक जाणवेल. 

लेग रेज

हे करण्यासाठी मॅटवर झोपा. 
आपल्या हाताचे हिप्स खाली ठेवा ज्यामुळे पाठ सुरक्षित राहील. 
आता दोन्ही पाय हळूच वर उचला. 
त्यानंतर श्वास सोडत पाय खाली आणा. 

अधिक वाचा - वृषभ राशीत वक्री झाला बुध, या 3 राशीच्या लोकांनी राहावे सावध

स्विमिंग

ब्रेस्ट साईज कमी करण्यासाठी स्विमिंग ही चांगली एक्सरसाईज आहे. दररोज पूलमध्ये केवळ काही वेळ घालवल्ायाने तुम्हाला ब्रेस्ट योग्य शेपमध्ये मिळेल. ही एक्सरसाईज ब्रेस्टला नॅचरली कमी करण्यासाठी मसल्स टोन करण्यास मदत करेल. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी