Belly Fat पासून सुटका मिळवण्यात उपयोगी येतील ६ टिप्स

तब्येत पाणी
Updated Sep 07, 2021 | 15:01 IST | टाइम्स नाऊ मराठी

लेट नाईट डिनर केल्याने पचनक्रिया मंदावते. तसेच ब्लड शुगर लेव्हलही वाढते. 

Belly fat
Belly Fat पासून सुटका मिळवण्यात उपयोगी येतील ६ टिप्स 
थोडं पण कामाचं
  • तज्ञांच्या मते रात्रीचे जेवण वेळेत करणे गरजेचे आहे. रात्री उशिरा जेवल्याने पचनक्रिया मंदावते.
  • जर तुम्हाला बेली फॅटपासून सुटका मिळवायची असेल तर हलके पदार्थ खा.
  • वजन कमी करायचे असल्यास भरपूर पाणी प्या. पाणी पित राहिल्याने पोट भरलेले राहते

मुंबई: आजकालच्या फिटनेस फ्रीक जमान्यात कोणालाच बेली फॅट नकोय. लोक बेली फॅट कमी करण्यासाठी सतत प्रयत्न करत असतात. बेली फॅट केवळ लोकांच्या पर्सनॅलिटीवरच परिणाम करत नाही तर यामुळे आरोग्यासंबंधी आजारांचा धोका वाढतो. अशातच लोक फ्लॅट टमी मिळवण्यासाठी विविध प्रयत्न करत असतात. दरम्यान, डाएट आणि लाईफस्टाईलसंबंधी काही गोष्टींचे लक्ष ठेवले असता तुम्ही सुटलेले पोट कमी करू शकता. 

रात्रीचे जेवण लवकर घ्या.

आरोग्य तज्ञांच्या मते रात्रीचे जेवण वेळेत करणे गरजेचे आहे. रात्री उशिरा जेवल्याने पचनक्रिया मंदावते. यामुळे ब्लड शुगरही वाढण्याची शक्यता असते. यामुळे ब्लोटिंग आणि पोटाजवळचे फॅट वाढते. तज्ञांच्या मते संध्याकाळी सात ते साडेसातदरम्यान जेवले पाहिजे.

पाणी पित राहा

वजन कमी करायचे असल्यास भरपूर पाणी प्या. पाणी पित राहिल्याने पोट भरलेले राहते आणि ज्यामुळे शरीरात कॅलरीजचे प्रमाण वाढत नाही. दिवसभरातून कमीत कमी ८ ग्लास पाणी प्या. सोबतच लिंबू, द्राक्षे, संत्रीसारखी फळे घालून डिटॉक्स ड्रिंक प्या.

नट्सचे सेवन

खूप वेळ उपाशी राहणे हा काही वजन घटवण्याचा योग्य मार्ग नाही. अशातच स्नॅक्स म्हणून तुम्ही मध्ये मध्ये नट्सचे सेवन करू शकता. फायबर, प्रोटीन, हेल्दी फॅट, व्हिटामिन्स आणि मिनरल्सचा चांगला स्त्रोत म्हणून नट्स खाल्ले जातात.

 

फळे खा

जर तुम्हाला बेली फॅटपासून सुटका मिळवायची असेल तर हलके पदार्थ खा. तसेच जे पदार्थ पोटात सूज निर्माण करतील अशा पदार्थांपासून दूर राहा. वजन घटवणे आणि बेली फॅट कमी करण्यासाठी फळांचे सेवन फायदेशीर ठरते. 

एक्सरसाईज करा

तज्ञांच्या मते ८ ते १० मिनिटे सिंपल फुल बॉडी वर्कआऊट केल्याने कोर मसल्स मजबूत होतात. तसेच वेस्ट साईजही कमी होते. 

झोप पूर्ण करा

तज्ञांच्या मते झोपेच्या कमतरतेमुळे शरीरातील फॅट ३२ टक्के वाढतात. अशातच कमीत कमी रात्री ६ ते ७ तासांची झोप घ्या. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी