टोमॉटो ज्यूसमुळे तुमचं शरीर होईल मजबूत, कोरोना काळात आहे फायदेशीर

कोरोनाची दुसरी लाट जबरदस्त असून या लाटेत लाखो जणांना आपल्या विळख्यात घेतले आहे. या व्हायरसपासून वाचण्यासाठी लोकांना साबणाने हात धुण्यास आणि नेहमी मास्क वापरण्यास सांगितले जात आहे.

Tomato juice will make your body stronger
टोमॉटो ज्यूसमुळे तुमचं शरीर होईल मजबूत  |  फोटो सौजन्य: Indiatimes

थोडं पण कामाचं

  • रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी फायदेशीर आहे
  • घरात सहज उपलब्ध होतो टोमॉटो
  • टॉमॉटोमध्ये व्हिटॉमीन सी असतं मुबलक

नवी दिल्ली : कोरोनाची दुसरी लाट जबरदस्त असून या लाटेत लाखो जणांना आपल्या विळख्यात घेतले आहे. या व्हायरसपासून वाचण्यासाठी लोकांना साबणाने हात धुण्यास आणि नेहमी मास्क वापरण्यास सांगितले जात आहे. यासह शरिरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यावर भर देण्यात आला आहे. कारण इम्युनिटी वाढल्यानंतरच आपण कोरोनाला पराभूत करु शकणार आहोत. दरम्यान आज आम्ही तुम्हाला इम्युनिटी वाढवणाऱ्या ज्यूसविषयी सांगणार आहोत. हा ज्यूस टोमॉटोपासून तयार केला जातो. अनेक लोकांना सर्दी, खोकला, ताप नेहमी येत असतो. कारण त्या लोकांची रोगप्रतिकारक शक्ती कमजोर असते. यामुळे ज्या लोकांची रोगप्रतिकारक शक्ती कमजोर असेल त्यांच्यासाठी हा टोमॉटो ज्यूस खूप फायदेशीर ठरेल.

टोमॉटोचा रस (ज्यूस) बनवण्यासाठी लागणारे साहित्य

एक कप पाणी
एक चिमटी मीठ
दोन टोमॉटो  

कसे बनवणार टोमॉटो रस(ज्यूस)

  • सर्वात आधी टोमॉटोला पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. 
  •  टोमॉटोचे बारीक कापून घ्या.
  • त्यानंतर टोमॉटोला एका ज्यूसरमध्ये किंवा मिक्सर मध्ये टाकून द्या.
  • आता ज्यूसरमध्ये एक कप पाणी टाकून ४ ते ५ मिनीट पर्यंत ज्यूसर चालवा.  
  • तयार झालेला ज्यूस एका ग्लासमध्ये काढून घ्या, त्यात मीठ टाका.

काय आहे टोमॉटो ज्यूसचा फायदा

टोमॉटोमध्ये व्हिटॉमीन सी अधिक प्रमाणात असते. हे शरिरात अॅण्टी ऑक्सीडेंट काम करते. अँण्टी ऑक्सीडेंट एक्टीव्हिटी प्रमाणे काम करत असल्याने रोगप्रतिकारक क्षमता मजबूत करण्यासाठी खूप फायदेशीर असतं. या कोरोना काळात हे ज्यूस खूप गुणकारी ठरणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी