Blood Sugar Control Tips: मधुमेहाची लक्षणे दिसताच लगेच करा हे 5 उपाय...होईल फायदा

Health Tips : भारतात तर मधुमेहाच्या (Diabetes) रुग्णांची संख्या सर्वाधिक वेगाने वाढते आहे. सर्वच वयोगटांमध्ये आता हा आजार दिसून येतो आहे. पूर्वी हा आजार फक्त वृद्ध किंवा वयस्कर माणसांमध्येच आढळायचा. मात्र आता तरुणांमध्येही मधुमेह झपाट्याने पसरतो आहे. जीवनशैलीतील (Lifestyle) चुकीच्या बदलांमुळे हा गंभीर आजार होत असून यात रक्तातील साखरेची पातळी (Blood Sugar Level) वाढते.

Blood Sugar control
रक्तातील साखर कशी नियंत्रणात ठेवावी 
थोडं पण कामाचं
  • भारतात मधुमेहींची संख्या वाढतेय
  • मधुमेहात रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणाबाहेर जाते
  • रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठीच्या टिप्स

How to control blood sugar level in Diabetes : नवी दिल्ली : मधुमेह हा आजार मागील काही वर्षात झपाट्याने पसरतो आहे. जगभरात मधुमेहींची संख्या खूपच वाढली आहे. भारतात तर मधुमेहाच्या (Diabetes) रुग्णांची संख्या सर्वाधिक वेगाने वाढते आहे. सर्वच वयोगटांमध्ये आता हा आजार दिसून येतो आहे. पूर्वी हा आजार फक्त वृद्ध किंवा वयस्कर माणसांमध्येच आढळायचा. मात्र आता तरुणांमध्येही मधुमेह झपाट्याने पसरतो आहे. जीवनशैलीतील (Lifestyle) चुकीच्या बदलांमुळे हा गंभीर आजार होत असून यात रक्तातील साखरेची पातळी (Blood Sugar Level) वाढते. मात्र जर आपण वेळीच रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित केली तर मधुमेह नियंत्रणात ठेवता येतो. साखरेची पातळी नियंत्रणात ठेवली तर मधुमेहाची बहुतेक लक्षणे कमी होऊ लागतात. अर्थात अनेकजण यासाठी औषधांचाच आधार घेतात. मात्र तुमच्या रोजच्या दिनचर्येत काही फायदेशीर टिप्स वापरल्या तर त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. (Tips to control blood sugar levels in Type 2 Diabetes)

अधिक वाचा  :मुंबईत पुन्हा सीएनजी-पीएनजीच्या दरात वाढ

मधुमेह झाल्यास रक्तातील साखर नियंत्रणात कशी ठेवाल-

मीठाचे प्रमाण कमी करणे
अनेकांना जेवणात जास्त मीठाचा वापर करण्याची सवय असते. चवीसाठी ही सवय लागलेली असते. मात्र जास्त मीठ खाणे हे आरोग्यासाठी धोकादायक आहे. जास्त मीठ खाल्ल्याने तुमचा उच्च रक्तदाबाचा धोका वाढू शकतो. यातून पुढे हृदयरोग आणि स्ट्रोकचा धोका वाढतो. मधुमेहांना याचा धोका सर्वाधिक असतो. दिवसातून जास्तीत जास्त 6 ग्रॅम (एक चमचे) मीठ खाल्ले जाईल याकडे लक्ष द्या. पॅकेज फूडमध्ये मीठाचे प्रमाण जास्त असते. खाताना कमी मीठ असलेले पदार्थ निवडा.

संतुलित आहार 
मधुमेहात आहाराचे महत्त्व मोठे असते. संतुलित आहार घेतल्यास आणि योग्य पोषक आहार घेतल्यास रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते.

अधिक वाचा  : 'द केरला स्टोरी'चा टीझर आऊट

नियमित व्यायाम 
तंदुरुस्त राहण्यासाठी व्यायाम आवश्यक आहे. मधुमेहामध्ये तर व्यायामाचा खूप फायदा होतो. नियमित व्यायामामुळे तुमच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवता येते. शिवाय यामुळे तुमचे वजन नियंत्रणात राहते. वजन वाढल्याने मधुमेहामध्ये साखरेचे प्रमाण वाढते. त्यामुळे मधुमेहींनी नियमित व्यायाम केल्यास रक्तातील साखर नियंत्रणात ठेवता येते. 

आहारात फायबरचे प्रमाण वाढवा
फायबरचे दोन प्रकार आहेत. फक्त विरघळणारे फायबर खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी कमी होण्यास मदत होते. पचनासाठीदेखील फायबर उपयुक्त असतात.

अधिक वाचा  : पुरुषांच्या या तीन सवय पाहून महिला होत असतात घायाळ

कार्बोहायड्रेट कमी करा
रक्तातील साखरेची पातळी वाढण्यामागे कार्बोहायड्रेटचे जास्त सेवन हे एक महत्त्वाचे कारण असते. त्यामुळेच जर रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करायची असेल तर कार्बोहायड्रेटचे सेवन कमी केले पाहिजे. 

भरपूर पाणी प्या
अनेकदा पाणी पिण्याचा कंटाळा केला जातो. मात्र शरीरात पाण्याचे योग्य प्रमाण असल्यास रक्तातील साखरेची पातळी सुधारण्यास मदत होते. यामुळे शरीरातून अतिरिक्त साखर लघवीद्वारे बाहेर पडते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी