Winter Weight Loss Tips: हिवाळ्यात जिम न लावताही 'असं' कमी करा वजन

तब्येत पाणी
Updated Nov 28, 2019 | 20:08 IST | टाइम्स नाऊ हिंदी

Winter Weight Loss Tips: हिवाळ्यामध्ये आपण जिम न जाताही वजन कमी करू शकता. वेट लॉस करण्यासाठी खालील नियमांचं पालन केल्यास हिवाळ्यातही वजन कमी करू शकता.

Weight Loss Pics
Winter Weight Loss Tips: हिवाळ्यात जिम न लाता ही असं कमी करा वजन  |  फोटो सौजन्य: Getty Images

थोडं पण कामाचं

  • हिवाळ्यात वजन कमी करण्यासाठी दररोज प्या कोमट पाणी
  • पाण्याची कमतरता होऊ नये म्हणून सूप आणि फळांचा आहारात समावेश असावा
  • व्हिटॅमिन डी प्राप्त करून घेण्यासाठी कोवळ्या उन्हात अवश्य फिरावं

मुंबई: हिवाळा हा ऋतू आरोग्याच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचा मानला जातो. हिवाळ्यात तसं पाहिलं तर वजन वाढविण्यासाठी खूप लोक प्रयत्न करतात. कारण हिवाळ्यात ज्यांना वजन वाढवायचं आहे, त्यांच्यासाठी हा ऋतू खूप चांगला आहे. पण जर वजन कमी करायचं असेल तर हिवाळ्यात सुद्धा आपण ते करू शकतो. फक्त त्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. एका रिसर्चनुसार हिवाळा हा वजन कमी करण्यात उपयुक्त ठरतो.

मास्ट्रिच यूनिव्हर्सिटी मेडिकल सेंटरच्या एका रिसर्चनुसार, थंड वातावरणात शरीराचं तापमान कमी असतं त्यामुळे जास्त कॅलरीज बर्न करता येतात. रिसर्चनुसार १९ डिग्री सेल्सिअस तापमान शरीराच्या योग्य संतुलनासाठी योग्य ठरतं. जाणून घ्या थंडीच्या दिवसात काही उपाय केले तर वजन कमी करू इच्छिणाऱ्यांना त्याचा लाभ होईल.

पाणी पिणं

थंडीच्या दिवसात आपल्या शरीरामध्ये पाण्याची कमतरता होऊ देऊ नये. भरपूर प्रमाणात पाणी प्यावं. एक गोष्ट लक्षात ठेवावी थंडीत जास्तीत जास्त कोमट पाणी प्यावं. त्यानं शरीरामध्ये अॅसिड जमा होत नाही आणि अन्नाचं पचन व्यवस्थित होतं. सकाळी उठल्यावर कोमट पाणी पिऊन दिवसाची सुरूवात करावी आणि रात्री जेवणानंतरही एक ग्लास कोमट पाणीच प्यावं. त्यानं वजन कमी होण्यास मदत होते.

जास्त एनर्जी देणाऱ्या खाद्यपदार्थांची करावी निवड

हिवाळ्यामध्ये अशा पदार्थांचा खाण्यात समावेश करावा ज्यात पाण्याचं प्रमाण अधिक असतं. अशा अन्नपदार्थांमध्ये कॅलरीज कमी असतात आणि यानं एनर्जी अधिक मिळत असते. यासाठी आपण अनेक प्रकारचे भाज्यांचे सूप प्यावं आणि थंडीच्या वातावरणात व्हेरायटीसाठी फळं खाल्ल्यानंही आपलं वजन कमी होऊ शकतं. यादरम्यान, गाजर, मुळा, आवळ्याचा रस अवश्य घ्यावा. त्यानं वजन कमी करण्यात मदत मिळते. जर आपल्याला ज्यूस पिणं आवडत असेल तर नाश्ता करतांना आपण फळ किंवा त्याचा ज्यूस अवश्य घ्यावा. यामुळे मिळणारं फायबर आपल्या शरीरातील चरबी कमी करण्याचं काम करतं.

फिरणं आणि उन्हात बसणं आवश्यक

आता बोलूया थंडीच्या काळात फिरणं आणि व्यायाम करण्याबद्दल... हिवाळ्यात जिममध्ये वर्कआऊट करण्याऐवजी बाहेर फिरणं फायद्याचं ठरेल. त्यामुळे आपल्याला ऊर्जा मिळेल. सकाळी फिरायला जायला वेळ मिळालं नाही तर रात्री अवश्य फेरफटका मारावा. तसंच उन्हामध्ये शरीराला व्हिटॅमिन डीचा डोस मिळावा म्हणून उन्हात थोडावेळ बसावं. कमीतकमी अर्धा तास कोवळं उन्हं आपल्या अंगावर पडू द्यावं, त्यानं तंदुरूस्त राहण्यासाठी मदत मिळते. रात्री जेवल्यानंतर अर्धा तास शतपावली नक्की घालावी. रात्री जेवणासाठी खूप उशीर करू नये आणि झोपायच्या दोन-तीन तासांपैकी जेवावं. लक्षात ठेवा झोपायच्या २-३ तासांपूर्वी जेवण, हलकं जेवण आणि जेवणानंतर फिरणं हे वजन कमी करण्यासाठी खूप फायदेशीर ठरतं.

हाय प्रोटीन फूड वजन वजन कमी करण्यासाठी उपयुक्त

हाय प्रोटीन युक्त डाएट आपल्याला वजन कमी करण्यासाठी मदत करतं. अंडी, पनीर आणि दूधा सोबतच डाळ, मटार यांचा आहारात उपयोग हिवाळ्यात केल्यास तो लाभदायक ठरतो.

नॉनव्हेज खाणाऱ्यांनी चिकन आणि मच्छीचा आहारात समावेश करावा. मात्र तो ठराविक प्रमाणात. कारण याचं प्रमाण अधिक झालं तर त्याचा वजन वाढीवर परिणाम होऊ शकतो. हिवाळ्याच्या काळात शेंगदाणे, नट्स अवश्य खावेत, ज्यात भरपूर प्रमाणात न्यूट्रिएंट्स असतात. या पदार्थांच्या सेवनानंतर आपण शरीराचं आरोग्य उत्तम राखू शकतो. तसंच यामुळे अनेक आजारांसोबत लढण्याचं बळही शरीराला मिळतं.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी