Tips to Stay Healthy in Summer : उकाड्यापासून सुटका करणारे तीन रामबाण उपाय

Three Remedies For Beat The Heat : उन्हाळा सुरू आहे. उकाड्याने अंगाची लाही लाही होत आहे. उन्हाळ्याच्या झळांमुळे डोकं तापलंय. घामामुळे वैताग आलाय. या अशा वातावरणातून दिलासा शोधत आहात मग जाणून घ्या उकाड्यापासून सुटका करणारे तीन रामबाण उपाय.

Three Remedies For Beat The Heat
उकाड्यापासून सुटका करणारे तीन रामबाण उपाय  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • उन्हाळ्याच्या दिवसांत नारळपाणी प्या आणि ताडगोळे खा
  • दुपारच्या जेवणात दही भात खा
  • गुलकंद खा आणि गुलाबजल सोबत ठेवा

Three Remedies For Beat The Heat : उन्हाळा सुरू आहे. उकाड्याने अंगाची लाही लाही होत आहे. उन्हाळ्याच्या झळांमुळे डोकं तापलंय. घामामुळे वैताग आलाय. या अशा वातावरणातून दिलासा शोधत आहात मग जाणून घ्या उकाड्यापासून सुटका करणारे तीन रामबाण उपाय.

आरोग्य - वेबस्टोरी । तब्येत पाणी

Summer Tips:उन्हाळ्यात या टिप्स तुम्हाला ठेवतील हायड्रेट

१. उन्हाळ्याच्या दिवसांत नारळपाणी प्या आणि ताडगोळे खा

उन्हाळ्याच्या दिवसांत नारळपाणी प्या आणि ताडगोळे खा. सतत उन्हात फिरताना घाम येतो आणि शरीरातील पाण्याची पातळी खालावते. यामुळे थकवा जाणवू लागतो. या समस्येवर उपाय म्हणजे नारळपाणी प्या किंवा पोटभर ताडगोळे खा. नारळपाणी प्यायल्याने शरीराततील पाण्याच्या पातळीचे संतुलन राखण्यास मदत होते. शिवाय नारळपाण्यामुळे शरीराला काम करण्यासाठी ऊर्जा मिळते. थकवा दूर होतो आणि उत्साह संचारू लागतो. तर ताडगोळे खाल्ल्याने तहान आणि भूक दोन्ही शमविणे शक्य होते.

नारळपाण्यात पोटॅशियम, प्रोटिन्स, व्हिटॅमिन सी, मॅग्नेशियम, फायबर हे घटक आहेत तर ताडगोळा या फळात आयर्न, पोटॅशियम, फॉस्फरस तसेच व्हिटॅमिन ए बी आणि सी आहेत. नारळपाणी आणि ताडगोळा या दोन पर्यायांव्यतिरिक्त मलबेरी म्हणजेच शहतूत पण खाऊ शकता. 

२. दुपारच्या जेवणात दही भात खा

दुपारी ताजे सकस अन्न खा. अती तिखट, अती मसालेदार खाणे टाळा. दुपारच्या जेवणात थोडा दहीभात आवर्जून खा. यासाठी सकाळी नाश्ता करता त्यावेळी भात शिजवा आणि नंतर बाजुला ठेवून द्या. हा गार झालेला भात दुपारी दहीभातासाठी वापरा. भातावर दही घालून व्यवस्थित एकत्र करुन घ्या. हा दहीभात जेवणाच्या शेवटच्या टप्प्यात खा. यामुळे जेवण पचण्यास मदत होईल. शिवाय उन्हाळ्यात जाणवणारा अॅसिडीटी किंवा जळजळ अशा स्वरुपाचे त्रास कमी होतील. 

३. गुलकंद खा आणि गुलाबजल सोबत ठेवा

दररोज रात्री झोपण्याआधी एक चमचा गुलकंद खा. दिवसभरात अधूनमधून गुलाबजलमध्ये भिजवून ओल्या केलेल्या रुमालाने चेहरा पुसून घ्या. शक्यतो दुपारच्या उन्हात बाहेर पडणे टाळा आणि बाहेर पडताना स्वतःसोबत एक पाण्याची बाटली ठेवा. 

डिस्क्लेमर / Disclaimer : मजकूर संकलित माहितीच्याआधारे तयार केला आहे. प्रयोग करण्याआधी वैद्यकीय सल्ला घेणे हिताचे आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी