या टिप्सनी दातांचा पिवळेपणा होईल चटकन दूर

तब्येत पाणी
Updated Jan 06, 2021 | 18:06 IST | टाइम्स नाऊ मराठी

जर तुम्हीही पिवळ्या दातांनी हैराण आहात आणि पांढरेशुभ्र तसेच चमकदार दात हवे असतील तर आजच या टिप्सचा वापर करा. 

teeth
दातांचा पिवळेपणा होईल चटकन दूर 
थोडं पण कामाचं
  • दांताचा पिवळेपणा दूर करण्यासाठी जरूर वापरा या टिप्स
  • मोहरीचे तेल आणि मीठ दातांचा पिवळेपणा दूर करते
  • संत्र्याचे साल  दातांचा पिवळेपणा दूर करून त्यांना चमकदार बनवते. 

मुंबई: दातांचा पिवळेपणा हा मनुष्याच्या सौंदर्यात अडथळा टाकतो. तुम्हीही जर या समस्येने ग्रस्त असाल तसेच तुम्हालाही पांढरेशुभ्र आणि चमकदार दात हवे असतील तर काही घरगुती टिप्सचा जरूर वापर करा. आम्ही तुम्हाला सांगत आहोत सोपे घरगुती उपाय ज्याच्या मदतीने तुम्ही तुमचे दात चमकदार आणि पांढरेशुभ्र बनवू शकता. 

अनेक सुंदर दिसण्यासाठी बरेच जण बॉलिवूड सेलिब्रेटीजच्या ब्युटी टिप्स फॉलो करत असता. अनेकदा त्यांच्यासारखे सफेद तसेच मोत्यासारखे चमकदार हवेत अशी अनेकांची इच्छा असते. हसताना जर पिवळे दात दिसले तर ते आपल्या शरमेने मान खाली घालायला लावतात. सुंदर दिसण्यासोबतच ते आपल्या पर्सनॅलिटीवरही प्रभाव टाकतात. यासाठी आम्ही आज तुम्हाला काही घरगुती उपाय सांगणार आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही तुमचे दात मोत्यांसारखे शुभ्र बनवू शकता. 

मोहरीचे तेल आणि मीठ

दांतांचा पिवळेपणा दूर करण्यासाठी तसेच मजबूत बनवण्यासाठी मोहरीचे तेल आणि मीठ हा रामबाण उपाय आहे. यामुळे केवळ दातांचा पिवळेपणा दूर होत नाही तर तोंडातील बॅक्टेरियाही नष्ट होतात. यासाठी सगळ्यात आधी एक छोटा चमचा मीठामध्ये तीन ते चार थेंब मोहरीचे तेल टाका. याने तुमच्या दातांना तीन ते चार मिनिटे मसाज करा. हळूहळू तुमच्या दातांचा पिवळेपणा संपून जाईल तसेच दातांसंबंधी आजारापासून सुटका मिळवाल. 

केळ्याचे साल

दात सफेद आणि चमकदार बनवण्यासाठी तुम्ही केळ्याचे सालही वापरू शकता. केळे जितके आरोग्यासाठी चांगले आहे तितकेच त्याचे सालही फायदेशीर आहे. यासाठी सकाळी ब्रश करण्याआधी केळ्याच्या सालीचा पांढरा भाग आपल्या दातांवर एक ते दोन मिनिटे चोळा. यानंतर ब्रश करा. असे आठवड्यातून तीन ते चार वेळा केल्यास दातांचा पिवळेपणा दूर होण्यास मदत होईल तसेच दातही मजबूत होतील. 

बेकिंग सोडा लिंबू पेस्ट

दातांना सफेद आणि चमकदार बनवण्यासाठी बाजारातील महागडे अँटी ऑक्सिडंटच्या तुलनेत घरगुती उपाय फायदेशीर ठरतात. यासाठी छोट्या वाटीत एक ते अर्धा चमचा बेकिंग सोडा घ्या. त्यात अर्ध्या कापलेल्या लिंबाचा रस मिसळा. एक ते दोन मिनिटे चांगले मिसळा. ही पेस्ट आपल्या टूथब्रशवर लावून अर्धा ते एक मिनिट आपल्या दातांवर चोळा,. दरम्यान एका मिनिटापेक्षा अधिक वेळ ही पेस्ट आपल्या दातांवर ठेवू नका. असे आठवड्यात दोन ते तीन वेळा केल्यास दातांचा पिवळेपणा दूर होण्यास मदत होईल. 

लिंबाची साल

लिंबाची साल दातांचा पिवळेपणा दूरकरण्यास रामबाण उपाय आहे. यासाठी जेवल्यानंतर लिंबाची साल दोन ते तीन मिनिटे आपल्या दातांवर रगडा. आठवड्यातून तीन ते चार वेळा असे केल्याने दातांचा पिवळेपणा दूर होण्यास मदत होईल. तुम्ही लिंबाच्या रसानेही चूळही भरू शकता. यासाठी एक चमचा लिंबाच्यारसात तितक्या प्रमाणात पाणी मिसळा. जेवल्यानंतर या पाण्याने चूळ भरा. असे केल्याने दातांचा पिवळेपणा दूर होण्यास मदत होईल. 

संत्र्याची साल

संत्र्याची साल दातांचा पिवळेपणा दूर करण्यासाठी एक फायदेशीर उपाय आहे. यासाठी आधी संत्र्याच्या साली उन्हात वाळवा. त्याला वाटून त्याची पावडर बनवा. यानंतर ब्रश करताना आपल्या दातांवर लावा. असे आठवड्यात तीन ते चार वेळा केल्यास दातांचा पिवळेपणा दूर होतो. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी