sugar:ही लक्षणे दिसल्यास डाएटमधून लगेच कमी करा शुगर

तब्येत पाणी
Updated Oct 15, 2021 | 14:45 IST | टाइम्स नाऊ मराठी

जेवणामध्ये शुगरचे प्रमाण अधिक असल्यास तुम्हाला अनेक आजार सतावू शकतात. काही लक्षणांवरून समजू शकते की तुम्हाला आहारातून साखरेचे प्रमाण कमी केले पाहिजे. 

diabetes
ही लक्षणे दिसल्यास डाएटमधून लगेच कमी करा शुगर 
थोडं पण कामाचं
  • अधिक साखर खाल्ल्याने तुमची इम्युनिटी कमी होते. 
  • यामुळे वजन वाढणे, फॅटी लिव्हर, डायबिटीजचाही धोका सतावतो. 
  • यामुळे हृदयाच्या आरोग्यावरही परिणाम होतो. 

मुंबई: तुम्ही जर जेवणात मोठ्या प्रमाणात साखरेचा वापर करत असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. मोठ्या प्रमाणात साखर खाल्ल्याने तुम्हाला अनेक प्रकारचे आजार सतावू शकतात. तसेच कधी तुम्ही साखरेचे प्रमाण कमी केले पाहिजे याचे संकेत आपले शरीर आपल्याला देते. 

इम्युनिटी होते कमकुवत

साखरयुक्त पदार्थ खाण्याचे सगळ्यात मोठे नुकसान म्हणजे यामुळे आपली इम्युनिटी कमकुवत होते. एक्सपर्ट्सच्या मते अधिक साखर खाल्ल्याने वजन वाढणे, फॅटी लिव्हर आणि टाईप २ डायबिटीजचा धोका वाढतो. तसेच यामुळे हृदयाच्या आरोग्यावरही परिणाम होतो. तसेच कॅन्सरचा धोकाही वाढतो. 

शरीराला सूज येण्याची समस्या

शुगरचे प्रमाण अधिक झाल्यास शरीरात सूज निर्माण होते. तसेच यामुळे स्किनवर एजिंगचे निशाण दिसू लागतात. यामुळे स्किनमदून कोलॅजन आणि इलास्टिनला नुकसान पोहोचत. आणि स्किन लूज होण्यास सुरूवा होते. यामुळे दातांशी संबधित समस्या येतात. 

हाय ब्लडप्रेशर

केवळ मीठच नव्हे तर साखरेमुळेही ब्लड प्रेशर वाढण्याचा धोका असतो. स्टडीनुसार ब्लड प्रेशर मेंटेन ठेवण्यासाठी साखरेचे अधिक प्रमाणही धोकादायक ठरू शकते. 

वजन वाढणे

जर तुम्ही जास्त खात असाल तर कॅलरीजचे प्रमाण वाढते. यातून प्रोटीन आणि फायबरसारखी तत्वे नसतात. यामुळे हे खाण्याने पोट भरत नाही आणि तुमचे सतत खाण्याचे मन करते. साखरेमुळे शरीरात इन्सुलिनचे प्रमाण वाढते. 

झोपेची समस्या

रात्रीच्या वेळेस साखरेचे पदार्थ खाल्ल्यास तुमच्या झोपेवरही परिणाम होऊ शकतो. अमेरिकन जर्नल ऑफ लाईफस्टाईल मेडिसिन मध्ये छापलेल्या एका स्टडीनुसार जास्त प्रमाणात साखर खाल्ल्याने झोपेची समस्या निर्माण होते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी