Weight Loss Tips: खूप मेहनत करूनही कमी होत नाही आहे बेली फॅट, ही असू शकतात कारणे

तब्येत पाणी
Updated Oct 21, 2020 | 16:00 IST | टाइम्स नाऊ मराठी

Weight Loss Tips: येथे आम्ही तुम्हाला लाईफस्टाईलशी संबंधित चुकीच्या सवयींबाबत सांगत आहोत ज्या तुमची पोटाची चरबी कमी करण्यास अडथळा आणतात. 

Belly fat
खूप मेहनत करूनही कमी होत नाही आहे बेली फॅट, ही असणार कारणे 

थोडं पण कामाचं

  • आपली लाईफस्टाईल वजन कमी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. 
  • तणाव आपल्या शरीरासाठी सगळ्यात हानिकारक असतो
  • तुम्हाला पोट फ्लॅट ठेवायचे असेल तर स्मोकिंग बंद करा.

मुंबई: केवळ एक्सरसाईज करून पोटाची चरबी कमी होऊ शकत नाही. ट्रेडमिलवर तासान् तास घालवणे आणि खूप घाम गाळल्याने वजन तर कमी होते मात्र पोटाची चरबी काही कमी होत नाही. ही कमी करण्यासाठी तुम्हाला भरपूर मेहनत घ्यावी लागते. यातच तुम्ही भरपूर मेहनत घेऊनही तुमच्या पोटाची चरबी कमी होत नाही आहे का? तर तुम्हाला काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. तसेच तुमच्या लाईफस्टाईलवरही विशेष लक्ष दिले पाहिजे. आपली लाईफस्टाईल वजन कमी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. 

चुकीचे खाणे - पोटाची चरबी वाढवण्यासाठी अनहेल्दी फूड कारण ठरतात. स्टार्चयुक्त कार्बोहायड्रेट आणि खराब कोलेस्ट्रॉल असलेल्या पदार्थांमुळे आपल्या शरीरात चरबीचे प्रमाण वाढते. यासाठी तुम्हाला तुमच्या खाण्याच्या पद्धतीत बदल केला पाहिजे. तसेच रोजच्या आहारात हिरव्या भाज्या, प्रोटीन आणि चांगले फॅट्स असलेल्या पदार्थांचा समावेश केला पाहिजे. 

स्मोकिंग - स्मोकिंगची सवय तुमच्या पोटाची तसेच आतड्यांची चरबी वाढवते. यासाठी जर तुम्हाला पोट फ्लॅट ठेवायचे असेल तर स्मोकिंग बंद करा.

खूप तणाव - तणाव आपल्या शरीरासाठी सगळ्यात हानिकारक असतो. ज्यामुळे संपूर्ण आरोग्यावर त्याचा परिणाम होतो. ज्याप्रमाणे तुमचे तणाव हार्मोन ज्यांना कोर्टिसोल म्हणतात त्यांचा स्तर वाढला की तुमच्या पोटाची चरबी वाढते. आपला तणाव कमी करण्यासाठी तुम्ही योगा अथवा मेडिटेशन करू शकतात तसेच डॉक्टरांशीही याबाबत चर्चा करू शकतात. 

बियरचे सेवन - बीअरमध्ये सर्वाधिक कॅलरी आणि कार्ब्स असतात. जर तुम्ही मोठ्या प्रमाणात बीअरचे सेवन केले आणि कोणत्याही प्रकारची एक्सरसाईज केली नाही तर त्यामुळे पोटाची चरबी वाढते. यातच तुम्हाला जर बीअर पिण्याची आवड असेल तर तुम्हाला त्यासोबत एक्सरसाईज करणेही गरजेचे आहे. 

पाणी न पिणे - पुरेसे पाण्याचे सेवन आपले वजन कमी करण्यात आणि पोटाची चरबी घटवण्यात मदत करतात. मात्र जेव्हा तुम्ही पाणी पित नाही तेव्हा याचा परिणाम तुमच्यावर होतो. यासाठी जेवढे शक्य असेल तेवढे पाणी प्या. तसेच कोल्ड्रिंकपासून दूर राहा. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी