अपुऱ्या झोपेमुळे डोळ्यांखाली येतात काळी वर्तुळं, मग करा ३ योगासनं आणि बघा कमाल

three yogasans improve your sleep : अपुऱ्या झोपेमुळे डोळ्यांखाली काळी वर्तुळं येतात. ही वर्तुळं लवकर निघून जावी आणि अपुऱ्या झोपेची समस्या दूर व्हावी यासाठी तीन योगासने करून बघा. ही योगासने आपल्या समस्या दूर करण्यास मदत करतील.

three yogasans improve your sleep
अपुऱ्या झोपेमुळे डोळ्यांखाली येतात काळी वर्तुळं, मग करा ३ योगासनं आणि बघा कमाल  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • अपुऱ्या झोपेमुळे डोळ्यांखाली येतात काळी वर्तुळं, मग करा ३ योगासनं आणि बघा कमाल
  • योगासने करण्याआधी वैद्यकीय सल्ला घ्यावा तसेच तज्ज्ञांच्या देखरेखीत योगासने करावी
  • शवासन, धनुरासन, बालासन

three yogasans improve your sleep : माणसांचं आयुष्य हल्ली घड्याळाच्या काट्यांसोबत धावत आहे. या धावपळीच्या आयुष्यात अनेकदा झोप अपुरी होते. अपुऱ्या झोपेमुळे डोळ्यांखाली काळी वर्तुळं येतात. ही वर्तुळं लवकर निघून जावी आणि अपुऱ्या झोपेची समस्या दूर व्हावी यासाठी तीन योगासने करून बघा. ही योगासने आपल्या समस्या दूर करण्यास मदत करतील. योगासने करण्याआधी वैद्यकीय सल्ला घ्यावा तसेच तज्ज्ञांच्या देखरेखीत योगासने करावी ते आपल्या हिताचे आहे. 

शांत झोपेसाठी योगासने । Yoga for sleeping :

  1. शवासन : शरीराला पुरेशी विश्रांती मिळवून देण्यास उपयुक्त. सपाट जमिनीवर किंवा अंगणात किंवा मैदानात एक जाड पण आरामदायी चादर किंवा सतरंजी किंवा चटई अंथरून घ्या. या चादर किंवा सतरंजी किंवा चटईवर तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार शवासन करा. शवासन मानवी मनातील नकारात्मक विचार दूर करण्यास आणि सकारात्मक विचार वाढविण्यास मदत करते. वैचारिकदृष्ट्या माणूस हळू हळू सकारात्मक होत जातो.
  2. धनुरासन : पोटाशी संबंधित विकार बरे करण्यास धनुरान मदत करते. पोटावरील चरबी कमी करण्यास मोलाची मदत करते. पोटाचे स्नायू लवचिक करण्यास मदत करते. सपाट जमिनीवर किंवा अंगणात किंवा मैदानात एक जाड पण आरामदायी चादर किंवा सतरंजी किंवा चटई अंथरून घ्या. या चादर किंवा सतरंजी किंवा चटईवर तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार धनुरासन करा.
  3. बालासन : अपचन, बद्धकोष्ठता अशा स्वरुपाचे विकार दूर करण्यास मदत करते. सपाट जमिनीवर किंवा अंगणात किंवा मैदानात एक जाड पण आरामदायी चादर किंवा सतरंजी किंवा चटई अंथरून घ्या. या चादर किंवा सतरंजी किंवा चटईवर तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार बालासन करा.

डिस्क्लेमर / Disclaimer : सल्ल्यासह ही सामग्री केवळ सामान्य माहिती प्रदान करते. हे कोणत्याही प्रकारे पात्र वैद्यकीय मताचा पर्याय नाही. अधिक तपशिलांसाठी नेहमी तज्ज्ञ किंवा तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. Timesnow मराठी या माहितीची जबाबदारी घेत नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी