Body Detox Simple Tips : सात दिवसांत शरीर करा डीटॉक्स

Tips For Detox Body In Seven Days : विषद्रव्ये बाहेर टाकून शरीरशुद्धी करण्यासाठी अर्थात शरीर डीटॉक्स करण्यासाठी अनेक उपाय केले जातात. पण एका अतिशय सोप्या पद्धतीने शरीर सात दिवसांत डीटॉक्स करणे शक्य आहे.

Tips For Detox Body In Seven Days
सात दिवसांत शरीर करा डीटॉक्स  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • Body Detox Simple Tips : सात दिवसांत शरीर करा डीटॉक्स
  • डॉटॉक्स करत असताना टाळायचे पदार्थ
  • सात दिवसांत डीटॉक्स करण्याची प्रक्रिया

Tips For Detox Body In Seven Days : विषद्रव्ये बाहेर टाकून शरीरशुद्धी करण्यासाठी अर्थात शरीर डीटॉक्स करण्यासाठी अनेक उपाय केले जातात. पण एका अतिशय सोप्या पद्धतीने शरीर सात दिवसांत डीटॉक्स करणे शक्य आहे. या डीटॉक्सीफिकेशनमुळे शरीराचे वजन कमी होण्यास मदत होते तसेच आरोग्याला लाभ होतो. पचनक्षमता सुधारते. अपायकारक असलेले कोलेस्टेरॉल कमी होते. रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राखण्यास मदत होते. आपल्याला कोणताही आजार असो वा नसो डीटॉक्सीफिकेशनमुळे आरोग्याला लाभ होतो. आजारी व्यक्ती लवकर बरी होते आणि निरोगी व्यक्तीच्या कार्यक्षमतेता वाढ होते. 

धावपळीची जीवनशैली, बैठी कामं, जंकफूड, फास्टफूड, तेलकट-तुपकट पदार्थांचे सेवन यामुळे शरीरात अनेक समस्या निर्माण होणार होतात. डीटॉक्सीफिकेशनमुळे शरीराच्या समस्या बऱ्या होण्यास मदत होते. शरीर डीटॉक्स झाल्यामुळे रोगप्रतिकारक क्षमतेत वाढ होते. 

डॉटॉक्स करत असताना टाळायचे पदार्थ

आईस्क्रीम, कोल्डड्रिंक्स, मांस, मैद्याचे पदार्थ, तेलकट पदार्थ, फास्टफूड, जंकफूड खाणे टाळा. साखर आणि मीठ खाणे टाळता आले तर उत्तम. पण साखर आणि मीठ खाणे बंद करण्याआधी वैद्यकीय सल्ला घेणे हिताचे. धूम्रपान, मद्यपान, अंमली पदार्थ हे पूर्णपणे बंद करावे. चॉकलेट, बिस्कीट खाणे बंद करावे. चहा आणि कॉफी पिण्याऐवजी ग्रीन टी प्यावी.

सात दिवसांत डीटॉक्स करण्याची प्रक्रिया

  1. दररोज किमान चौदा ते सोळा काहीही न खाणे
  2. डीटॉक्स वॉटर : दररोज किमान तीन ते चार लिटर डीटॉक्स वॉटर प्यावे. पाण्यात पुदिना रस, लिंबू रस, आल्याचा रस, काकडीचे पाणी किंवा काकडीचे तुकडे टाकून ते पाणी ढवळून प्या. 
  3. फळे आणि भाज्या : दररोज ताज्या भाज्या आणि ताजी फळे खावी
  4. रात्रीचे जेवण : रात्रीचे जेवण संध्याकाळी सात वाजण्याआधी घ्यावे. नंतर किमान एक हजार पावले चालावे.
  5. वेगाने चालावे : दररोज किमान ४५ मिनिटे वेगाने चालावे
  6. सूर्यनमस्कार आणि प्राणायाम : दररोज सकाळी सूर्यनमस्कार आणि प्राणायाम करावे. शक्य झाल्यास नियमित योगासने करावी. 
  7. लिंबू पाणी : दररोज सकाळी रिकाम्या पोटी किमान दोन ग्लास लिंबू पाणी प्यावे. लक्षात ठेवा पाण्यात फक्त लिंबू रस मिसळवा, या पाण्यात मीठ किंवा साखर मिसळू नये.

डिस्क्लेमर / Disclaimer : सल्ल्यासह ही सामग्री केवळ सामान्य माहिती प्रदान करते. हे कोणत्याही प्रकारे पात्र वैद्यकीय मताचा पर्याय नाही. अधिक तपशिलांसाठी नेहमी तज्ज्ञ किंवा तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. Timesnow मराठी या माहितीची जबाबदारी घेत नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी