मुंबई: असे कोणतेचे स्पेशल फूड(special food) नाही जे लगेचच फॅट बर्न(fat burn) करेल तसेच मसल्स बिल्ड(muscles build) करण्यास तुमची मदत करेल. याप्रमाणेच एका विशिष्ट प्रकारचे डाएट(diet) तुमच्या एखाद्या शरीराच्या भागाचे फॅट(fats) कमी करण्यास मदत करणार नाही. दरम्यान, डाएटमध्ये तुम्ही जे पदार्थ खाता ते तुमच्या आरोग्यासाठी निरोगी असले पाहिजेत तसेच असे पदार्थ जे तुमच्या भुकेला कंट्रोल करू शकतात. ज्यामुळे तुम्ही वाढते वजन रोखू शकता. तसेच तुमचा कॅलरी इनटेक बॅलन्स होऊ शकेल. यासाठी तुम्हाला तुमचा डाएट प्लान योग्य पद्धतीने आखायला हवा.
अनेकदा आपण सतत भूक लागल्याने मिळेल ते जंक फूड खातो तसेच अनहेल्दी जेवण जेवतो. ज्यामुळे आपले वजन वाढते. असे यासाठी होते कारण तुम्हाला तुमच्या आहारातून पोषकतत्वे मिळत नाहीत. ज्यामुळे तुम्हाला सतत भूक लागते. यासाठी भूक कंट्रोल करणाऱ्या पदार्थांचा समावेश आहारात केला पाहिजे. ज्यामुळे तुमचे वजनही कंट्रोलमध्ये राहील. भूक कंट्रोल करतात हे पदार्थ
अंडी - अंड्यामुळे बऱ्याच वेळेपर्यंत पोट भरलेले राहते. तसेच अंडी हा प्रोटीनचा चांगला सोर्स आहे. ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. एका उकडलेल्या अंड्यामध्ये १००हून कमी कॅलरी असतात. यामुळे कॅलरी इनटेक वाढत नाही. तसेच अंडी बनवण्यास सोपी आणि याला जास्त वेळही लागत नाही त्यामुळे तुम्ही जंक फूडपासून दूर राहता.
सलाड - सलाड नेहमीच आरोग्यदायी ऑप्शन राहिला आहे. तुम्ही जर वजन कमी करत आहात कर तुमच्यासाठी सलाड हा उत्तम पर्याय आहे. भाज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असते. ज्यामुळे तुमचे पोट भरलेले राहते आणि तुम्हाला भूक लागत नाही. तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्यांपासून सलाड बनवू शकता.एक बाऊल सलाड दररोज खा.
चिया सीड्स - हल्ली वजन घटवण्यासाठी चिया सीड्स सर्वात पॉप्युलर आहे. यात मोठ्या प्रमाणात फायबर असतात. ज्यामुळे तुम्हाला बराच वेळ भूक लागत नाही. चिया सीड्स भूक कंट्रोल करण्यासोबतच वजन कमी करण्यास फायदेशीर ठरतात.
डाळ - डाळ सगळ्यात हेल्दी ऑप्शन आहे. यात फोलिक अॅसिड, आर्यन, पोटॅशियम, थायमिन आणि मँगनीजसारखी पोषकतत्वे असतात. डाळ हा प्रोटीन आणि फायबरचा चांगला सोर्स आहे ज्यामुळे सातत्याने भूक लागत नाही. यात कॅलरीजही कमी असतात.
ओट्स - अर्धा कप ओट्समध्ये ५ ग्रॅम फायबर असतात. यास पचण्यासही वेळ लागतो. ओट्स भूक नियंत्रित करणारे हार्मोन कोलेलिस्टोकिनिन वाढवते. हा वजन कमी करण्यासाठी बेस्ट ब्रेकफास्ट ऑप्शन आहे.
काकडी - काकडीमध्ये शरीर क्लिंज करण्यासाठी, वजन कमी करण्यासाठी तसेच निरोगी राखण्यासाठी आवश्यक गुणतत्वे असतात. काकडीमध्ये डाएटरी फायबर असतात ज्यामुळे बऱ्याच वेळेपर्यंत तुमचे पोट भरलेले राहते.