मुंबई: शरीराची काहिली करणारा उन्हाळा(summer) सुरू झाला आहे. उन्हाळ्याच्या दिवसात सगळ्यात मोठी सतावणारी समस्या म्हणजे डिहायड्रेशन(Dehydration). त्यामुळेच हेल्थ एक्सपर्ट(health expert) या दिवसांत हिरव्या पालेभाज्या, रंगीत फळे आणि हर्ब्सचा आहारात समावेश करण्याचा सल्ला देतात. ज्यामुळे तुमच्या शरीरात ओलावा राहील. तसेच त्वचेचीही देखभालराहील.
तुम्हालाही या उन्हाळ्यात शरीर हायड्रेट ठेवायचे असेल तर डाएटमध्ये काही बदल हे करावेच लागतील. जाणून घ्या असे कोणते पदार्थ आहेत जे तुम्हाला उन्हाळ्यात शरीरा हायड्रेट ठेवण्यास मदत करतील.
टोमॅटो - टोमॅटोमध्ये मोठ्या प्रमाणात अंटीऑक्सिडंट्सअसतात जे आपल्या हेल्थसाठी तसेच स्किनसाठी फायदेशीर ठरते. टोमॅटोचे सेवन तुम्ही सलाड, रायता, सँडविचेस अथवा लेट्यूस रॅपमध्ये करू शकता. तुम्ही स्कूव्हरवर म्हणून कॉटेज चीझसोबत हे खाऊ शकता.
कलिंगड - कलिंगडामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी असते. ज्यामुळे आपले शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते. तसेच यात लायकोपेन असते ज्यामुळे सूर्याच्या हानिकारक किरणांपासून स्किन सेल्सचा बचाव होतो.
झुकिनी - झुकिनीमध्ये पाण्याचे प्रमाण तब्बल ९४ टक्के असते. उन्हाळ्यात यांचे सेवन अत्यंत फायदेशीर ठरते. यात मोठ्या प्रमाणात व्हिटामिन सी असते ज्यामुळे इम्युनिटी सिस्टीम बूस्ट होते. तसेच यात मोठ्या प्रमाणात पोटॅशियमही असते. तुम्ही हे सलाडमध्ये खाऊ शकता. अथवा स्मूदी बनवून ब्रेकफास्टमध्ये घेऊ शकता.
संत्री - संत्र्यांचेही सेवन उन्हाळ्यात शरीरासाठी फायदेशीर असते. यात मोठ्या प्रमाणात पाणी आणि व्हिटामिन सी असते. संत्रे असेच खावे त्यामुळे जास्त फायदा मिळत.
हिरव्या पालेभाज्या - हिरव्या पालेभाज्या जसे पालक, ब्रोकोली, कोबी, काकडी सारख्या भाज्यांमध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असते. या भाज्या म्हणून शिजवून खाव्यात. अथवा सलाड, रायता बनवून खावे.
कॉर्न - मकामध्ये अँटीऑक्सिडंट्सचे प्रमाण अधिक असते ज्यामुळे सूर्याच्या किरणांपासून त्वचेचे रक्षण होते. कॉर्न तुम्ही असेच अथवा भाजी वा सलाडमध्ये टाकून खाऊ शकता
कोल्ड्रिंक्स नको - उन्हाळ्यात तहान भागवण्यासाठी कोल्ड्रिंकऐवजी लिंबूपाणी, नारळपाणी, आवळ्याचे सरबत, फळांचे रस घ्या. यामुळे तुमच्या शरीराला फायदाच होईल.