Weight loss tips After Holi: होळीनंतर वजन वाढलंय, वाढती चरबी या टिप्सनं करा कमी

तब्येत पाणी
Updated Mar 17, 2020 | 16:11 IST | टाइम्स नाऊ मराठी

Weight loss Tips: एखादा सण झाला की त्यानंतर आपलं वजन वाढतं, अशी तक्रार अनेक जण करत असतात. आपल्याला सुद्धा ही समस्या त्रास देत असेल तर खालील टिप्स वापरा आणि आपलं वजन कमी करा.

weight loss tips
होळीनंतर वजन वाढलंय, वाढतं पोट या टिप्सनं करा कमी 

थोडं पण कामाचं

  • या टिप्स द्वारे कमी करू शकता वजन
  • जर होळीनंतर आपलं वजन वाढलं असेल तर अशाप्रकारे वजन कमी करा.
  • वजन कमी करण्यासाठी या खास नियमांचं पालन करणं आवश्यक आहे.

होळी रे होळी पुरणाची पोळी म्हणत प्रत्येकानंच पुरण पोळीचा स्वाद नक्की घेतला असेल. आता होळीनंतर आपलं वजन वाढलं असेल तर काळजी करू नका. वजन कमी करण्यासाठी अनेक जण खूप उपाय करतात. पण प्रत्येकालाच यश येईल असं नाही. म्हणून जाणून घ्या अशा खास टिप्स ज्यामुळे आपण परफेक्ट फिगर मिळवू शकाल आणि वजनही कमी करू शकाल.

नुकतीच डॉ. मंजुनाथ मल्लिगे यांनी टाइम्स नाऊ सोबत खास बातचित केली. यात त्यांनी होळी नंतर किंवा कुठल्याही सणानंतर वजन वाढलं असेल तर काळजी करू नका असं म्हटलंय. या टिप्सचा वापर केला तर आपण सहजपणे वजन कमी करू शकता. महिलांना नेहमीच आपल्या पोटाची चरबी वाढण्याची काळजी असते. अशातच डाएट न करता या ५ टिप्स वापरल्या तर बेली फॅट सहजपणे कमी करू शकता. डॉक्टर मल्लिगे यांनी म्हटलं की, वजन कमी करण्याची पद्धत नेहमी हेल्दी असावी.

कार्बोहायड्रेटचं सेवन कमी करावं

आपल्याला जर वजन कमी करायचं असेल तर सर्वात प्रथम आपण कार्बोहायड्रेट युक्त जेवण बंद करावं. यात फ्राईड स्नॅक्स, गोड पदार्थांचा समावेश होतो. यात कार्बोहायड्रेट अधिक प्रमाणात असतं. त्यामुळे वजन कमी करायचं असेल तर या पदार्थांकडे बघू ही नका. याशिवाय जंक फूड, पिझ्झा, पास्ता सारख्या पदार्थांपासून दूर राहा.

प्रोटीन युक्त आहार घ्यावा

वजन कमी करण्यासाठी नेहमी प्रोटीन युक्त आहार घ्यावा. उदा. अंडी, मासे, मीट सारख्या पदार्थांचं सेवन मांसाहारी लोक करू शकतात. तर दूध, सोया पनीर, मोड आलेली कडधान्य शाकाहारी लोकांसाठी चांगला पर्याय आहे. प्रोटीन खाल्ल्यानं आपण हेल्दी आणि ऊर्जावान राहाल. पोटाची चरबी कमी करण्यासाठी प्रोटीन डाएट खूप फायदेशीर असतं. याशिवाय प्रोटीन डाएट खूप काळापर्यंत शरीरात ऊर्जा तयार करत राहते.

काय खाताय याबाबतीत सावधगिरी बाळगा-

अनेकदा भूक लागल्यावर आपण काहीही खातो. अशातच आपण काय खातोय हे याकडे लक्ष द्यावं. खूप भूक लागली की आपण अधिक खातो, मात्र हे शरीरासाठी योग्य नाही. डॉक्टरांच्या मते जर आपण अधिक खात असाल तर वर्कआऊट आपल्या रुटीनमध्ये अवश्य सामिल करून घ्या. एवढंच नव्हे तर आपल्या जेवणात कॅलरी अधिक असेल तर ती कमी करण्यासाठी व्यायाम अवश्य करा. डाएट प्लानमध्ये लिमिटेड कॅलरी सोबतच प्रोटीनही खूप आवश्यक आहे. पौष्टिक आहारासोबत व्यायाम करणंही गरजेचं आहे.

अधिकाधिक पाणी प्या –

अधिक पाणी प्यायल्यानं स्वत:ला हायड्रेट तर ठेवू शकतोच शिवाय त्यामुळे मेटॅबॉलिझमही वाढतं. आपल्याला माहितीय की, जेव्हा आपल्याला खूप भूक लागते तेव्हा आपण घाईघाईत अधिक खात असतो. मात्र असं करू नये. जर आपल्याला भूक लागली तर पाणी पिऊन सुद्धा भूक घालवू शकता. असं केल्यास वजन वाढण्यापासून आपण रोखू शकतो. याशिवाय जेवणाच्या अर्धा तास आधी पाणी प्यायल्यास शरीरातील कॅलरी कमी होऊ शकतात.

व्यायाम-

व्यायाम, योगा करणं हा एकमात्र उपाय आहे ज्यामुळे आपण स्वत:ला फिट ठेवू शकतो. व्यायाम केल्यानं आपण हेल्दी राहू शकतो. जर आपल्या डाएटमध्ये कार्बोहायड्रेटचं प्रमाण अधिक असेल, तर व्यायामाच्या मदतीनं त्या अधिकच्या कॅलरीज आपण बर्न करू शकतो. याशिवाय व्यायामाच्या मदतीनं मेटॅबॉलिझम पण वाढतो. बॅलेंस डाएट सोबतच फिजिकल वर्कआऊटच्या माध्यमातून आपण सहजतेनं वजन कमी करू शकतो.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...