Weight Loss Tips : तुमच्या किचनमध्येच आहे लठ्ठपणाचं उत्तर! हा एकच पदार्थ उतरवेल सगळी चरबी

वजन कमी करण्यासाठी अनेक उपाय लोक शोधत असतात. मात्र सर्वात परिणामकारक उपाय तर आपल्याच किचनमध्ये लपलेला असतो.

Weight Loss Tips
तुमच्या किचनमध्येच आहे लठ्ठपणाचं उत्तर  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतो मसाल्याचा पदार्थ
  • दालचिनीमुळे फटाफट कमी होतं वजन
  • तीन महिन्यात जाणवेल फरक

Weight Loss Tips : गेल्या काही वर्षात भारतात लठ्ठपणाची (Obesity) समस्या जोर धरते आहे. चुकीचा आहार, अयोग्य लाईफस्टाईल (Lifestyle) आणि व्यायामाचा (Exercise) अभाव यामुळे अनेकांचं वजन वाढत चाललं असून लठ्ठपणाची समस्या निर्माण होत आहे. लठ्ठपणामुळे वजन तर वाढतंच मात्र त्याचबरोबर इतरही अनेक आजार जडतात आणि ते बळावू लागतात. वेळीच यावर उपाय केले नाहीत, तर अगोदर छोट्या छोट्या वाटणाऱ्या समस्या हळूहळू मोठ्या व्हायला सुरुवात होते आणि काही काळाने तर प्रश्न हाताबाहेर जातात. काही आजार हे त्यांच्या सुरुवातीच्या टप्प्यातच घरगुती उपायांनी नियंत्रणात आणता येतात. त्यानंतर मात्र वैद्यकीय उपचारांशिवाय कुठलाही पर्याय उरत नाही. लठ्ठपणा कमी करण्यासाठी आणि वजन वाढण्याचा प्रवास उलटा करण्यासाठी काही सोपे घरगुती उपाय आणि पदार्थ उपयोगी असतात. त्यातीलच एक पदार्थ म्हणजे दालचिनी. प्रत्येकाच्या घरी सहज उपलब्ध असणारा हा पदार्थ योग्य प्रकारे वापरला, तर वजन फटाफट कमी व्हायला (Weight Loss) सुरुवात होते. दालचिनीपासून ड्रिंक तयार करून ते रोजच्या रोज प्यायल्यामुळे वजन कमी होण्याची प्रक्रिया वेग धरू शकते. जाणून घेऊया याबाबतच्या काही टिप्स. 

दालचिनीमुळे होतं वजन कमी

आपल्या किचनमध्ये सहजपणे आढळणारा पदार्थ म्हणजे दालचिनी. घरात नसेल तर आजूबाजूला कुठल्याही किराणा सामानाच्या दुकानात हा पदार्थ सहजपणे उपलब्ध होतो. दालचिनी हा वेटलॉससाठी फारच उपयुक्त घटक मानला जातो. दालचिनीमुळे पचनक्रिया सुधारते, जो वजन कमी करण्यासाठीचा सर्वात मोठा मुद्दा ठरतो. दालचिनीच्या सेवनामुळे भूक लागण्याचं प्रमाण कमी होतं आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित होण्यास मदत होते. नियमितपणे दालचिनीचा समावेश आहारात केला तर वजन कमी होऊन शरीरातील चरबी घटू लागण्याची प्रक्रिया सुरू होते. 

दालचिनीचा चहा

दालचिनी कुटून ती तुलशीची पानं आणि आलं यासह चहासाठी वापरा. त्यामुळे तुम्हाला लज्जतदार चहाचा आस्वाद घेता घेताच वजन कमी करण्याचा फायदा मिळू शकेल. 

शरीर होईल सुडौल

जर तुम्हाला चहा प्यायचा नसेल तर तुम्ही दालचिनीचं वेगळ्या प्रकारचे ड्रिंक बनवू शकता. दालचिनी पाण्यात घालून उकळा. पाणी अर्ध होईपर्यंत उकळल्यानंतर हे पाणी गाळून घ्या. त्यात लिंबू आणि मध घालून त्याचं सेवन करा. यामुळे चहापेक्षाही अधिक चांगला परिणाम होईल आणि वेगाने तुमच्या शरीरातील चरबी वितळायला सुरुवात होईल. 

अधिक वाचा - Morning Habits : 'या'5 सवयी तुमचा मूड दिवसभर फ्रेश आणि सकारात्मकता टिकवून ठेवतील

असं बनवा ड्रिंक

१. दोन कप पाणी उकळा

२. पाणी उकळायला सुरुवात झाल्यानंतर त्यात दालचिनी टाका

३. काही वेळ पाणी उकळू द्या

४. पाणी अर्ध झाल्यानंतर गॅस बंद करून पाणी गाळून घ्या

५. पाण्यात थोडं लिंबू पिळा आणि चमचाभर मध घाला

६. थोडंसं कोमट झाल्यावर ते पिऊन टाका

तीन महिन्यात दिसेल परिणाम

दालचिनीचा वापर करायला सुरुवात केल्यानंतर साधारण तीन महिन्यांनी वजनात फरक पडल्याचं दिसतं. अर्थात यासाठी आहारावर नियंत्रण ठेवणं आणि नियमित व्यायाम करणंही गरजेचं आहे. 

डिस्क्लेमर - वजन कमी करण्यासाठीच्या या सामान्य टिप्स आहेत. तुम्हाला वजनासंबंधी काही गंभीर समस्या असेल, तर डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घेण्याची गरज आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी