Tips For Hair : वाढत्या वयामुळे सगळ्यांचेच केस सफेद होत असतात. परंतु काहींचे तर कमी वयातचं केस सफेद होत असतात. पांढरे केस होण्यासाठी निकृष्ट आहार, प्रदूषण, खराब पाणी, पोषणाचा अभाव, अशी अनेक कारणे असू शकतात. काळ्या केसांमध्ये सफेद केस दिसायला लागतात. केस पांढरे झाल्यानंतर अनेकजण चिंतेत असतात. हे पांढरे केस लपवण्यासाठी अनेकजण मेहंदी लावतात पण कालांतराने ते पुन्हा सफेद होतात. जर तुम्हीपण सफेद केसांमुळे त्रस्त असाल तर करा तुमच्यासाठी आम्ही उपाय आणले आहेत. काही वनस्पती आहेत जे तुम्हाला या सफेद केसांच्या समस्येतून सुटका देतील.
थोडा कढीपत्ता घेऊन बारीक करून घ्या. आता त्यात दोन-तीन चमचे आवळ्याची पावडर आणि ब्राह्मी पावडर मिसळून पेस्ट तयार करा. आता हा पॅक मुळांपासून संपूर्ण केसांना लावा. तासभर ठेवा आणि नंतर धुवा. त्याचे फायदे तुम्हाला खूप लवकर दिसतील. या उपायाने तुमचे केस काळे तर होतीलच पण ते दाटही होतील.
अधिक वाचा :घरातील ढेकणं बाहेर कसं काढणार, जाणून घ्या उपाय
पांढरे केस काळे करण्यासाठी कॉफीचा नैसर्गिक रंग उपयुक्त ठरतो. यासाठी एका भांड्यात एक कप पाणी गरम करा. नंतर त्यात एक चमचा भरून कॉफी पावडर घाला. पाणी थंड झाल्यावर त्यात मेहंदी पावडर मिक्स करून पेस्ट बनवा. आता हे सर्व केसांवर चांगल्या पद्धतीने लावा. साधरण तासभर केसांवर ही पेस्ट ठेवा. त्यानंतर शॅम्पूने धुवा.
अधिक वाचा :Hing Astro Upay: हिंगाचे उपाय तुमचे नशीब उघडतील, धनात होईल झपाट्याने वाढ
केस पांढरे होणे लक्षात येताच तुम्ही कोरफडीचा वापर सुरू केला तर तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो. कोरफडीचा हेअर पॅक तयार करण्यासाठी कोरफडीचे जेल घ्या आणि त्यात लिंबाचा रस घाला आणि आता ही पेस्ट संपूर्ण केसांना मुळापासून लावा. हा पॅक तुम्ही आठवड्यातून दोनदा लावू शकता.