Office Tips: जेव्हा ऑफिसमध्ये आळस येतो तेव्हा लगेच करा ही गोष्ट, झोप होईल गायब

Lifestyle tips : ऑफिसमध्ये कामाच्या दबाव असणे ही सर्वत्र आढळणारी बाब आहे. कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण (work stress) असतो आणि त्याचा त्यांच्यावर परिणामदेखील होत असतो. बहुतेक कर्मचाऱ्यांची तक्रार असते की त्यांना कामाच्या दरम्यान झोप (office time sleep) येते. विशेषतः दुपारच्या जेवणानंतर झोपेची सुरुवात होते. अशा स्थितीत कर्मचाऱ्यांचे काम विस्कळीत होते आणि साहेबांचा ओरडादेखील सहन करावा लागतो.

Office Tips to avoid sleep
ऑफिसमध्ये झोप टाळण्यासाठीच्या टिप्स 
थोडं पण कामाचं
  • ऑफिसमध्ये कामाच्या दबाव असणे ही सर्वत्र आढळणारी बाब
  • बहुतेक कर्मचाऱ्यांची तक्रार असते की त्यांना कामाच्या दरम्यान झोप (office time sleep) येते.
  • झोप दूर करण्याच्या टिप्स जाणून घ्या

Office Tips To Avoid Daytime Sleep : नवी दिल्ली : ऑफिसमध्ये कामाच्या दबाव असणे ही सर्वत्र आढळणारी बाब आहे. कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण (work stress) असतो आणि त्याचा त्यांच्यावर परिणामदेखील होत असतो. बहुतेक कर्मचाऱ्यांची तक्रार असते की त्यांना कामाच्या दरम्यान झोप (office time sleep) येते. विशेषतः दुपारच्या जेवणानंतर झोपेची सुरुवात होते. अशा स्थितीत कर्मचाऱ्यांचे काम विस्कळीत होते आणि साहेबांचा ओरडादेखील सहन करावा लागतो. तुम्हालाही ही समस्या असेल तर ही बातमी फक्त तुमच्यासाठी आहे. आज आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत, ज्यामुळे तुमची झोप काही मिनिटांत दूर होईल. (Tips to avoid sleep at office hours)

अधिक वाचा : Psoriasis : सोरायसिसच्या रुग्णांनी ‘हे’ पदार्थ कधीच खाऊ नयेत, त्रास होईल दुप्पट

ऑफिसमध्ये झोप टाळण्यासाठीच्या टिप्स-

जास्तीचे जेवण करू नका

ऑफिसमध्ये झोप येऊ नये म्हणून जड अन्न खाणे टाळावे. ऑफिसमध्ये दुपारच्या जेवणासाठी हलका आहार घ्या. कारण जेवण खाल्ल्यानंतर झोप येते. यासोबतच गोड खाल्ल्याने झोप येते. त्यामुळे जेवणानंतर गोड खाणे टाळावे.

थोडा वेळ चाला

ऑफिसमध्ये सतत एकाच जागी बसल्याने सुस्ती येते. हळूहळू डोळे जड होऊ लागतात. तुमच्याबाबतीतही असेच होत असेल, तर तुम्ही मधेच थोडेसे चालत जावे. कॅनडाच्या एका विद्यापीठात केलेल्या संशोधनानुसार, प्रत्येक तासाला काही मिनिटे उभे राहिले पाहिजे. त्यामुळे तुम्ही ऑफिसमध्ये थोडे फिरू शकता.

अधिक वाचा : Habits of Successful People : यशस्वी माणसांना ‘या’ सवयी अजिबात नसतात, तुम्हाला असतील तर आत्ताच सोडा

योग करा

सकाळी उठल्यानंतर थोडा वेळ योगासने आणि प्राणायाम करण्याची सवय लावा. यासाठी कोणत्याही योगासनाच्या वर्गात सहभागी होण्याची गरज नाही. फक्त सकाळी लवकर मूलभूत आणि सामान्य योगासने करा. असे केल्याने तुम्हाला ऑफिसमध्ये दिवसभर फ्रेश वाटेल.

डेस्क स्ट्रेचिंग

ऑफिसमध्ये सुस्ती असताना खुर्चीवर बसूनही तुम्ही डेस्क स्ट्रेचिंग करू शकता. डेस्क स्ट्रेचिंग केल्याने स्नायू लवचिक होतात. यामुळे शरीरातील रक्ताभिसरण वाढते आणि तुम्हाला फ्रेश वाटेल.

अधिक वाचा : धक्कादायक ! हॉस्पिटलचे १० लाखाचे बिल न भरल्याने तब्बल १ महिना ठेवले डांबून, अशी झाली सुटका

चहा आणि कॉफी प्या

तसे, जास्त प्रमाणात चहा-कॉफी पिण्याचे अनेक तोटे आहेत. पण ऑफिसमध्ये झोप येऊ नये म्हणून तुम्ही चहा-कॉफी पिऊ शकता. त्यात असलेले कॅफिन सुस्ती दूर करते आणि ताजेपणाची भावना देते. तुम्ही डार्क चॉकलेटही खाऊ शकता, त्यामुळे सुस्तीही दूर होते.

आपल्या आहार-विहाराचा आपल्या शरीरावर परिणाम होत असतो. त्याचा संबंध आपल्या झोपेशी देखील असतो. हल्लीच्या धकाधकीच्या जीवनशैलीत एकतर रात्री उशीरापर्यत जागरण होते. त्यातच आपल्या आहारामध्ये अनेक बदल झाले आहेत. जड, पचनक्रियेवर ताण टाकणारे, वजन वाढवणारे, चरबी वाढवणारे अन्नपदार्थ मोठ्या प्रमाणात खाल्ले जातात. शिवाय शारीरिक हालचालीदेखील कमी झाल्या आहेत. व्यायामाचा अभाव सर्वत्र दिसून येतो. याचा परिणाम होत शरीर सुस्तावत जाते. त्यातच ऑफिसमध्ये मानसिक ताणतणावांना सामोरे जावे लागत असते. अशात जर पचनावरच ताण पडत असेल तर शरीर झोपेचा कौल देते. दुपारच्या वेळेस सुस्ती येणे हे मग अतिशय स्वाभाविक असते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी