मुंबई: अनेकदा लोक तक्रार करत असतात की सकाळी त्यांचे पोट(stomach) नीट साफ होत नाही. यामुळे पोट दुखीचाही त्रास होतो. इतकंच नव्हे तर पोट साफ नसल्यास तोडांत अल्सरही होतात. सोबतच याचा आरोग्यावर(health) परिणाम होतो. यासाठी लोक अनेक प्रकारची चूर्णे घेतात अथवा डॉक्टरांची औषधे घेतात. दरम्यान, तुम्ही तुमच्या डाएटमध्ये(diet) काही बदल करून तुमची पोट साफ न होण्याची समस्या दूर करू शकता. जाणून घेऊया पोट साफ करण्यासाठी आपल्या डाएटमध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश करावा...This foods will help you to clean your stomach
अधिक वाचा - Yuzvendra chahal: धनश्रीने नावाच्या मागून हटवले चहल आडनाव
आल्याच्या सेवनाने पोट साफ करण्यास मदत मिळते. जर तुम्हालाही पोट साफ न होण्याचा त्रास असेल तर त्यासाठी आल्याचा रस अथवा आल्याच्या काढ्याचा वापर करा. आल्याच्या सेवनाने जीव घाबराघुबरा होणे, स्नायूदुखी, सर्दी-कफची समस्या तसेच घशात खवखव या समस्या दूर होतील.
ज्या लोकांना बद्धकोष्ठतेचा त्रास आहे त्यांच्यासाठी ताकाचे सेवन अतिशय फायदेशीर ठरते. यामुळे जेवण चांगल्या पद्धतीने पचते. ताकाच्या सेवनाने पाचनशक्ती सुधारते. जर नियमितपणे ताकाचे सेवन केले गेले तर यामुळे सूज, डायजेस्टिव्ह डिसॉरर्डर, सम्प्लीनसारख्या समस्या दूर होतात.
अधिक वाचा - RTO अधिकाऱ्याच्या घरी धाड; सापडलं मोठं घबाड
पोट साफ करण्यासाठी पपईचे सेवनही अतिशय फायदेशीर ठरते. पपईमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असते जे मेटाबॉलिज्म बूस्ट करण्यास तसेच खाणे पचवण्यासाठी आणि पोट साफ ठेवण्यासाठी मदत करते. जर तुमचे पोट सकाळी साफ होत नसेल तर तुम्ही तुमच्या डाएटमध्ये पपईचा समावेश केला पाहिजे.