रोगप्रतिकारशक्ती आणि स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी तीन सोपे व्यायाम, आत्मसंरक्षणासाठी आवर्जून करा

तब्येत पाणी
Updated Apr 19, 2021 | 12:50 IST | टाइम्स नाऊ मराठी

गरज पडल्यास स्वतःचे संरक्षण करण्यासाठी उत्तम रोगप्रतिकारशक्तीसोबतच स्नायू ताकदवान असणेही महत्वाचे आहे. नवशिक्या लोकांसाठी हे आहेत असे काही व्यायाम ज्यामुळे त्वचा टाईट करून स्नायूंची ताकदही वाढते.

Three easy exercises for immunity and muscle power also useful for self defense
रोगप्रतिकारशक्ती आणि स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी तीन सोपे व्यायाम, आत्मसंरक्षणासाठी आवर्जून करा  |  फोटो सौजन्य: Representative Image

थोडं पण कामाचं

  • मांसपेशींच्या निर्मितीला चालना देणारे लंजेस
  • शरीरातील अनेक मांसपेशींचा व्यायाम करणारे पुशअप्स 
  • शरीराच्या खालच्या भागाची ताकद वाढवणारे स्क्वाट्स

नवी दिल्ली : सध्या कोरोनाच्या काळात (Corona period) आपल्या शरीरातील (body) रोगप्रतिकारशक्तीचे (immunity) महत्व आपल्याला यापूर्वी कधीही पटले नसेल इतके पटत आहे. तसेच आजूबाजूची परिस्थिती पाहता गरज पडल्यास स्वतःचे संरक्षण (self defense) करण्यातली आपली सक्षमताही (ability) महत्वपूर्ण (important) ठरते आहे. यासाठी उत्तम रोगप्रतिकारशक्तीसोबतच स्नायू ताकदवान (powerful muscles) असणेही महत्वाचे आहे. नवशिक्या (beginners) लोकांसाठी हे आहेत असे काही व्यायाम (exercises) ज्यामुळे त्वचा (skin) टाईट (tight) करून स्नायूंची ताकदही वाढते. लंजेस (lunges), पुशअप्स (pushups) आणि स्क्वाट्समुळे (squats) शरीरातील वेगवेगळ्या भागांची ताकद वाढते.

मांसपेशींच्या निर्मितीला चालना देणारे लंजेस

या व्यायामामुळे मांसपेशींच्या निर्मितीला चालना मिळते आणि आपले पाय तसेच ग्लूट्सची ताकद वाढते. आपले पाय खांद्यांइतक्या अंतरावर न्या आणि हात खाली सोडा. आपल्या उजव्या पायाने एक पाऊल पुढे या, आपला उजवा गुडघा दुमडा आणि आपल्या जांघा जमिनीशी समांतर ठेवा. हे करताना डाव्या पायाने पुढे येऊ नका. आपल्या उजव्या पायाला धक्का द्या आणि सुरुवातीच्या स्थानी परत जा. दुसऱ्या पायाने हीच कृती परत करा. हीच क्रिया 10 वेळा पुन्हा पुन्हा करा.

शरीरातील अनेक मांसपेशींचा व्यायाम करणारे पुशअप्स 

आपण अनेक लोकांना पुशअप्स करताना पाहिले असेल कारण यामुळे एकाच वेळेला शरीरातील अनेक मांसपेशींना आवश्यक तो व्यायाम मिळतो. प्लँक स्थितीतून सुरुवात करा. शरीरात ताण असावा. खांदे खाली आणि मागे खेचलेले आणि मान सरळ असावी. आता कोपर दुमडा आणि आपले शरीर जमिनीच्या दिशेने न्या. हळूहळू आणि सतत आता शरीर वर आणा. हालचाल करताना आपले कोपर शरीराच्या जवळ ठेवण्यावर लक्ष द्या. जितक्या वेळा शक्य असेल तितक्या वेळा याची पुनरावृत्ती करा.

शरीराच्या खालच्या भागाची ताकद वाढवणारे स्क्वाट्स

हा एक सामान्य व्यायाम आहे, पण यामुळे आपल्या शरीरातील खालच्या भागाची ताकद वाढते. सरळ उभे राहा आणि आपले पाय खांद्यांइतक्या अंतरावर न्या. आपली छाती आणि हनुवटी वर ठेवून आपला पृष्ठभाग मागे न्या आणि गुडघे दुमडा. आपल्या मांड्या जमिनीला समांतर ठेवा आणि हात आपल्यासमोर आरामदायक स्थितीत आणा. क्षणभर थांबा आणि पुन्हा आपले पाय वर घेऊन सुरुवातीला आपण होतात त्याच अवस्थेत आणा. असे वीस वेळा करून आपण आपल्या शरीरातील खालच्या भागाची ताकद वाढवू शकता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी