sugar control: शुगर कमी करण्यासाठी हे पान आहे प्रभावी; आजच करा डाएटमध्ये समावेश 

तब्येत पाणी
Updated Jun 14, 2022 | 09:30 IST | टाइम्स नाऊ मराठी

Sugar Control । पानांना नैसर्गिक औषध म्हणून देखील ओळखले जाते. मात्र कमी लोकांना माहित असेल की बेलाच्या पानाचे सेवन केल्याने अनेक प्रकारचे फायदे होतात. याचे सेवन केल्याने अनेक प्रकारच्या समस्या देखील दूर होतात.

This leaf is effective for reducing sugar in the body
शुगर कमी करण्यासाठी हे पान आहे प्रभावी, वाचा सविस्तर   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • पानांना नैसर्गिक औषध म्हणून देखील ओळखले जाते.
  • ॲसिडीटी दूर करण्यासाठी देखील हिरव्या पानांचा खूप उपयोग होतो.
  • आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये स्वत:ला तंदुरूस्त ठेवणे खूप कठीण होत आहे.

Sugar Control । मुंबई : पानांना नैसर्गिक औषध म्हणून देखील ओळखले जाते. मात्र कमी लोकांना माहित असेल की बेलाच्या पानाचे सेवन केल्याने अनेक प्रकारचे फायदे होतात. याचे सेवन केल्याने अनेक प्रकारच्या समस्या देखील दूर होतात. लक्षणीय बाब म्हणजे बेलपत्र ॲण्टीऑक्सिडंट आणि पौष्टिक घटकांनी समृद्ध आहे. यामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, रिबोफ्लोबिन, कॅल्शियम, पोटॅशियम, फायबर, व्हिटॅमिन बी१, बी६, बी१२ असते. चला तर मग जाणून घेऊया याशिवाय बेलपत्र खाण्याचे फायदे आणि त्यामुळे साखर कशी नियंत्रणात राहते. (This leaf is effective for reducing sugar in the body). 

अधिक वाचा : दहावीच्या निकालाला उरले काही तास

हे आहेत हिरवे पान खाण्याचे फायदे

  1. ॲसिडीटी दूर करण्यासाठी देखील हिरव्या पानांचा खूप उपयोग होतो. ॲसिडीटीच्या समस्येमध्ये तुम्ही बेलाची पाने हलके मीठ आणि काळी मिरी सोबत चघळू शकता. यामुळे तुम्हाला ॲसिडीटीपासून आराम मिळू शकतो. 
  2. लक्षणीय बाब म्हणजे बेलाचे पान पोट साफ करण्याचे काम करते. यात लॅक्सेटिव्ह गुणधर्म आहेत, जे पाचन तंत्र मजबूत करण्यास मदत करतात. त्यामुळे जर तुम्हाला पचनाची समस्या असेल तर बेल किंवा बेलाच्या पानांचे सेवन करा. 

डाएटमध्ये समावेश करा बेलाची पाने

आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये स्वत:ला तंदुरूस्त ठेवणे खूप कठीण होत आहे. अशा स्थितीत अनेक प्रकारच्या समस्या लोकांना घेरू लागतात. यामध्ये डायबिटीज, हृदयविकाराचा झटका, उच्च कोलेस्टेरॉल यांसारख्या घातक आजारांचा समावेश आहे. अशा परिस्थितीत बेलपत्राची पाने खाल्ल्याने तुम्हाला नक्कीच फायदा होईल. 

डिस्क्लेमर : सल्ल्यासह ही सामग्री केवळ सामान्य माहिती प्रदान करते. हे कोणत्याही प्रकारे पात्र वैद्यकीय मताचा पर्याय नाही. अधिक तपशिलांसाठी नेहमी तज्ञ किंवा तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. Timesnow मराठी या माहितीची जबाबदारी घेत नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी