Men Health Tips: कायमस्वरुपी तरुण आणि फिट राहायचे असेल तर पुरुषांनी करावी ही गोष्ट

Health Tips : स्त्री आणि पुरुष दोघांसाठीही तंदुरुस्ती महत्त्वाची आहे. प्रत्येकाच तंदुरुस्त राहायचे असते. तर काहींसाठी फिटनेस म्हणजे जिममध्ये जाऊन बॉडी बनवणे, तर काहींसाठी फिटनेस म्हणजे लठ्ठपणापासून दूर राहणे हा अर्थ असतो. आरोग्य (Health)आणि फिटनेसचा (Fitness) प्रत्यक्ष संबंध असतो.

Health Tips
हेल्थ टिप्स 
थोडं पण कामाचं
  • तंदुरुस्त राहणे महत्त्वाचे
  • फिट आणि तरुण राहण्यासाठी काही गोष्टी आवश्यक
  • पुरुषांच्या तंदुरुस्तीसाठीच्या टिप्स

Men Health Tips: नवी दिल्ली : कायम फिट असावे, तरुण राहावे असे प्रत्येकालाच वाटते. आरोग्य (Health)आणि फिटनेसचा (Fitness) प्रत्यक्ष संबंध असतो. स्त्री आणि पुरुष दोघांसाठीही तंदुरुस्ती महत्त्वाची आहे. प्रत्येकाच तंदुरुस्त राहायचे असते. तर काहींसाठी फिटनेस म्हणजे जिममध्ये जाऊन बॉडी बनवणे, तर काहींसाठी फिटनेस म्हणजे लठ्ठपणापासून दूर राहणे हा अर्थ असतो. मात्र तंदुरुस्त राहिल्याने तुम्ही मानसिक आणि शारीरिक दोन्ही दृष्ट्या फिट राहता. यासोबतच रोगप्रतिकार क्षमता वाढते आणि आजारांपासूनही बचाव होतो. यामुळे तुम्ही स्वत:ला तंदुरुस्त आणि तरुण ठेवू शकता. (To remain healthy and young do this every day)

अधिक वाचा  : थंड झालेल्या सॅण्डविचमुळे सरावानंतर सिडनीत तापलं वातावरण

तंदुरुस्त आणि तरुण राहण्यासाठी पुरुषांनी रोज करायच्या गोष्टी-

आहार -
आहाराचे आरोग्यासाठी मोठे महत्त्व असते. फिटनेससाठी तुम्ही तुमच्या खाण्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे.त्यासाठी तुम्ही व्यायाम आणि आहार यामध्ये योग्य तोल राखला पाहिजे. त्यामुळे अशा अन्नाचा आहारात समावेश करा जेणेकरून तुम्हाला पूर्ण पोषण मिळेल. यासाठी पुरुषांनी त्यांच्या आहारात हिरव्या भाज्या, संपूर्ण धान्य आणि कमी चरबीयुक्त पदार्थांचे सेवन करावे.

अधिक वाचा  : महाकाय अजगरानं 54 वर्षाच्या महिलेला दोन तासात गिळलं

व्यायाम-
व्यायाम हा तुमच्या दिनचर्येचाच भाग असला पाहिजे. फिट राहण्यासाठी नियमितपणे व्यायाम केलाच पाहिजे. व्यायामामुळे व्यक्ती अनेक आजारांपासून दूर राहते. नियमित व्यायाम केल्यास हृदयरोग आणि अनेक आजार टाळता येतात. यासोबतच व्यायामामुळे मधुमेह, कॅन्सर आणि तणावही नियंत्रित राहतो. त्यामुळे पुरुषांनी व्यायामासाठी आणि रोज व्यायामासाठी वेळ काढलाच पाहिजे.

सकारात्मक मानसिक स्थिती
तुमच्या मनाचा आणि तुमच्या तंदुरुस्तीचा थेट संबंध असतो. जर तुम्हाला स्वतःला निरोगी आणि तंदुरुस्त ठेवायचे असेल तर तुम्ही नेहमी तणावमुक्त राहिले पाहिजे. तणावमुक्त राहण्यासाठी तुम्ही जिममध्ये जाऊन वर्कआउट करू शकता. अगदी 30 मिनिटे चालून तुम्ही तणावमुक्त राहू शकता. तुमच्या माहितीसाठी शारीरिक हालचालींमुळे मूड चांगला राहतो तसेच तुम्ही नेहमी तणावमुक्त राहता. तुमचे तणावाचे चांगले व्यवस्थापन केल्यास तुमची मनस्थिती योग्य राहते आणि परिणामी तुम्ही तंदुरुस्त राहता.

अधिक वाचा  : आज तुळशीचे पानं तोडणं आहे महापाप, जाणून घ्या कारण

बदललेल्या जीवनशैलीमुळे आरोग्याचा प्रश्न गुंतागुंतीचा झाला आहे. कोरोनानंतर तर आरोग्याचा प्रश्न सर्वांच्याच ऐरणीवर आला आहे. आपल्या जीवनशैलीत योग्य ते बदल करून तंदुरुस्त राहता येते. अर्थात यासाठी नियमितपणे आणि शिस्तबद्धपणे प्रयत्न करणे आवश्यक ठरते.

(Disclaimer : प्रस्तुत लेखात सुचविलेल्या टिप्स आणि सल्ले फक्त सामान्य माहितीसाठी आहेत आणि त्यांचा व्यावसायिक वैद्यकीय सल्ला म्हणून अर्थ लावला जाऊ नये. कोणत्याही प्रकारचे फिटनेस प्रोग्राम सुरू करण्यापूर्वी किंवा आपल्या आहारात कोणतेही बदल करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी