weight loss: लठ्ठपणा कमी करण्यासाठी गरजेचे आहेत तीन दिवस

तब्येत पाणी
Updated Nov 09, 2021 | 17:45 IST | टाइम्स नाऊ मराठी

दिवाळीनंतर डिटॉक्सिफिकेश प्लान(detoxification plan) केल्यास याचे फायदे होतात. केवळ तीन दिवस हा प्लान करा आणि पुन्हा फिटनेससाठी(fitness) तयार राहा. 

weight loss
weight loss: लठ्ठपणा कमी करण्यासाठी गरजेचे आहेत तीन दिवस 
थोडं पण कामाचं
  • लठ्ठपणा कमी करण्यासाठी सगळ्यात गरजेचे आहे प्लानिंग आणि मोटिव्हेशन.
  • तीन दिवसांचा डिटॉक्सिफिकेशन प्लान तुम्हाला लठ्ठपणा कमी करण्यासाठी आणि फिटनेसची सुरूवात करण्यास मदत करेल.
  • दिवाळीनंतर तुम्हीही ट्राय करा हा फिटनेस प्लान, ज्यामुळे तुम्ही नेहमी फिट आणि हेल्दी राहाल. आपले

मुंबई: दिवाळीमध्ये(diwali) तर तळलेले तसेच गोड पदार्थ खाल्ले जातात. मिठाईवर ताव मारला जातो. अनेकजण तर डाएटची(diet) चिंता न करता खातात. मात्र खाल्ल्यानंतर एका गोष्टीची भीती असते ती म्हणजे इतकं खाल्ल्याने आपण जाडे तर नाही ना होणार. यासाठी डाएटिशियन(dietician) वेगवेगळे प्लान सांगत असतात. दिवाळीनंतर डिटॉक्सिफिकेश प्लान(detoxification plan) केल्यास याचे फायदे होतात. केवळ तीन दिवस हा प्लान करा आणि पुन्हा फिटनेससाठी(fitness) तयार राहा. three days important for weight loss

तीन दिवसांचा डिटॉक्सिफिकेशन प्लान

लठ्ठपणा कमी करण्यासाठी सगळ्यात गरजेचे आहे प्लानिंग आणि मोटिव्हेशन. तीन दिवसांचा डिटॉक्सिफिकेशन प्लान तुम्हाला लठ्ठपणा कमी करण्यासाठी आणि फिटनेसची सुरूवात करण्यास मदत करेल.  दिवाळीनंतर तुम्हीही ट्राय करा हा फिटनेस प्लान, ज्यामुळे तुम्ही नेहमी फिट आणि हेल्दी राहाल. आपले शरीर हे स्वत: डिटॉक्सिफिकेशन करते आणि यासाठी तुम्हाला वेगळे काही करण्याची गरज नाही. चांगल्या रिझल्टसाठी तुम्ही तीन दिवसांचा डिटॉक्सिफिकेशन प्लान सुरू करू शकता. 

यासाठी तीन दिवस एका वेळच्या जेवणात केवळ व्हेजिटेबल्स सूप, सलाड आणि फ्रुट्स खा. यामुळे शरीर डिटॉक्सिफाय होण्यास मदत होईस आणि शरीरातून विषारी पदार्थ बाहेर फेकले जातील. सोबतच जेवणात भात आणि चपाती कमी खा. डाळ, भाजी, दही, सलाड अधिक खा. 

लठ्ठपणा कमी करण्यासाठी खा सलाड

सलाडमध्ये काकडी, टोमॅटो, कच्चा पपई, लेट्यूस, झुकिनी खा. प्रोटीम सलाड ज्यात पनीर, मोड आलेली  कडधान्ये यांचा समावेश असेल तर याचाही डाएटमध्ये समावेश करा. यामुळे शरीराला या सर्व गुणतत्वांची गरज  असते.

डिटॉक्सिफिकेशनसाठी प्या सूप

सूपमध्ये तुम्ही टोमॅटो, स्वीट कॉर्न, दुधी, पालक ट्राय करू शकता. डिटॉक्सिफिकेशनसाठी तुम्ही गाजर, बीट आणि टोमॅटोचाही ज्यूस पिऊ शकता. यापद्धतीने आवळा, पालक, पुदिना, कोथिंबीर, हिरवी मिर्ची, कडीपत्ता आणि दुधीचा ज्यूस पिऊ शकता. यात तुम्ही दही मिसळून स्मूदीही बनवू शकता. तुम्ही व्हीटग्रासचाही ज्यूस पिऊ शकता. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी