Curry Leaves Benefits: गुणकारी कढीपत्ता...फक्त चवीसाठीच उपयोग नाही तर आरोग्यासाठीहा महत्त्वाचा, पाहा हे 5 अद्भूत फायदे

Health Tips : भारतीय स्वयंपाकघरात कढीपत्ता (Curry Leaves) मोठ्या प्रमाणावर वापरला जातो. विशेषत: बहुतेक दक्षिण भारतीय पदार्थात कढीपत्त्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. कढीपत्त्यामुळे पदार्थाला एक वेगळीच चव येते. कढीपत्त्याच्या वापराने कोणत्याही पदार्थाची चव सुधारली जाऊ शकते. कढीपत्त्याचे उपयोग आरोग्यासाठीदेखील मोठे असतात. कढीपत्त्याच्या सेवनाने अनेक आजार टाळता येतात.

Benefits of curry leaves
कढीपत्त्याचे विविध फायदे 
थोडं पण कामाचं
  • भारतीय स्वयंपाकघरात कढीपत्त्याचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो
  • कढीपत्त्यामुळे पदार्थाला एक वेगळीच चव येते
  • कढीपत्ता हा आरोग्यासाठीदेखील (Health) प्रचंड उपयोगी

Curry Leaves Benefits for health : नवी दिल्ली : भारतीय आहारशास्त्र हे फक्त चवीसाठीच नाही तर आरोग्यासाठी देखील प्रसिद्ध आहे. भारतीय पदार्थ बनवताना रुचकरपणा, सुगंध, पाचनक्रिया, हवामान यांचा विचार केलेला असतो. मात्र इतकेच नाही तर भारतीय आहारात आरोग्याचाही मोठा विचार केलेला असतो. पदार्थ बनवताना वापरले जाणारे मसाले, इतर पदार्थ यांच्या गुणधर्मांचा विचार केलेला असतो. पदार्थ बनवताना कढीपत्त्याचा केला जाणारा वापर हादेखील आरोग्यवर्धक असतो.  भारतीय स्वयंपाकघरात कढीपत्ता (Curry Leaves) मोठ्या प्रमाणावर वापरला जातो. विशेषत: बहुतेक दक्षिण भारतीय पदार्थात कढीपत्त्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. कढीपत्त्यामुळे पदार्थाला एक वेगळीच चव येते. कढीपत्त्याच्या वापराने कोणत्याही पदार्थाची चव सुधारली जाऊ शकते. बरेच लोक ते बाजारातून विकत घेतात, तर काहीजण घरी भांड्यात वाढवतात. मात्र कढीपत्ता हा काही फक्त चवदार पदार्थ बनवण्याच्याच उपयोगाचा नाही. कढीपत्ता हा आरोग्यासाठीदेखील (Health) प्रचंड उपयोगी असतो. कढीपत्त्याचे फायदे जाणून घेऊया. (Top 5 benefits of Curry Leaves for health and to avoid diseases)

अधिक वाचा : ठाकरेंच्या घरात भूकंप, काकांना सोडून पुतणे शिंदेंच्या तंबूत!

कढीपत्ता हा आरोग्याचा खजिना 

कढीपत्त्यात फॉस्फरस, कॅल्शियम, लोह, तांबे, जीवनसत्त्वे आणि मॅग्नेशियम सारखे पोषक घटक आढळतात, जे शरीराला अनेक प्रकारे फायदेशीर ठरतात. रोज सकाळी 3 ते 4 हिरवी पाने चघळल्यास त्याचा कसा फायदा होतो ते जाणून घेऊया. बरेच लोक ते बाजारातून कढीपत्ता विकत घेत असतात तर काहीजण आपल्या घरा जवळच्या परसबागेत याचे झाड लावत असतात. दरम्यान आज आपण कढीपत्ताचे पान आपल्या आरोग्यासाठी कसे चांगले आहे, याबद्दल जाणून घेणार आहोत. कढीपत्ता हा आरोग्याचा खजिना आहे

कढीपत्त्यात फॉस्फरस, कॅल्शियम, लोह, तांबे, जीवनसत्त्वे आणि मॅग्नेशियम सारखे पोषक घटक आढळतात, जे शरीराला अनेक प्रकारे फायदेशीर ठरतात. रोज सकाळी 3 ते 4 हिरवी पाने चघळल्यास त्याचा कसा फायदा होतो ते जाणून घेऊया... 

अधिक वाचा : Rohit Sharma: टीम इंडियाच्या शानदार कामगिरीनंतरही भडकला रोहित, म्हणाला -

कढीपत्त्याचे जबरदस्त फायदे जाणून घ्या-

1. मधुमेहासाठी उपयुक्त
मधुमेहाच्या रूग्णांना अनेकदा कढीपत्ता चावण्याचा सल्ला दिला जातो कारण त्यात रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करणारे हायपोग्लाइसेमिक गुणधर्म असतात.

2. डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायद्याचा
कढीपत्ता खाल्ल्याने, रातांधळेपणा किंवा डोळ्यांशी संबंधित इतर अनेक रोगांचा धोका टळतो कारण त्यात आवश्यक पोषक व्हिटॅमिन ए आढळते जे दृष्टी वाढवण्यास मदत करते.

अधिक वाचा : CM Shinde: मंत्रालयात सत्यनारायण पूजा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अडचणींमध्ये वाढ

3. वजन कमी करण्यासाठी उपयुक्त
कढीपत्ता चघळल्याने वजन आणि पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते कारण त्यात इथाइल एसीटेट, महानिम्बाइन आणि डायक्लोरोमेथेन सारखे पोषक घटक असतात.

4. संसर्ग टाळता येतात
कढीपत्त्यात अँटीफंगल आणि अँटीबायोटिक गुणधर्म आढळतात, ज्यामुळे अनेक प्रकारच्या संसर्गापासून बचाव होतो आणि रोगांचा धोका टळतो.

5. पचन चांगले होईल
कढीपत्ता रोज सकाळी रिकाम्या पोटी चावावा कारण यामुळे पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठता, ऍसिडिटी, फुगणे यासह पोटाच्या सर्व समस्यांपासून सुटका मिळते.

(Disclaimer : प्रस्तुत लेखात सुचविलेल्या टिप्स आणि सल्ले फक्त सामान्य माहितीसाठी आहेत आणि त्यांचा व्यावसायिक वैद्यकीय सल्ला म्हणून अर्थ लावला जाऊ नये. कोणत्याही प्रकारचे फिटनेस प्रोग्राम सुरू करण्यापूर्वी किंवा आपल्या आहारात कोणतेही बदल करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी