Hair care TIPS: अंजीरचा हा एक उपाय करेल केसांना मजबूत, आठवड्यातून २ वेळा वापरल्याने होईल केसांची वाढ

तब्येत पाणी
Updated Mar 01, 2023 | 19:24 IST | टाइम्स नाऊ मराठी

Hair care TIPS for growing hair : अंजीर आरोग्यासोबतच केसांसाठी सुध्दा उपयोगी आहे. आपण पाहतो की पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे केस गळणे सुरू होते, तर अंजीर हे पोषक तत्वांचे भांडार आहे, जे मॅग्नेशियम, व्हिटॅमिन-सी आणि ई सारख्या गुणधर्मांनी समृद्ध आहे. हे गुणधर्म केसांच्या वाढीसाठी आवश्यक आहेत, ज्यामुळे स्कॅल्पमध्ये रक्त परिसंचरण वाढते, ज्यामुळे केसांचे आरोग्य चांगले राहते. 

This fig remedy will make your hair strong, using it 2 times a week will promote hair growth
अंजीर हे पोषक तत्वांचे भांडार   |  फोटो सौजन्य: Times of India
थोडं पण कामाचं
  • अंजीर आरोग्यासोबतच केसांसाठी सुध्दा उपयोगी आहे
  • पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे केस गळणे सुरू होते
  • अंजीर हे पोषक तत्वांचे भांडार

Hair care TIPS for growing hair : अंजीर आरोग्यासोबतच केसांसाठी सुध्दा उपयोगी आहे. आपण पाहतो की पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे केस गळणे सुरू होते, तर अंजीर हे पोषक तत्वांचे भांडार आहे, जे मॅग्नेशियम, व्हिटॅमिन-सी आणि ई सारख्या गुणधर्मांनी समृद्ध आहे. हे गुणधर्म केसांच्या वाढीसाठी आवश्यक आहेत, ज्यामुळे स्कॅल्पमध्ये रक्त परिसंचरण वाढते, ज्यामुळे केसांचे आरोग्य चांगले राहते. 

केसांसाठी कसा आहे अंजीर फायदेशीर?

अंजीर आरोग्यासाठी तसेच केसांसाठी अत्यंत फायदेशीर आहे. अंजीर तेल एक उत्तम कंडिशनर आहे, जे तुमचे केस तुटण्यापासून रोखते. त्यांना मॉइश्चरायझिंग करण्यास देखील मदत करते. अंजीर केसांच्या वाढीसाठी फायदेशीर आहे. विशेष  म्हणजे अंजीर तेल टाळूमध्ये रक्तप्रवाह वाढवतो , ज्यामुळे केसांची वाढ वेगाने होते.

अधिक वाचा : जास्त चिकन खाल तर तब्येत बिघडवाल

केसांसाठी अंजीर कसे वापरावे?

अंजीराचे फायदे मिळवण्यासाठी तुम्ही तुमच्या रोजच्या आहारात 2 अंजीरांचा समावेश करावा, भिजवलेल्या अंजीरांचे सेवन केल्यास चांगले होईल. याशिवाय त्यापासून तयार केलेली रेसिपी केसांना लावल्याने प्रचंड फायदा होतो.

  1. अंजीर केसांना वाढ आणि ताकद देते.
  2. सर्व प्रथम, दोन चमचे दह्यात दोन चमचे बेसन मिसळा.
  3. दोन्ही नीट मिसळा आणि पेस्ट तयार करा.
  4. आता या पेस्टमध्ये अंजीर तेलाचे 10 थेंब मिसळा.
  5. त्यानंतर ही पेस्ट केसांना लावून तासभर राहू द्या.
  6. यानंतर तुम्हाला तुमचे केस शॅम्पूने धुवावे लागतील.
  7. अंजीर तेलाची ही कृती केसांना लांब आणि मजबूत बनवते.
  8. .तुम्ही ही रेसिपी आठवड्यातून 2 वेळा वापरू शकता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी