CoronaVirus पासून बचाव करण्यासाठी घरी बनवा hand sanitizer, केवळ 3 गोष्टी घरात असणं आवश्य 

CoronaVirus Prevention tips in Marathi, Homemade hand sanitizer: कोरोना व्हायरसमुळे बाजारातील हँड सॅनिटायजर कमी होत आहेत. अशात तुम्ही सॅनिटायजर घरी देखील बनवू शकता. 

Homemade hand sanitizer
CoronaVirus पासून बचाव करण्यासाठी घरी बनवा hand sanitizer 

मुंबईः  हातांची स्वच्छता जर ठिक झाली नाही तर त्याचा परिणाम आरोग्यावर होतो. दरम्यान इकडे-तिकडे स्पर्श केल्यास हाताला बरेच किटाणू चिटकतात. ज्यामुळे तुम्ही आजारी पडण्याची जास्त शक्यता असते. जागतिक आपत्ती म्हणून उद्भवणारा कोरोना व्हायरस टाळण्यासाठी हात स्वच्छ करण्यावरही जोर देण्यात आला आहे. अशा परिस्थितीत हात साबणाने आणि पाण्याने नियमित स्वच्छ करण्याची सूचना देण्यात आली आहे. याव्यतिरिक्त काही वेळी तुम्ही हँड सॅनिटायजरचा वापर देखील करु शकता. 

कोरोना व्हायरसमुळे घाबरलेले लोकं धडाधड बाजारातून हँड सॅनिटायजर खरेदी करत आहेत. मात्र हातांची स्वच्छता करण्यासाठी तुम्ही घरीच हँड सॅनिटायजर बनवू शकता. सॅनिटायजर जितकं सुरक्षित सांगितलं जात तितकं ते नसतं. कारण बाजारात मिळणाऱ्या हँड सॅनिटायजरमध्ये अल्कोहल सुद्धा असते. जो काही लोकांच्या त्वचेला सूट करत नाही. अशात घरी बनवलेलं हँड सॅनिटायजर नेहमीच चांगलं राहिल.

How to make Homemade hand sanitizer घरी कसं बनवाल हँड सॅनिटायजर

साहित्य

यासाठी तुम्हाला विच हेजल एक्सट्रॅक्ट (Witch Hazel Extract), एलोवेरा जेल, एसेंशियल ऑइल ( टी ट्री, पिमपमिंट, लिंबू किंवा लवंग) आणि एक बॉटल. 

बनवण्याची कृती 

सर्वात आधी एका बाऊलमध्ये 2-3 मोठे चमचे एलोवेरा जेल घेऊन ती चांगली मिक्स करा. आता यात काही थेंब विच हेजल एक्सट्रॅक्ट आणि तुमच्या पसंतीचं एसेंशियल ऑइल मिसळा. सर्व साहित्य चांगलं त्यात मिक्स केल्यानंतर एका बॉटलमध्ये भरा. जर तुम्हाला हे स्प्रे फॉर्मेटमध्ये पाहिजे असल्यास त्यात फिल्टर केलेलं थोडं पाणी मिसळा. हवं असल्यास यात व्हिटामिन ई सुद्धा मिसळू शकता. 

Benefit of hand sanitizer / काय होणार फायदा 

जेव्हा पाणी आणि साबण उपलब्ध नसेल तर हात स्वच्छ करण्यासाठी या नॅचरल हँड सॅनिटायजरचा उपयोग तुम्ही करु शकता. यात असलेले एसेंशियल ऑइल्समुळे किटाणू सहज नष्ट होतात आणि यामुळे हात देखील सॉफ्ट राहतात. 

How to use hand sanitizer / कसा वापर कराल 

हँड सॅनिटायजरनी हात स्वच्छ करण्यासाठी एक मोठा ड्रॉप हातावर घ्या आणि दोन्ही हात एकमेंकावर चांगले घासा. सॅनिटायजर हातावर सुकण्याची वाट पाहा. उर्वरित उत्पादन पुसण्याची किंवा धुण्याची आवश्यकता नाही.

सूचनाः डॉक्टरांच्या सल्ल्याला पर्याय म्हणून या लेखातील माहिती घेऊ नका. आपली प्रकृती बिघडल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...