Diabetes अन् Cholesterolसह 15 आजार दूर करते 'ही' भाजी, म्हटलं जातं ऑल इन वन औषधी वनस्पती

Drumstick : शेवग्याची पाने केसगळती, एनिमिया, संधिवात, थायरॉइड, अस्थमा, कमजोर रोगप्रतिकारक शक्ती, मधुमेह आणि वेटलॉस यासारख्या अनेक आजारांमध्ये उपयोगी मानली जातात. शेवग्याच्या शेंगेचे झाड पोषक तत्वांचा खजिना असून त्यात व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी1 (थायामिन), बी2 (रिबोफ्लेविन), बी3 (नियासिन), बी-6, फोलेट, एस्कॉर्बिक ऍसिड (व्हिटॅमिन सी), कॅल्शियम, पोटॅशियम, लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि आयर्न यांसारखे आवश्यक पोषक घटक असतात.

Health benefits of eating Drumstick
Diabetes व Cholesterolसह 15 आजार दूर करते 'ही' भाजी  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
 • आयुर्वेदात सुद्धा या वनस्पतीला महत्त्व असून अनेक रोगांवर शेवग्याची शेंग रामबाण समजली जाते.
 • या वनस्पतीचे काही साईड इफेक्ट्स देखील आहेत.
 • या झाडाची पाने सर्वात जास्त फायदेशीर आहेत.

मुंबई :  आपल्या सभोवताली एवढे उत्तम फळे फुले आणि झाडे आहेत की त्याचे फायदे अगणित आहेत. परंतु त्यांच्या फायद्याची माहिती अनेकांना माहित नाही. या वनस्पतींची (Plants) पाने, फळे, फुले, मुळे, हे सर्व काही औषधी (Medicinal) गुणधर्मांनी समृद्ध असतात. यातील एक वनस्पती म्हणजे मोरिंगा (Moringa)म्हणजेच शेवगा. (Drumsticks). आयुर्वेदात सुद्धा या वनस्पतीला महत्त्व असून अनेक रोगांवर शेवग्याची शेंग रामबाण समजली जाते. आज आपण शेवग्याचे अनेक फायदे जाणून घेणार आहोत..(This vegetable cures 15 diseases including Diabetes and Cholesterol). 

अधिक वाचा  : अक्षय कुमार साकारणार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका

शेवग्याची पाने केसगळती, एनिमिया, संधिवात, थायरॉइड, अस्थमा, कमजोर रोगप्रतिकारक शक्ती, मधुमेह आणि वेटलॉस यासारख्या अनेक आजारांमध्ये उपयोगी मानली जातात. शेवग्याच्या शेंगेचे झाड पोषक तत्वांचा खजिना असून त्यात व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी1 (थायामिन), बी2 (रिबोफ्लेविन), बी3 (नियासिन), बी-6, फोलेट, एस्कॉर्बिक ऍसिड (व्हिटॅमिन सी), कॅल्शियम, पोटॅशियम, लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि आयर्न यांसारखे आवश्यक पोषक घटक असतात. परंतु या वनस्पतीचे काही साईड इफेक्ट्स देखील आहेत. शेवगा हा प्रकृतीने उष्ण असतो, त्यामुळे उष्णतेच्या समस्या (अॅसिडिटी, ब्लीडिंग, मूळव्याध, मासिक पाळीच्या समस्या, पुरळ) त्रस्त असलेल्यांनी उन्हाळ्यात शेवगा खाऊ नये. 

अधिक वाचा  : वडापावचा वाढणार भाव; सर्वसामान्यांचा हिशोब होणार तिखट

या वनस्पतीचे सर्व भाग फायदेशीर असून या झाडाची पाने सर्वात जास्त फायदेशीर आहेत. ताज्या पानांचा रस किंवा वाळलेल्या पानांची पावडर करून वापरू शकता. त्याच्या शेंगा उकळवून त्याचे सूप प्यायल्याने सांधेदुखीचा त्रास आणि वजन कमी होण्यास मदत होते. 

शेवग्याचे औषधी गुणधर्म 

 ही वनस्पती अँटीबायोटिक, एनाल्जेसिक, अँटिऑक्सिडंट, अँटीइन्फ्लामेट्री, अँटीकॅन्सर, अँटीडायबेटिक, अँटीफंगल आणि सर्वात आश्चर्यकारकपणे अँटीएजिंग म्हणून कार्य करते. 

 •  शेवगा हे  हिमोग्लोबिन सुधारण्यास मदत करते. 
 •  ब्लड प्रेशर आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवते.  
 •  लिव्हर आणि किडनी डिटॉक्सिफाय करते. रक्त शुद्ध करते. 
 • त्वचा रोग दूर करते.
 • वजन कमी करण्यास मदत करते.
 • चयापचय सुधारते.
 • शरीरातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवते.
 • तणाव, चिंता आणि मूड स्विंग कमी करते.
 • थायरॉईड फंक्शन सुधारते.
 • ब्रेस्टफिडिंग करणा-या मातांमध्ये दुधाचे उत्पादन वाढवते.

जेवणातही करू शकता वापर

तुम्ही शेवग्याच्या शेंगांची पाने किंवा पावडर तुमच्या चपाती, धिरडं (पॅनकेक्स), स्मूदी, एनर्जी ड्रिंक, डाळ इत्यादींमध्ये घालून खाऊ शकता. पण जर तुम्हाला या भाजीची अॅलर्जी असेल तर ते खाण्यापूर्वी डॉक्टर किंवा तज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.

शेवग्याच्या शेंगांची पाने खाण्याचे फायदे


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी