Healthy Fruit: विचित्र दिसणारे हे फळ आहे या 6 आजारांचे औषध, पुरुषांसाठीही आहे वरदान

तब्येत पाणी
Updated Mar 29, 2021 | 11:42 IST | टाइम्स नाऊ मराठी

लिचीसारखे दिसणारे हे रामबुतान नावाचे फळ फक्त खाण्यासाठीच नाही, तर आरोग्यासाठीही अतिशय लाभदायक असते. यात भरपूर प्रमाणात तंतूमय पदार्थ, जीवनसत्वे, लोह आणि झिंक असते. जाणून घ्या याचे फायदे.

Rambutan
विचित्र दिसणारे हे फळ आहे या 6 आजारांचे औषध, पुरुषांसाठीही आहे वरदान  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • कामोत्तेजक म्हणून काम करते रामबुतान
  • कर्करोग थांबवण्यास मदत करते हे फळ
  • हृदयाचे आरोग्य सुधारते

नवी दिल्ली - निसर्गाने (Nature) आपल्याला अशी अनेक फळे (fruits) दिली आहेत जी चवीसोबतच (taste) आरोग्यासाठी (health) लाभदायक (beneficial) असलेल्या तत्वांनीही (ingredients) भरलेली आहेत. असेच एक फळ म्हणजे लिचीसारखे (litchi) दिसणारे रामबुतान (Rambutan), जे दक्षिण भारतातील (Southern India) केरळ (Kerala), कर्नाटक (Karnataka) आणि तामीळनाडूसारख्या (Tamil Nadu) राज्यांमध्ये  मोठ्या प्रमाणावर आढळते. लिचीप्रमाणेच हेही तब्येतीसाठी लाभदायक असणाऱ्या अनेक गोष्टींनी भरलेले असते जे आपण नजरेआड करू शकत नाही. याची चव हलकी गोड आणि आंबट असते. यामुळे रोगप्रतिकारशक्ती (immunity) वाढते.

कामोत्तेजक म्हणून काम करते रामबुतान

काही सूत्रांचे म्हणणे आहे की रामबुतानची पाने कामोत्तेजक म्हणून काम करतात. ही पाने पाण्यात बुडवून त्यांचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे कामेच्छा वाढवण्याची संप्रेरके सक्रीय करण्यात मदत होते. रामबुतानमध्ये प्रजननक्षमता वाढवण्याचीही ताकद असल्याचे म्हटले जाते, मात्र यावर संशोधन चालू आहे.

जंतूरोधक गुणांनी भरलेले आहे रामबुतान

अनेक संशोधनांमधून दिसून आले आहे की या फळाचा उपयोग प्राचीन काळापासून जंतूरोधक म्हणून केला जात असे. काही अभ्यासातून असे समोर आले आहे की यात अँटीसेप्टिक गुणही असतात जी शरीराला अनेक प्रकारच्या संक्रमणांपासून वाचवतात. या फळामुळे जखमा लवकर भरतात.

कर्करोग थांबवण्यास मदत करते हे फळ

रामबुतान हे भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असलेले फळ आहे जे कर्करोगाला थांबवू शकते. या फळातील निवडक तत्व शरीराला आलेली सूज कमी करतात आणि शरीरातील पेशींचे संरक्षण करतात. या फळातील जीवनसत्व क सुद्धा यात मदत करते आणि कर्करोगापासून सुरक्षा देते. रामबुतानमुळे कर्करोगाच्या पेशींची वाढ संथ होते. याचा उपयोग यकृताच्या कर्करोगाच्या उपचारासाठीही केला जाऊ शकतो. एका अन्य अहवालानुसार दररोज पाच रामबुतान खाल्ल्याने कर्करोगाचा धोका कमी होतो.

​मधुमेहाचा इलाज

चीनच्या विज्ञान आणि उद्योग विद्यापीठ, कुनमिंग यांच्या एका अभ्यासानुसार रामबुतानच्या सालात मधुमेहरोधी गुण असतात हे आढळले. टाईप-2 मधुमेहाचा त्रास असलेल्या उंदरांना रामबुतानच्या सालातील अर्काचे इंजेक्शन टोचण्यात आल्यानंतर लगेच फरक दिसून आला. रक्तातील शर्करेचे प्रमाण नियंत्रणात आल्याचे आढळले. 

हृदयाचे आरोग्य सुधारते

रामबुतानमध्ये भरपूर तंतुमय पदार्थ असतात जे कोरोनरी हृदयरोगाची जोखीम कमी करतात. यामुळे उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासही मदत मिळते आणि कॉलेस्ट्रॉलची पातळीही कमी होते.

हाडे करते मजबूत

रामबुतानमध्ये बऱ्याच प्रमाणात फॉस्फरस असतो ज्यामुळे हाडांचे आरोग्य चांगले राहते. यातील जीवनसत्व क सुद्धा हाडांसाठी चांगले असते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी