Male Fertility : बहुतेकदा असे मानले जाते की स्त्रियांना मुले होण्यासाठी योग्य वय असते, तर पुरुषांना कोणत्याही वयात मुले होऊ शकतात, मात्र हे पूर्णपणे सत्य नाही.
मूल होण्यासाठी, स्त्रियांप्रमाणेच पुरुषांचे वयसुद्दा तितकेच महत्त्वाचे असते. याचे कारण म्हणजे वाढत्या वयाबरोबर पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या आणि त्याची गुणवत्ता कमी होऊ लागते.
तज्ज्ञांच्या मते, 20 ते 30 वर्षे हे वय पुरुषांसाठी वडील बनण्यासाठी योग्य आहे.पुरुष पन्नास किंवा त्याहून अधिक वयाचे असले तरीही त्यांना मुले होऊ शकतात. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डनुसार, एका व्यक्तीने वयाच्या 92 व्या वर्षी मुलाला जन्म दिला. संशोधकांचे म्हणणे आहे की मुलाला जन्म देण्यासाठी पुरुषांचे वय खूप महत्वाचे आहे. वयाच्या 40 वर्षांनंतर पुरुषांमध्ये वडील बनण्याची शक्यता कमी होऊ लागते.
अधिक वाचा : बँक ऑफ बडोदामध्ये बंपर भरती
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की पुरुषांमध्ये शुक्राणूंची निर्मिती कधीच थांबत नाही, परंतु वयानुसार शुक्राणूंचे डीएनए खराब होण्याची शक्यता खूप जास्त असते. त्यामुळे प्रजनन क्षमतेवर परिणाम होतो. जन्माला येणाऱ्या मुलाच्या आरोग्यावरही त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो. अनेक अभ्यासांमध्ये हे समोर आले आहे की, जेव्हा पुरुष मोठ्या वयात वडील बनतात तेव्हा मुलांमध्ये न्यूरोडेव्हलपमेंटल डिसऑर्डर होण्याची शक्यता असते. 2010 च्या एका अभ्यासात असे आढळून आले आहे की 40 वर्षांनंतर वडील बनलेल्या पुरुषांच्या
मुलांमध्ये ऑटिझम स्पेक्ट्रम विकसित होण्याची शक्यता 5 पट जास्त असते.
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने वीर्याचे काही निकष ठरवले आहेत ज्यावरून निरोगी शुक्राणू ठरवले जातात. यामध्ये शुक्राणूंची संख्या, आकार आणि हालचाल समाविष्ट आहे. त्यानुसार, वयाच्या 35 व्या वर्षी पोहोचताच पुरुषांमध्ये शुक्राणूंचे हे पॅरामीटर खराब होऊ लागते.
अधिक वाचा : Belly Fat कमी करण्यासाठी करा हे सोपे 5 वर्कआऊट
22 ते 25 वयोगटातील पुरुष सर्वाधिक प्रजननक्षम असतात. अशा परिस्थितीत, त्यांना 35 वर्षापूर्वी मुले जन्माला घालण्याचा सल्ला दिला जातो कारण या वयानंतर प्रजनन क्षमता बिघडू लागते. जर तुम्ही वयाच्या ४५ वर्षांनंतर मूल होण्याचा विचार करत असाल तर सर्वप्रथम डॉक्टरांशी संपर्क साधा.
जर्नल ऑफ एपिडेमियोलॉजी अँड कम्युनिटी हेल्थमध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनात असे आढळून आले आहे की वयाच्या 25 वर्षापूर्वी वडील बनल्याने पुरुषांना आरोग्याच्या अनेक गंभीर समस्या उद्भवतात. याचे कारण असे की बहुतेक पुरुष मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या तरुण वयात वडील बनण्यास तयार नसतात आणि नंतर त्याचा फटका सहन करावा लागतो.
अधिक वाचा : कोण आहेत एकनाथ शिंदेंसोबत शिवसेनेचे बंडखोर आमदार
( डिस्क्लेमर : सल्ल्यासह ही सामग्री केवळ सामान्य माहिती प्रदान करते. हे कोणत्याही प्रकारे पात्र वैद्यकीय मताचा पर्याय नाही. अधिक तपशिलांसाठी नेहमी तज्ञ किंवा तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. Timesnow मराठी या माहितीची जबाबदारी घेत नाही. )