Mobile Addiction : तारुण्यात कमकुवत होऊ लागलीय युवकांची 'ही' शक्ती, Phone आणि Wi-Fi रेडिएशनमुळे होतंय नुकसान

आजच्या काळात मोबाईल ही अशी वस्तु बनली आहे, ज्याच्याशिवाय कोणतंही काम होऊ शकत नाही. मोबाईलफोन (Mobile Phone) हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनलाय. अगदी सगळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण मोबाईलला आपल्यापासून लांब करत नाही. परंतु तुम्हाला माहिती आहे का, हे एक व्यसन आहे, जे आपल्याला जडलं असून यामुळे तुम्ही अल्जायमर (Alzheimer) आजाराचे (disease) शिकार होत आहात. 

The 'this' power of youth begins to weaken in youth
तारुण्यात कमकुवत होऊ लागलीय युवकांची 'ही' शक्ती  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • फोनच्या वापरातून बाहेर पडणाऱ्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्सचा आपल्या मेंदूवर खूप वाईट परिणाम होतो.
  • मोबाईल फोन, इंटरनेट आणि वाय-फायचे महत्त्व लोकांच्या आयुष्यात खूप वाढले आहे. अशा परिस्थितीत फोनचे दुष्परिणामही अधिक वाढले
  • जर आपला मेंदू दीर्घकाळ इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्डच्या प्रभावाखाली असेल, तर अल्झायमरची समस्या वृद्धापकाळाच्या आधीच येऊ शकते.

मुंबई : आजच्या काळात मोबाईल ही अशी वस्तु बनली आहे, ज्याच्याशिवाय कोणतंही काम होऊ शकत नाही. मोबाईलफोन (Mobile Phone) हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनलाय. अगदी सगळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण मोबाईलला आपल्यापासून लांब करत नाही. परंतु तुम्हाला माहिती आहे का, हे एक व्यसन आहे, जे आपल्याला जडलं असून यामुळे तुम्ही अल्जायमर (Alzheimer) आजाराचे (disease) शिकार होत आहात. 
मोबाईल फोन आणि वाय-फायच्या रेडिएशनमुळे तुमची स्मरणशक्ती कमी होत असल्याचा दावा अल्झायमर रिसर्च जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनात करण्यात आलाय. 

शास्त्रज्ञांच्या मते, सेल फोन आणि वाय-फायमधून निघणाऱ्या रेडिएशनमुळे लोकांच्या मेंदूच्या पेशींमध्ये कॅल्शियमचे प्रमाण वाढत आहे, जे अल्झायमर रोगाचे मुख्य कारण आहे. अल्झायमर हा एक आजार आहे ज्यामध्ये स्मरणशक्ती कमजोर होते. संशोधकांना त्यांच्या संशोधनात असे आढळून आले आहे की, फोनच्या वापरातून बाहेर पडणाऱ्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्सचा आपल्या मेंदूवर खूप वाईट परिणाम होतो. संशोधकांचा असा विश्वास आहे की, सर्व वायरलेस कम्युनिकेशन सिग्नल आपल्या मेंदूतील कॅल्शियम वाहिन्यांद्वारे सक्रिय केले जातात. यामुळे, आपल्या मेंदूमध्ये कॅल्शियमचे प्रमाण अचानक वाढते, ज्यामुळे अल्झायमर रोग वेळेपूर्वी होऊ शकतो.

संशोधनात धक्कादायक खुलासा

यावर दिल्लीतील मॅक्स हॉस्पिटलचे वरिष्ठ न्यूरोलॉजिकल कन्सल्टंट डॉ. राजीव गुप्ता सांगतात की, मोबाईल फोन, इंटरनेट आणि वाय-फायचे महत्त्व लोकांच्या आयुष्यात खूप वाढले आहे. अशा परिस्थितीत फोनचे दुष्परिणामही अधिक वाढले आहेत. लोकांनी आता त्यांच्या छोट्या-मोठ्या गरजांसाठी फोनवरच अवलंबून राहायचे आहे. ज्यामुळे ते फोनशिवाय राहू शकत नाही. परंतु हे तुमच्या आरोग्यासाठी फारच धोकादायक आहे.नेहमी फोनला चिकटून राहिल्यामुळे, लोकांना वजन वाढणे, शारीरिक हालचालींचा अभाव आणि डोळ्यांच्या समस्या वाढणे अशा समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. याशिवाय लोकांच्या मेंदूचा वापर कमी करून त्यांची स्मरणशक्तीही कमी झाली आहे.

25 वर्षांनी स्मरणशक्ती कमी होणे सुरू झाले

याआधीही अनेक संशोधनांमध्ये असे आढळून आले आहे की, अल्झायमरशी संबंधित बदलांची लक्षणे ही लोकांच्या वयोवर्षे 25 आधीच दिसू लागतात. संशोधनात त्याचा असा ही परिणाम दिसून आला आहे की, जर आपला मेंदू दीर्घकाळ इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्डच्या प्रभावाखाली असेल, तर अल्झायमरची समस्या वृद्धापकाळाच्या आधीच येऊ शकते. डॉक्टरांच्या मते, अल्झायमर असलेल्या लोकांचे सरासरी वय गेल्या 20 वर्षांत कमी झाले आहे.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी