Corona Prevention : ताप आल्यावर औषधं तर घ्याच, पण ‘हे’ सुद्धा करा! सर्वांनाच होईल फायदा

ताप आल्यावर औषधोपचार घेणं गरजेचं आहेच. मात्र त्याचवेळी काही सामाजिक भान बाळगणंही गरजेचं आहे.

Corona Prevention
ताप आल्यावर औषधं तर घ्याच, पण ‘हे’ सुद्धा करा  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • ताप आला असेल तर घराबाहेर पडू नका
  • आजाराची खात्री होईपर्यंत क्वारंटाईन व्हा
  • लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांपासून दूर राहा

Corona Prevention : गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत (Corona Patients) वाढ होऊ लागल्याचं चित्र आहे. त्यात पावसाळा (Monsoon) सुरु असल्यामुळे थंडी तापाच्या रुग्णांची संख्यादेखील वाढत आहे. अनेकांना ताप (Fever) येतो, मात्र तो प्रत्येकवेळी कोरोनाचाच असेल, असं नसतं. मात्र तरीदेखील जोपर्यंत कोरोनाची चाचणी (Corona Test) करून या गोष्टीची खातरजमा केली जात नाही, तोपर्यंत प्रत्येक ताप हा कोरोनाचा असण्याची शक्यता गृहित धरून आपली वर्तणूक ठेवण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिला जातो. आपल्याला ताप आल्यानंतर त्यातून बरं होणं ही आपली जबाबदारी असतेच, मात्र आपल्यामुळे इतरांना त्रास होऊ नये आणि आपल्या माध्यमातून कुठलाही आजार इतरांपर्यंत पोहोचू नये, याची काळजी घेण्याची सामाजिक जबाबदारीदेखील आपल्याला पार पाडणं गरजेचं आहे. त्यासाठी ताप आल्यानंतर औषधोपचारांसोबत काही मूलभूत बाबींची काळजी घेण्याची गरज आहे. 

कम्युनिटी स्प्रेडर बनू नका

सध्या सणांचा काळ आहे. श्रावण महिना सुरू झाला असून वेगवेगळ्या सणांसाठी आणि उत्सवांसाठी लोक एकत्र येत असतात. अनेकदा किरकोळ ताप आलेल्या व्यक्ती उत्साहाच्या भरात अशा सेलिब्रेशनमध्ये सहभागी होतात. मात्र आपल्या शरीरातील विषाणू इतरांपर्यंत पोहोचवण्याचं हेच निमित्त ठरत असतं. आपली रोगप्रतिकारक शक्ती चांगली असल्यामुळे कदाचित एखाद्या विषाणूचा आपल्याला त्रास होत नसेल, मात्र तोच विषाणू इतरांच्या शरीरात गेला तर मात्र त्यांना त्रास होऊ शकतो, याची जाणीव असणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्हाला ताप आला असेल, तर सार्वजनिक कार्यक्रमांना जाणं टाळलं पाहिजे. विशेषतः लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिक आपल्या संपर्कात येणार नाहीत आणि आपला ताप उतरेपर्यंत तरी आपण सर्वापासून दूर राहू शकू, याची खबरदारी घेणं गरजेचं आहे. 

अधिक वाचा - Psoriasis : सोरायसिसच्या रुग्णांनी ‘हे’ पदार्थ कधीच खाऊ नयेत, त्रास होईल दुप्पट

ताप आल्यावर व्हा आयसोलेट

तुम्हाला ताप आला आणि त्यासोबत कोरोनाशी संबंधित काही लक्षणं दिसू लागली, तर तातडीने स्वतःला आयसोलेट करून घेण्याची गरज आहे. घसा दुखणे, कफ होणे, चव जाणे, वास जाणे यापैकी कुठलीही लक्षणं दिसली, तर तातडीने स्वतःला इतरांपासून वेगळे करा आणि आजार बरा होईपर्यंत तुम्ही कुणाच्याही संपर्कात येणार नाही, याची काळजी घ्या. 

अधिक वाचा - Vitamin B12: या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे तुम्ही पडाल आजारी, टाळण्यासाठी खा हे पदार्थ

मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग

मास्क वापरण्याची सध्या महाराष्ट्रात सक्ती नाही. मात्र तुम्ही आजारी असाल, तर तुमच्या शरीरातीत विषाणू इतरांच्या शरीरात प्रवेश कऱण्याची शक्यता असते. हे गृहित धरून घराबाहेर पडताना मास्क वापरणे आणि सोशल डिस्टन्सिंगच्या तत्त्वाचं पालन करणं गरजेचं आहे. त्यामुळे तुमच्यावाटे इतरांना त्या आजाराची बाधा होणार नाही आणि साथ नियंत्रणात राहायला मदत होईल. 

डिस्क्लेमर - आजाराची साथ रोखण्यासाठीचे हे सामान्य उपाय आणि टिप्स आहेत. तुम्हाला काही गंभीर शारीरिक समस्या असेल, तर डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घेण्याची गरज आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी