superfood: हे सुपरफूड कमी करेल कोलेस्ट्रॉल, निरोगी ठेवेल हृदयाचे आरोग्य

तब्येत पाणी
Updated Nov 17, 2021 | 17:21 IST | टाइम्स नाऊ मराठी

Eat grapes: डिसेंबरच्या ३१ तारखेला स्पेनमध्ये १२ द्राक्षे खाऊन सरत्या वर्षाला निरोप देण्याची आणि नव्या वर्षाचे स्वागत करण्याची परंपरा आहे.

grapes
हे सुपरफूड कमी करेल कोलेस्ट्रॉल, निरोगी ठेवेल हृदयाचे आरोग्य 
थोडं पण कामाचं
  • हा डिटॉक्स ज्यूस कोलेस्ट्रॉलची पातळी घटवण्यास मदत करतो
  • द्राक्षे हे सुपरफूड आहे ज्यामुळे आरोग्यास भरपूर फायदा होते. 
  • थंडीच्या दिवसांत जरूर खावीत द्राक्षे

मुंबई: थंडीचा हंगाम(winter season) सुरू झाला की बाजारात संत्री, द्राक्षे(grapes) अशी आंबट फळे येण्यास सुरूवात होते. थंडीच्या दिवसांत द्राक्षे मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात. द्राक्षे हे असे फळ आहे जे अनेक गुणांनी परिपूर्ण आहे. त्याचे आरोग्यस(health benefit) अनेक फायदे आहेत त्यामुळेच याला सुपरफूड असेही म्हटले जाते. वैज्ञानिक अभ्यासानुसारही हे सिद्ध झाले आहे. यासंबंधित केलेले संशोधन न्यूट्रिएन्ट्स या सायन्टिफिक जर्नलमध्येही प्रकाशित झाले आहे. डिसेंबरच्या ३१ तारखेला स्पेनमध्ये(spain) १२ द्राक्षे खाऊन सरत्या वर्षाला निरोप देण्याची आणि नव्या वर्षाचे(new year) स्वागत करण्याची परंपरा आहे. अनेकजण जरी याकडे दुर्लक्ष करत असले तरी अशा प्रकारची परंपरा म्हणजे म्हणजे नव्या वर्षाचे स्वागत निरोगीपणाने करणे आहे. द्राक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात आरोग्यासाठी फायदे असतात त्यामुळेच स्पेनमध्ये द्राक्षे खाल्ली जातात. this superfood will reduce chloestrol

द्राक्षे आहेत सुपरफूड

  1. द्राक्षे खाल्ल्याने पोटातील चांगले बॅक्टेरिया वाढण्यास मदत होते. द्राक्षे खाल्ल्याने बद्धकोष्ठतेचा त्रासही दूर होतो. तसेच भूकही लागण्यास मदत होते. 
  2. यामुळे आरोग्य चांगले राखले जाते. 
  3. तसेच द्राक्षांचे सेवन केल्याने कोलेस्ट्रॉलची पातळीही घटण्यास मदत होते. त्यामुळेच कोलेस्ट्रॉल घटवण्यासाटी हे सुपरफूड मदत करते. शरीरात रक्ताची कमतरता असल्यास द्राक्षांचे सेवन करावे. यामुळे हिमोग्लोबिनही वाढते. 
  4. डायबिटीजनी त्रस्त असलेल्या लोकांनी द्राक्षांचे सेवन जरूर करावे. द्राक्षांमुळे ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात येण्यास मदत होते. 
  5. द्राक्षे म्हणजे अँटी ऑक्सिडंटचा उत्तम स्त्रोत आहे. यातील अनेक तत्वे कॅन्सरसारखा आजार रोखण्यास मदत करतात. तसेच हृदयाचे आरोग्य निरोगी राखण्याचे काम करतात. 
  1. तुम्हाला मायग्रेनचा त्रास असल्यास द्राक्षांचा रस यावर गुणकारी ठरतो. 
  2. द्राक्षात व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी यासह मोठ्या प्रमाणात पोटॅशियम आणि कॅल्शियम असते. त्याशिवाय यामध्ये फ्लेव्होनॉइड नावाचा शक्तिशाली अँटीऑक्सिडंट असतो जो शरीरासाठी अत्यंत फायदेशीर मानला जातो.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी