Weight loss Journey: लेडी IAS ऑफिसरने स्वत:ला बनवले इतके फिट, फोटो ओळखणेही झाले कठीण

तब्येत पाणी
Updated Apr 01, 2022 | 12:38 IST | टाइम्स नाऊ मराठी

Transformation Journey:२००८मध्ये यूपीएससीमध्ये ऑल इंडिया १३वी रँक मिळवणारी महिला आयएएस अधिकारी सोनल गोयलने आपला फिटनेस मिळवण्याचे ठरवले आणि तिने या प्रवासादरम्यान १४ किलो वजन कमी केले. 

sonal goel
लेडी IAS ऑफिसरने स्वत:ला बनवले इतके फिट की ओळखणे झाले कठीण 
थोडं पण कामाचं
  • सोनल गोयल २००८मध्ये आयएएस बनल्या
  • वेट लॉसच्या अपेक्षेने फिटनेसवर लक्ष दिले
  • वजन कमी करण्यासाठी वापरली सोपी पद्धत

मुंबई: कोणतेही वय असो प्रत्येक वयाच्या लोकांनी आपल्या फिटनेसवर(fitness) लक्ष दिले पाहिजे. शरीर फिट असेल तर कोणताच आजार होणार नाही आणि कोणताही आजार झाला नाही की रोजची दैनंदिन कामे सोप्या पद्धतीने करता येतील. आजच्या काळात वाढलेले वजन(weight gain) ही मोठी समस्या बनली आहे. अधिक वजनामुळे लठ्ठपणापासून(obesity) डायबिटीज(diabetes), हाय कोलेस्ट्रॉल, किडनीचे आजार, हार्ट फेल, स्ट्रोकसारख्या आजारांचा धोका वाढतो. यासाठी आपले वजन मेंटेन ठेवणे गरजेचे असते. तसेच जर वजन वाढले तर ते कमी केले पाहिजे.

अधिक वाचा - रात्रीस खेळ चाले : नाईकांचा वाडा शापमुक्त होणार!

धावपळीची जीवनशैला आणि चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयीमुळे अनेकदा लोकांचे वजन वाढते आणि ते कमी करण्यासाठी फिजिकल अॅक्टिव्हिटी आणि खाण्यापिण्यावर लक्ष द्यावे लागते. एका IAS महिला अधिकाऱ्यानेही असेच आपल्या बिझी शेड्यूल्डमधून वेळ काढत स्वत:ला फिट राखण्याचे ठरवले आणि स्वत:ला फिट ठेवत ठेवत १३-१४ किलो वजन कमी केले. Aajtak.in सोबत तिने हा प्रवास शेअर केला. 

कोण आहे ही महिला ऑफिसर

स्वत:ला फिट ठेवणाऱ्या या महिला अधिकाऱ्याचे नाव आहे सोनल गोयल (IAS Sonal Goel). २००८मध्ये यूपीएससी ऑल इंडियामध्ये १३वा रँक मिळवल्यानंतर त्या भारतीय प्रशासकीय सेवेत दाखल झाल्या होत्या. त्यांची पहिली पोस्टिंग त्रिपुरामध्ये असिस्टंट कलेक्टरच्या रूपात झाली होती. आता त्या त्रिपुरा भवन, दिल्लीमध्ये रेजिडेंट कमिश्नरच्या पोस्टवर आहेत. 

अशी होती फिटनेस जर्नी

IAS Sonal Goel सांगतात की निरोगी राहणे हे प्रत्येकासाठी गरजेचे आहे. खासकरून महिलांसाठी. प्रेग्नंसीनंतर महिलांचे वजन वाढू लागते जे माझ्यासोबतही घडले होते. माझे लग्न २००९मध्ये झाले होते. त्यानंतर माझे वजन वाढण्यास सुरूवात झाली. २०१३मध्ये जेव्हा माझ्या पहिल्या बाळाचा जन्मझाला तेव्हा मी त्रिपुरामध्ये होते. माझे वजन खूप वाढले होते. कारण प्रेग्नंसी, हार्मोनल चेंजेसमुळे वजन वाढणे स्वाभाविक हते. यानंतर मी हलकाफुलका व्यायाम सुरू केला. २०१७च्या अखेरीस जेव्हा झज्जरमध्ये माझे पोस्टिंग झाले तेव्हा मी घरीच अॅरोबिक्स, झुम्बा, योगा आणि काही एक्सरसाईज करायला सुरूवात केली. त्यानंतर बिझी शेड्यूल्डमुळे मी १३-१४ किलो वजन कमी केले. माझे वजन जसजसे कमी होत गेले तसे तसे मी स्वत:ला एनर्जेटिक जाणवू लागली. २०१८मध्ये मी पुन्हा प्रेग्नंट राहिले तेव्हा डॉक्टरांच्या सल्ल्याने मी योगा आणि एक्सरसाईज करण्यास सुरूवात केली. दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर मी पुन्हा तसाच फिटनेस मिळवायचा ठरवला आणि प्रयत्नाअंती ते घडले. 

अधिक वाचा - चांदोली अभयारण्यात वणवा, वणव्याचे सत्र सुरूच

वजन कमी करण्यासाठी एक्सरसाईज आणि योग्य खाणे

वजन कमी करण्यासाठी त्यांनी विशेष डाएट केले नव्हते. खाण्याच्या सवयी मात्र बदलल्या. फिट होण्यासाठी मी जंक फूड आणि फास्ट फूड आपल्या खाण्यातून हटवले. ऑफिस मीटिंग्समध्ये चहा, कॉफी, स्नॅक्सचे सेवन कमी केले आणि घरी बनण्यावर जोर दिला. याशिवाय खाण्यात शरीराच्या गरजेनुसार सलाड, डाळ, चपाती आणि भाताचे सेवन करत असे. भरपूर पाणी पिणे. पायी चालत जाणे. याशिवाय सकाळच्या वेळेस झुम्बा, प्राणायामसारख्या अॅक्टिव्हिटी करणे गरजेचे होते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी