Tomato Fever : जगभरात गेल्या तीन वर्षात कोरोना व्हायरल धुमाकूळ घालत आहे. पहिली दोन वर्ष लढल्यानंतर कोरोनाचा (Corona) प्रभाव काहीसा ओसरू लागला होता. त्यानंतर लगेचच मंकीपॉक्सच्या (Monkeypox) साथीनं धुमाकूळ घालायला सुरुवात केला होता. त्यानंतर आता आणखी एका नव्या व्हायरसनं भारतात एन्ट्री केली असून ‘टोमॅटो फिव्हर’ (Tomato Fever) नावाच्या या व्हायरसचे रुग्ण आढळू लागले आहेत. हँड फूट माऊथ डिसिज (HFMD) असं या आजाराचं नाव असून त्याला टोमॅटो फिव्हर या नावानंही ओळखलं जात आहे. हा ताप लहान मुलांमध्ये (Children) सर्वाधिक वेगानं पसरत असल्यामुळे आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांची चिंता वाढली आहे. लँसेट रेस्पिरेटरी जर्नलच्या अभ्यासानुसार 6 मे 2022 रोजी या आजाराचा पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर आतापर्यंत या आजाराचे 82 रुग्ण भारतात आढळून आले आहेत. पाच वर्षे वयापेक्षा लहान मुलं आणि रोगप्रतिकारक शक्ती (Immunity) कमजोर असणाऱ्या नागरिकांना हा व्हायरल पकडत असून त्यांना या आजाराची लक्षणं पटकन दिसू लागत असल्याचं दिसून आलं आहे.
टोमॅटो फिव्हर आणि कोव्हिडच्या विषाणू यांच्यात बऱ्याच बाबतीत साम्य असल्याचं दिसून आलं आहे. परंतु हा व्हायरस SARS-Cov-2 शी संबंधित मात्र नाही. हा पूर्णपणे वेगळा व्हायरस आहे. चिकुनगुनिया किंवा डेंग्यु होऊन गेल्यानंतर बहुतांश मुलांना टोमॅटो फिव्हरचा व्हायरसची बाधा होत असल्याचं दिसून आलं आहे. पूर्ण अंगभर लाल रंगाचे फोड उठतात आणि ते दुखू लागतात. हे फोड टोमॅटोसारखे दिसत असल्यामुळेच याला टोमॅटो फ्लू असं नाव पडलं आहे.
लँसेटच्या रिपोर्टनुसार लहान मुलांना या विषाणूपासून सर्वाधिक धोका आहे. लहान मुलांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्यामुळे वेगाने हा विषाणू त्यांच्या शरीरावर ताबा मिळवत असल्याचं दिसतं. अर्थात हा आजार वेगाने पसरत असला तरी तो जीवघेणा नसल्याचं डॉक्टर सांगतात.
अधिक वाचा - Weight Loss Tips in Marathi : वजन कमी करण्यासाठी अशा प्रकारे पाळा खाण्याच्या वेळा, झटपट होईल वजन कमी
टोमॅटो फ्लूची लक्षणं ही डेंग्यु किंवा चिकुनगुनियासारखीच असतात. जोरदार ताप येणे, अंगावर चट्टे उठणे, सांधे सुजणे, डिहायड्रेशन यासारखी लक्षणं या आजारात दिसतात. अंगदुखी, थकवा आणि ताप ही लक्षणंही टोमॅटो फ्लूची असू शकतात. अनेकदा जवळपास टोमॅटोच्या आकाराएवढे फोड शरीरावर उठण्याची शक्यता असते.
स्वच्छता राखणे हा या आजारापासून वाचण्याचा सर्वोत्तम मार्ग असल्याचं डॉक्टर सांगतात. पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना याची लागण झाली तर त्याचे गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते. जर कुणाला या तापाची लक्षणं दिसली तर तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधण्याचा सल्ला दिला जातो. ज्या प्रकारची लक्षणं या आजारात दिसतात, त्यानुसार रुग्णावर उपचार केले जातात. त्याचप्रमाणे अधिकाधिक पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो.
अधिक वाचा - Digestion Tips : स्वादिष्ट आहे म्हणून जास्त खाल्ले...आता बिघडले पोट, मग या 5 किचन टिप्सने सांभाळा पचनक्रिया
डिस्क्लेमर - टोमॅटो फिव्हरची ही सामान्यतः दिसणारी लक्षणं आणि उपाय आहेत. तुम्हाला यासंबंधी काही गंभीर समस्या असतील, तर डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घेण्याची गरज आहे.