अंड्यासोबत पालक खाल्ल्यास वेगाने कमी होईल वजन

तब्येत पाणी
Updated Dec 29, 2020 | 18:40 IST | टाइम्स नाऊ मराठी

हेल्थ एक्सपर्ट्सच्या मते काही फूड कॉम्बिनेशन

weight loss
अंड्यासोबत पालक खाल्ल्यास वेगाने कमी होईल वजन 

थोडं पण कामाचं

  • मॉर्निंग डाएटमध्य ओट्ससोबत सेवन केल्यास वेगाने वजन घटवण्यास मदत होते
  • सफरचंद आणि पीनट बटर एक क्लासिक वेट लॉस फ्रेंडली फूड कॉम्बिनेशन आहे.
  • वाढते वजन नियंत्रणात आणण्यासाठी ग्रीन टी सगळ्यात चांगला उपाय आहे.

मुंबई: तुम्ही अनेकांकडून ऐकले असेल की वेट लॉस एक मोठी प्रोसेस आहे. यासाठी कोणताही शॉर्टकट नाही. असा विचार करणेही योग्य नाही. मात्र काही सोप्या ट्रिक्सनी वेट लॉसची ही प्रक्रिया वेगाने होऊ शकते. हेल्थ एक्सपर्ट्सच्या मते

अंडी आणि पालक - अंड्यामध्ये हाय क्वालिटी प्रोटीन असते. हा पौष्टिक आहार खूप सोपा आणि वेट लॉस फ्रेंडली आहे. जर तुम्ही वजन घटवण्याच्या मिशनवर आहात तर आपल्या ऑम्लेटमध्ये पालकाचा समावेश करा. एका स्टडीनुसार आर्यनने भरपूर असलेल्या पालकामुळे अंडी खाल्ल्यास वेगाने वजन कमी होण्याचे काम होते. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by @shubydoe

ओट्स आणि बेरीज - रासबेरी आणि ब्लूबेरीचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. यात अनेक प्रकारचे अँटी ऑक्सिडंट्स असतात. मॉर्निंग डाएटमध्य ओट्ससोबत सेवन केल्यास वेगाने वजन घटवण्यास मदत होते. या फूड कॉम्बिनेशनचे वेट लॉसव्यतिरिक्त अनेक फायदे आहेत. 

सफरचंद आणि पीनट बटर - सफरचंद आणि पीनट बटर एक क्लासिक वेट लॉस फ्रेंडली फूड कॉम्बिनेशन आहे. पीनट बटरमध्ये मोनोसॅच्युरेटेड आणि पॉलिसॅच्युरेटेड फॅट असते ज्यामुळे दीर्घकाळ भूक रोखली जाते. तसेच इन्सुलिन मेटाबॉलिज्म दुरुस्त करण्यास मदत करतात. सफरचंदासोबत पीनट बटर खाल्ल्याने वेगाने वजन कमी होण्यास मदत होते. 

ग्रीन टी आणि लेमन - वाढते वजन नियंत्रणात आणण्यासाठी ग्रीन टी सगळ्यात चांगला उपाय आहे. लो कॅलरी आणि अँटी ऑक्सिंडट असलेले हे ड्रिंक वेगाने कॅलरी बर्न करण्यास मदत करते. तसेच कमी वेळात वजन घटवते. दिवसाला दोन ते तीन कप ग्रीन टी प्यायल्याने मेटाबॉलिज्म बूस्ट होण्यास मदत होते. 

गरम पाणी आणि लिंबाचा रस - सकाळी उठल्यावर कोमट पाण्यात लिंबू-मध मिसळून प्यायल्याने खूप फायदे होतात. याचा वापर तुम्ही डेली रूटीनमध्येही करू शकता. यामुळे वजन कंट्रोलमध्ये राहण्यास मदत होते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी