Tongue color: जिभेचा रंग सांगतो तुमच्या आरोग्याची स्थिती, वाचा कुठल्या रंगाचा काय अर्थ

Health condition: तुमची तब्येत ठिक नसेल आणि डॉक्टरांकडे गेल्यावर सर्वप्रथम तुमची जीभ तपासली जाते. याच कारण म्हणजे तुमच्या जीभेचा रंग तुमच्या आरोग्याची स्थिती बद्दल सांगतो.

Representative Image
प्रातिनिधिक फोटो (Photo: iStock) 

Tongue color: आपली तब्येत ठिक नसल्यावर आपण ज्यावेळी डॉक्टरांकडे जातो त्यावेळी डॉक्टर टॉर्चच्या सहाय्याने सर्वप्रथम आपली जीभ तपासतात. याचं कारण म्हणजे आपल्या जीभेच्या रंगावरुन आरोग्याची स्थिती दर्शवली जाते. आपल्या जिभेचा रंग आरोग्याविषयी बरेच काही सांगून जातो. आपली जीभ नेहमी गुलाबी नसते. जेव्हा तुम्ही आजारी असता त्यावेळी जिभेचा रंग बदललेला असतो. जाणून घेऊयात जिभेचा रंग आपल्या आरोग्याविषयी काय दर्शवतो. 

गुलाबी असेल तर...

जर आपली जीभ गुलाबी असेल आणि तिच्यावर पांढऱ्या रंगाचा लेप असेल तर ते नैसर्गिक आणि निरोगी जीभ / आरोग्याचे लक्षण आहे. 

पांढरा किंवा राखाडी असेल तर...

आपल्या जीभेवर सहसा पांढरा रंगाचा थर असतो पण जर तुमची जीभ जास्तच पांढरी दिससत असेल तर तुमच्या शरीरात इन्फेक्शन हे त्यामागचं कारण असू शकते. जर तुम्हाला ल्युकोप्लाकियाचा त्रास जाणवत असेल तर जीभेवर पांढऱ्या रंगाचे डाग देखील असण्याची शक्यता असते. अनेकदा धूम्रपान करणारे व्यक्ती किंवा तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणाऱ्या व्यक्तींना ल्युकोप्लाकिया होतो.

अधिक वाचा : Child Health Care: मुलांच्या Breakfastमध्ये 'या'गोष्टींचा समावेश करा, मिळतील भरपूर फायदे

जांभळा

जर तुमच्या जिभेचा रंग जांभळा असेल तर त्याचा अर्थ तुमच्या शरीरात रक्ताभिसरण नीट होत नाही. फुफ्फुस किंवा ह्रदयाशी संबंधित समस्यांमुळे रक्त संचरण खराब होऊ शकते. जर तुम्हाला ह्रदयविकाराचा त्रास असेल तर तुम्हाला दीर्घकाळ जांभळी जीभ दिसते. 

लाल रंगाची जीभ

जर तुमच्या जीभेचा रंग लाल असेल आणि सातत्याने सुजलेली जाणवत असेल तर त्याला वैद्यकीय भाषेत स्ट्रॉबेरी टंग असंही म्हटलं जातं. हे सहसा रक्त विकार किंवा ह्रदयाच्या समस्यांकडे इशारा करते.

पिवळा रंग असेल तर...

जर तुमच्या जिभेचा रंग पिवळा असेल तर त्याचा अर्थ असा होऊ शकतो की, तुम्हाला पोटाशी संबंधित काही समस्या आहेत. जर तुम्हाला पचन किंवा वायूचा त्रास होत असेल तर तुमच्या जीभेचा रंग पिवळसर होऊ शकतो.

(Disclaimer: हा मजकूर इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे लिहिण्यात आलेला आहे. टाइम्स नाऊ मराठी याची पुष्टी करत नाही.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी