Teeth whitening at home: ... आता दातांच्या पिवळेपणापासून लाज वाटण्याची गरज नाही, हे उपाय करा दांताचा पिवळेपणा घालवा

तब्येत पाणी
Updated Nov 24, 2022 | 15:17 IST | टाइम्स नाऊ मराठी

Teeth whitening at home: दातांचा पिवळेपणा घालवण्यासाठी (Teeth whitening tips) घरच्या घरी हे उपचार करा. घरगुती उपायांचा वापर करून दात स्वच्छ करा. डेंटिस्टकडे जावून महागडे उपचार घेणं शक्य नसेल तर हे उपाय नक्की करून पाहा.

tips for Teeth whitening at home
दातांचा पिवळेपणा घालवण्याचे उपाय 
थोडं पण कामाचं
  • दातांचा पिवळेपणा घालवण्याचे उपाय
  • दातांचा पिवळेपणा घालवण्यासाठी तुळस, सफरचंद खावे
  • चहा-कॉफी प्यायल्यानंतर कोमट पाण्याने तोंड धुवावे

Teeth whitening at home: तुमच्या चेहऱ्याचे सौंदर्य टिकवण्यासाठी तुम्ही अनेक उपाय करून पाहिले असतील,(Teeth whitening tips) पण तुम्ही तुमच्या दातांची अशीच काळजी घेता का? बऱ्याचदा दात व्यवस्थित साफ केले जात नाहीत. दात पिवळे पडू लागतात. गुटखा खाल्ल्याने दात खराब होतात. मात्र, दातांचा हा पिवळेपणा सहज साफ करता येतो. घरच्या घरी दात स्वच्छ कसे करायचे हे जाणून घेऊया. (tips for Teeth whitening at home)

लिंबाचा रस आणि बेकिंग सोडा

एका प्लेटमध्ये 1 चमचा बेकिंग सोडा घ्या आणि त्यात थोडा लिंबाचा रस घाला त्याची पेस्ट करा. ही पेस्ट टूथब्रशवर लावा आणि दात चांगले घासा. 1 मिनिटं दातांवर ही पेस्ट राहू द्या आणि नंतर तोंड धुवा. ही पेस्ट एका मिनिटापेक्षा जास्त वेळ दातांवर ठेवू नका. नाहीतर दात खराब होऊ शकतात. 

अधिक वाचा : या शुक्रवारपासून वर्षातील सर्वात मोठा ‘ब्लॅक फ्रायडे’ सेल

तुळस


तुळस हे औषधी गुणांचे भांडार आहे. दातांचा किंवा हिरड्यांचा संसर्ग संपवायचा असेल तर तुळशीचा वापर करा. तुळशीची पाने दातांवर लावल्याने दात स्वच्छ होतील. तुळशीची पाने बॅक्टेरिया आणि इतर अनेक विषारी पदार्थ दातांवरून काढून टाकते. मात्र, अतीप्रमाणातही ते वापरू नका. 


कोमट पाणी

चहा-कॉफी जास्त प्रमाणात प्यायल्यामुळे दात पिवळे पडतात. मात्र, चहा किंवा कॉफी प्यायल्यानंतर जर तुम्ही कोमट पाण्याने तोंड धुतलं तर दात पिवळ पडत नाही. 
त्यामुळेच, चहा किंवा कॉफी प्यायल्यानंतर कोमट पाण्याने तोंड स्वच्छ करा. यामुळे दातांना फायदा होईल. 


संतऱ्यामुळे दातांना फायदा होईल

संत्री खाल्ल्याने दातांचा पिवळेपणा दूर होतो. हे खरं वाटत नसलं तरी हे खरं आहे. संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी असते. जे दात पांढरे होण्यास मदत करते. बॅक्टेरिया कमी करण्यातही मदत करतात, ज्यामुळे प्लेक होण्याची शक्यता असते. संत्र्याची सालं दातांवरही लावू शकता. रोज रात्री संत्र्याचं साल दातांवर चोळा आणि नंतर ब्रश करा. 

अधिक वाचा : FIFA World Cup 2022: 44 वर्षानंतर वर्ल्डकपमध्ये घडलेय हे....

सफरचंदामुळे दातांचा पिवळेपणा कमी होतो

सफरचंद खाल्ल्याने दातांना आराम मिळतो. यामुळे डाग आणि पिवळेपणाची समस्या दूर होते आणि दात पांढरे आणि चमकदार बनतात. सफरचंदमध्ये मॅलिक अॅसिड असते, जे नैसर्गिकरित्या दात पांढरे करणाचे एजंट म्हणून काम करते. तेव्हा रोज सफरचंद नक्की खा. 


( डिस्क्लेमर : सल्ल्यासह ही सामग्री केवळ सामान्य माहिती प्रदान करते. हे कोणत्याही प्रकारे पात्र वैद्यकीय मताचा पर्याय नाही. अधिक तपशिलांसाठी नेहमी तज्ञ किंवा तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. Timesnow मराठी या माहितीची जबाबदारी घेत नाही. )


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी