शरीरातील ऑक्सिजनची पातळी वाढवणारे दहा पदार्थ

दहा पदार्थ शरीरातील ऑक्सिजनची पातळी वाढवण्यासाठी मदत करतात. आपण या पदार्थांचे नियमित आणि मर्यादेत सेवन केल्यास शरीरातील ऑक्सिजनची आवश्यक ती पातळी राखणे सोपे जाईल.

Top 10 Foods Rich In Oxygen
शरीरातील ऑक्सिजनची पातळी वाढवणारे दहा पदार्थ 

थोडं पण कामाचं

 • शरीरातील ऑक्सिजनची पातळी वाढवणारे दहा पदार्थ
 • अ, क आणि ड जीवनसत्व असलेले अनेक पदार्थ शरीरातील ऑक्सिजनची पातळी वाढवण्यासाठी लाभदायी
 • एखाद्या पदार्थाची अॅलर्जी असल्यास अथवा डॉक्टरांनी तो पदार्थ आपल्याला वर्ज्य करण्यास सांगितले असल्यास त्याचे सेवन टाळा

मुंबईः देशात कोरोना रुग्णांमुळे निर्माण झालेल्या ऑक्सिजनच्या संकटाची तीव्रता हळू हळू कमी होत आहे. पण कोरोना रुग्णांसाठी शरीरातील ऑक्सिजनची पातळी महत्त्वाची असल्याचे या निमित्ताने लक्षात आले. याच कारणामुळे अनुभवी डाएटिशिअनने सुचवलेले दहा पदार्थ आज सांगत आहोत. हे दहा पदार्थ शरीरातील ऑक्सिजनची पातळी वाढवण्यासाठी मदत करतात. आपण या पदार्थांचे नियमित आणि मर्यादेत सेवन केल्यास शरीरातील ऑक्सिजनची आवश्यक ती पातळी राखणे सोपे जाईल. Top 10 Foods Rich In Oxygen

शरीरातील ऑक्सिजनची पातळी वाढवणारे दहा पदार्थ - 

 1. काळे चणे किंवा काळे वाटाणे - काळे चणे किंवा काळे वाटाणे शरीराला लोह मिळवून देतात. तसेच शरीरातील ऑक्सिजनची पातळी वाढवण्यासाठी मदत करतात. 
 2. संत्र - संत्र या फळात क जीवनसत्व (सी व्हिटॅमिन), अँटीऑक्सिडंट आणि तंतूमय पदार्थ (फायबर) मुबलक असतात. यामुळे संत्र चावून सावकाश आणि व्यवस्थित खावे. नियमित आणि मर्यादेत केलेले संत्र्याचे सेवन पचन सुधारण्यास तसेच शरीरातील ऑक्सिजनची पातळी वाढवण्यासाठी मदत करते. संत्र हे फळ शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी उपयुक्त आहे. कोरोना होऊ नये यासाठी दररोज किमान एक संत्र खा.
 3. टरबूज - टरबूज या फळात भरपूर पाणी असते. शरीरासाठी हे पाणी लाभदायी आहे. टरबूज खाल्ल्ल्यास अ जीवनसत्व (ए व्हिटॅमिन) मिळते. शरीरातील रक्ताची कमतरता दर होण्यास मदत होते. शरीरातील ऑक्सिजनची पातळी वाढवण्यासाठी मदत मिळते.
 4. स्ट्रॉबेरी - अँटीऑक्सिडंट आणि पॉलीफेनोल गुण तसेच क जीवनसत्व (सी व्हिटॅमिन) यामुळे स्ट्रॉबेरी शरीरासाठी लाभदायी आणि ऑक्सिजनची पातळी वाढवण्यासाठी उपयुक्त आहे. स्ट्रॉबेरी हे फळ शारीरिक ऊर्जा वाढवण्यासाठी सहाय्यक आहे. कोरोनासह अनेक आजार दूर ठेवण्यासाठी स्ट्रॉबेरी या फळाचे नियमित आणि मर्यादीत सेवन लाभाचे आहे.
 5. सफरचंद - अँटीऑक्सिडंट गुण असलेले सफरचंद अनेक आजारांपासून दूर ठेवण्यास मदत करते. शरीरातील नव्या कोशिकांच्या निर्मितीसाठी आवश्यक पोषक तत्व सफरचंद या फळाच्या सेवनाने मिळतात. शारीरिक ऊर्जा वाढवण्यासाठी तसेच ऑक्सिजनची पातळी वाढवण्यासाठी हे फळ नियमित आणि मर्यादीत प्रमाणात खाणे हिताचे आहे.
 6. किवी - शरीराची पचनक्षमता वाढवण्यासाठी आणि सुधारण्यासाठी किवी हे लाभदायी फळ आहे. या फळातून मिळणारे क जीवनसत्व (सी व्हिटॅमिन) सर्दी, पडसे अशा अनेक आजारांपासून रक्षण करते आणि शरीराची ऑक्सिजनची पातळी वाढवण्यासाठी लाभदायी आहे.
 7. आंबा - अ जीवनसत्व (ए व्हिटॅमिन) आंबा या फळातून मिळते. उन्हाळ्याच्या दिवसात मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असलेल्या आंबा या फळाचे नियमित आणि मर्यादीत सेवन केल्यास रोगप्रतिकारक क्षमता वाढते. शरीराची ऑक्सिजनची पातळी वाढवण्यासाठी आंबा हे एक उत्तम फळ आहे.
 8. आवळा - क जीवनसत्व (सी व्हिटॅमिन) तसेच अँटीऑक्सिडंट मिळत असल्यामुळे दररोज आवळा खावा. आवळा रोगप्रतिकारक क्षमता आणि शरीराची ऑक्सिजनची पातळी वाढवण्यासाठी उपयुक्त आहे. 
 9. भाजलेले जिरे - भाजलेल्या जिऱ्याचे नियमित आणि मर्यादीत सेवन केल्यास शरीराला लोह मिळते. शरीरातील रक्ताची कमतरता दूर होण्यासाठी तसेच ऑक्सिजनची पातळी वाढवण्यासाठी भाजलेले जिरे चावून सावकाश खावे.
 10. ड जीवनसत्व असलेले पदार्थ - दूध, अंड असे ड जीवनसत्व असलेले पदार्थ ऑक्सिजनची पातळी वाढवण्यासाठी लाभदायी आहेत. उकळवलेले अंडे आणि दूध यांचे एकत्रित सेवन करणे हिताचे आहे पण कच्चे अंडे आणि दूध यांचे एकत्रित सेवन हानीकारक आहे.

लक्षात ठेवा - अ, क आणि ड जीवनसत्व असलेले अनेक पदार्थ शरीरातील ऑक्सिजनची पातळी वाढवण्यासाठी लाभदायी आहेत. पण या पदार्थांचे मर्यादेत सेवन करा. एखाद्या पदार्थाची अॅलर्जी असल्यास अथवा डॉक्टरांनी तो पदार्थ आपल्याला वर्ज्य करण्यास सांगितले असल्यास त्याचे सेवन टाळा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी