Winters Ladoo : थंडीच्या दिवसांत खा 3 प्रकारचे लाडू

to avoid cold eat these laddus in winter : भारताच्या मोठ्या भूभागात सध्या थंडीचे वातावरण आहे. या थंडीत शरीराला पुरेशी ऊर्जा मिळावी आणि दैनंदिन कामांसाठी उत्साह कायम राहावा यासाठी 3 प्रकारचे चविष्ट लाडू खाणे फायद्याचे आहे.

Winters Ladoo
थंडीच्या दिवसांत खा 3 प्रकारचे लाडू  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • Winters Ladoo : थंडीच्या दिवसांत खा 3 प्रकारचे लाडू
  • लाडू खाण्याचे थंडीत होणारे फायदे
  • आरोग्यदायी लाडू

to avoid cold eat these laddus in winter : भारताच्या मोठ्या भूभागात सध्या थंडीचे वातावरण आहे. या थंडीत शरीराला पुरेशी ऊर्जा मिळावी आणि दैनंदिन कामांसाठी उत्साह कायम राहावा यासाठी 3 प्रकारचे चविष्ट लाडू खाणे फायद्याचे आहे. तज्ज्ञांची सुचविलेले हे 3 प्रकारचे चविष्ट लाडू थंडीच्या दिवसांत भूक भागवतील, जिभेचे चोचले पुरवतील तसेच शरीराला पुरेशी ऊर्जा पुरवतील. आरोग्यादृष्टीने हिताचे असे अनेक पोषक घटक हे लाडू खाल्ल्यामुळे शरीराला मिळतील. 

जाणून घ्या थंडीच्या दिवसांत खावेत असे 3 प्रकारचे लाडू

1. अळशीचे लाडू

साहित्य : एक वाटी अळशी (जवस / flaxseed),एक वाटी काळे तीळ,एक वाटी खसखस,३-४ टेबलस्पून डिंक पावडर,एक वाटी बदामाचे काप, दोन वाट्या कणीक, ३-४ वाट्या ताजा खवा, एक वाटी साजूक तूप, गुळ 2 मोठ्या वाट्या

कृती : कढई गरम करा नंतर मध्यम आचेवर कढईत अळशी (जवई), काळे तीळ, खसखस हे तिन्ही स्वतंत्रपणे खरपूस भाजून घ्या. नैसर्गिकरित्या थंड करा आणि ग्राईंडरमध्ये वेगवेगळे ग्राईंड (वाटून) करून घ्या. पुन्हा कढई गरम करा आणि नंतर मध्यम आचेवर तापत ठेवा. कढईत साजूक तुपात डिंकाची पावडर तळून घ्या. आता त्याच कढईत शिल्लक तुपात कणीक घालून मध्यम आचेवर कणीक ५-७ मिनिटे लालसर भाजून घ्या. मोठ्या परातीत भाजलेली कणीक काढून घ्या व त्यात साजूक तुपात तळलेली डिंकाची पावडर आणि ग्राईंड केलेले अळशी (जवई), काळे तीळ, खसखस हे तिन्ही घालून व्यवस्थित मिसळा. भाजलेल्या कणकेच्या कढईतच खवा घाला आणि सोनेरी लाल रंग येईपर्यंत भाजून घ्या. हा गरम खरपूस व खमंग भाजलेला खवा आता कणकेत मिसळा. गुळ मिसळा. आता थोडा वेळा ही कणीक कढईत तापवा. उलथणे वारंवार कणकेतून फिरवा आणि सर्व घटक एकमेकांत व्यवस्थित मिसळले असल्याची खात्री करून घ्या. नंतर कणीक परातीत काढून घ्या आणि लाडू वळून घ्या. लाडू हाताला चिकटू नये यासाठी हाताला थोडे तूप लावून नंतर लाडू वळा.

फायदा : अळशीचे लाडू खाल्ल्याने शरीराला व्हिटॅमिन्स, अँटी ऑक्सिडंट्स, ओमेगा 3 फॅटी अॅसिड हे पोषक घटक मिळतील. 

पाईल्सवर रामबाण उपाय असलेली भाजी

घरी शुद्ध तूप तयार करण्यासाठी TIPS

तुपाचा खरेखोटेपणा तपासण्याचे सोपे तंत्र

'ठंडी मे गरमी का एहसास' देणारे पदार्थ

2. डिंक लाडू

साहित्य : पाव किलो डिंक, अर्धा किलो सुके खोबरे, अर्धा किलो खारीक, एक वाटी खसखस, पाव वाटी बादाम, एक किलो गूळ, बिब्ब्याच्या बिया, अर्धी वाटी साजूक तूप

कृती : डिंक जाडसर कुटा. नंतर डिंकाला तुपाचा हात लावून तो उन्हात ठेवा. सुके खोबरे किसून आणि भाजून घ्या. खारकेची पूड करून घ्या. खसखस भाजून घ्या. बदामाचे जाड काप करून घ्या. बिब्ब्याच्या बिया साजूक तुपात तळून घ्या. आता कढईत थोडे साजूक तुप ओता. या तुपावर खारकांची पूड भाजून घ्या. नंतर कढईत गुळाचा पाक करून घ्या आणि त्यात अर्धी वाट साजूक तूप ओता. नंतर त्यात डिंक, सुकामेवा आदी उरलेले सर्व घटक ओता. सर्व साहित्य चांगले मिसळून घ्या. नंतर हाताला तूप लावून लाडू वळून घ्या. 

फायदा : डिंकाचे लाडू खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते. अशक्तपणा आला असल्यास दूर होतो. दैनंदिन कामांसाठी उत्साह संचारतो.

3. तिळगूळ किंवा तिळाचे लाडू

साहित्य : अर्धा किलो तीळ, अर्धा किलो चिक्कीचा गूळ, दीड वाटी शेंगदाण्याचे कूट, १ चमचा वेलची पूड, १ ते २ चमचे साजूक तूप.

कृती : तीळ मंद आचेवर भाजा. गॅसवर कढई तापत ठेवा. त चिक्कीचा गूळ आणि साजूक तूप ओता. गुळाचा गोळीबंद पाक तयार करून घ्या. पाक करताना तो सतत ढवळत राहा. पाक व्यवस्थित झाल्यानंतर त्यात भाजलेले तिळ, दाण्याचा कूट, वेलची पूड घालून मिक्स करून घ्या. नंतर हाताला तूप लावा आणि लाडू वळून घ्या.

फायदा : तिळगूळ किंवा तिळाचे लाडू खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते. दैनंदिन कामांसाठी उत्साह संचारतो. थंडीत शरीर आतून उष्ण राखण्यासाठी हे लाडू उपयुक्त आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी