Health in monsoon: पावसाळ्यात चुकूनही हे पदार्थ खाऊ नका, नाहीतर पडाल आजारी

तब्येत पाणी
Updated Jul 07, 2020 | 15:34 IST | टाइम्स नाऊ मराठी

stay healthy in monsoon: पावसाळ्याचे आगमन झाले आहे. पावसाळा सगळ्यांना जरी हवाहवासा वाटत असला तरी हा पाऊस अनेक आजार आपल्यासोबत घेऊन येतो. त्यामुळे पावसाळ्या आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे असते. 

food to avoid in monsoon
पावसाळ्यात चुकूनही हे पदार्थ खाऊ नका, नाहीतर पडाल आजारी 

थोडं पण कामाचं

  • मान्सून संपूर्ण देशात दाखल झाला आहे. 
  • पावसाळ्याच्या दिवसांत खाण्या-पिण्याची विशेष काळजी घेतली पाहिजे
  • दूध, पालक, नॉनव्हेज या दिवसांत न खाणेच चांगले

मुंबई: मान्सून संपूर्ण देशभरात दाखल झाला आहे. देशात प्रत्येक ठिकाणी पाऊस कोसळत आहे. पाऊस पडत असल्याने वातावरणात ओलावा असतो जो आपल्या आरोग्यासाठी बऱ्याचदा हानिकारक असतो. पावसाळ्याच्या दिवसांत अनेक आजार येतात. त्वचेसंबंधीचे आजार, श्वसनासंबंधीचे आजार यांचा धोका वाढतो. या दरम्यान वातावरणात ओलावा असल्याने अनेकदा इन्फेक्शन होण्याचा धोकाही अधिक असतो. 

ओलाव्यामुळे अनेक पदार्थांना बुरशी लागण्याचा धोकाही असतो. ज्यामुळे आपल्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतात. आज आम्ही तुम्हाला पावसाळ्यात कोणत्या पदार्थांपासून दूर राहायचे हे सांगणार आहोत ज्यामुळे तुम्ही स्वत:ची काळजी घेऊ शकता. असं म्हणतात की पावसाळ्याच्या दिवसांत दूध, पालक या पदार्थांचे सेवन करू नये. 

  1. वांगे- वांग्याचे भरीत अनेक लोकांना आवडते. मात्र पावसाळ्याच्या दिवसांत तुम्हाला तुमच्या जिभेवर नियंत्रण ठेवावे लागेल कारण पावसात वांग्यामध्ये कीडे होण्याचा धोका अधिक असतो. ज्यामुळे आपले आरोग्य बिघडू शकते. हे खाल्ल्याने पोटदुखी तसेच अन्य आजार होण्याचा धोका अधिक असतो. 
  2. दूध - पावसाळ्याच्या दिवसांत दूध न पिण्याचा सल्ला दिला जातो कारण श्रावण महिन्यात दूध शिवलिंगाला अर्पण केले जाते. मात्र या सगळ्या अंधश्रद्धेच्या गोष्टी आहेत. यामागचे खरं कारण म्हणजे पावसाळ्याच्या दिवसांत गाय तसेच म्हशींना जो चारा दिला जातो त्यात मोठ्या प्रमाणावर बॅक्टेरिया तसेच किटाणू अतात ज्यामुळे ते दूध पूर्ण शुद्ध नसते. हाच धोका पाहता पावसाळ्याच्या दिवसांत दुधाचे सेवन न करण्याचा सल्ला दिला जातो. 
  3. पालक- पालकामध्येही पावसाच्या दिवसांत किटाणू, व्हायरस तसेच बॅक्टेरिया असण्याचा धोका असतो. हे बॅक्टेरिया आपल्याला खुल्या डोळ्यांनी जरी दिसत नसले तरी ते आपले आरोग्य बिघडवू शकतात. पालकाच्या शेतीमध्ये हानिकारक कीटनाशकाचा वापर केला जातो ज्यामुळे आपण आजारी पडू शकतो. 
  4. नॉनव्हेज - पावसाळ्याच्या दिवसांत जसे पालक, दूधामध्ये बॅक्टेरिया, किटाणूचा धोका अधिक असतो त्याचप्रमाणे नॉनव्हेजमध्ये बॅक्टेरियाचा धोका अधिक असतो. याच्या सेवनाने फूड अॅलर्जीही होऊ शकते. 
  5. तळलेले पदार्थ - पावसाळ्याच्या दिवसांत तळलेले पदार्थ जास्त खाऊ नयेत. तळलेले पदार्थ खाल्ल्याने पोटात इन्फेक्शनचा धोका वाढतो. विशेष म्हणजे बाहरचे पदार्थ खाऊ नयेत. यामुळे पोटदुखी, जुलाब होण्याची शक्यता वाढते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी