Retinol Cream मुळे चेहऱ्यावरील वृद्धत्वाची लक्षणे होतील कमी, चेहरा दिसेल तजेलदार

तब्येत पाणी
Updated Apr 07, 2023 | 11:43 IST | टाइम्स नाऊ मराठी

Retinol Cream चेहऱ्यासाठी चांगले मानले जाते. म्हातारपणी, स्त्रिया चेहऱ्यासाठी अशा क्रीम्स लावायला सुरवात करतात. ज्यामुळे सुरकुत्या, बारीक रेषा, वृद्धत्वाची लक्षणे कमी होऊ शकतात. वृद्धत्वाची लक्षणे बर्‍याच प्रमाणात कमी करण्यासाठी रेटिनॉल क्रीम अधिक चांगली मानली जाते.

Rekha and Hema malini Retinol Cream For Skin Care
Retinol Cream मुळे चेहऱ्यावरील वृद्धत्वाची लक्षणे होतील कमी, चेहरा दिसेल तजेलदार  |  फोटो सौजन्य: Facebook
थोडं पण कामाचं
  • Retinol Cream चेहऱ्यासाठी चांगले मानले जाते.
  • वृद्धत्वाची लक्षणे कमी करण्यासाठी रेटिनॉल क्रीम
  • स्किन केअर क्रीमचा रात्री वापर करणे फायदेशीर ठरू शकते.

Retinol Cream For Skin Care: Retinol Cream चेहऱ्यासाठी चांगले मानले जाते. म्हातारपणी, स्त्रिया चेहऱ्यासाठी अशा क्रीम्स लावायला सुरवात करतात.  ज्यामुळे सुरकुत्या, बारीक रेषा, वृद्धत्वाची लक्षणे कमी होऊ शकतात. वृद्धत्वाची लक्षणे बर्‍याच प्रमाणात कमी करण्यासाठी रेटिनॉल क्रीम अधिक चांगली मानली जाते. जर तुम्हाला तुमच्या स्किन केअर रुटीनमध्ये रेटिनॉल क्रीम समाविष्ट करायची असेल, तर तुम्ही येथे दिलेली यादी पाहू शकता. यामध्ये आम्ही तुम्हाला काही ब्रॅंडेड रेटिनॉल क्रीम सडेस्ट करत आहोत. या क्रीममुळे डाग, बारीक रेषा कमी होतात तसेच त्वचा तरुण बनते. या स्किन केअर क्रीमचा रात्री वापर करणे फायदेशीर ठरू शकते. (Top Branded Retinol Cream For Skin Care)

Conscious Chemist Multi Peptide Retinol Face Cream

हे मल्टी पेप्टाइड लाइटवेट जेल क्रीम आहे. ही क्रीम अमीनो ऍसिड, ऑलिव्ह ऑइल, हायलुरोनिक ऍसिड यासारख्या सक्रिय घटकांपासून बनविली जाते. त्वचेला मॉइश्चरायझिंग करून ती नितळ, तरुण बनवण्यातही मदत होते. या क्रीमची  डर्मेटोलॉजिकली टेस्‍ट केली जाते.

  • फ्रेंगरेंस फ्री आहे
  • ऑल स्‍किन टाइप 
  • 50 मिली पॅक

या क्रीममध्ये वृद्धत्वविरोधी गुणधर्म आहेत, जे वृद्धत्वाची लक्षणे कमी करण्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. हे पुरुषांबरोबरच स्त्रिया देखील वापरू शकतात. 

अधिक वाचा: Weight Lose Tips: वजन कमी करण्यासाठी फॉलो करा हाय प्रोटीन फूड डाएट प्लॅन

Minimalist 2% Retinoid Anti Ageing Night Cream

जर तुम्हाला तुमच्या त्वचेची विशेष काळजी घ्यायची असेल तर तुम्ही ही क्रीम वापरू शकता. ही क्रीम 30 मिलीच्या पॅकमध्ये उपलब्ध आहे, जी तुम्ही रात्री लावू शकता. यामुळे बारीक रेषा, सुरकुत्या, वृद्धत्वाची चिन्हे यासारख्या समस्यांपासून आराम मिळू शकतो.

  • स्‍किन यंगर 
  • स्किन  मॉइश्चरायझिंग 
  • डर्मेटोलॉजिकली टेस्‍टेड

ही रेटिनॉल स्किन केअर क्रीम सिलिकॉन, पॅराबेन आणि फ्रेंगरेंस फ्री आहे. यामुळे तुमच्या त्वचेला ग्लो येण्यासोबतच चांगला परिणाम मिळू शकतो. हे क्रीम सर्व प्रकारच्या त्वचेसाठी सुरक्षित असेल.

अधिक वाचा:  D Tan Pack: टॅनिंगमुळे त्वचा काळी झाली असेल तर घरी तयार करा डी टॅन फेस पॅक

Pilgrim Korean Retinol Anti Aging Night Cream

 

त्वचेचा टोन करण्यासाठी तुम्ही ही क्रीम वापरू शकता. ही क्रीम खास महिलांसाठी बनवली आहे. त्यात रेटिनॉलसह हायलुरोनिक अ‍ॅसिड आणि व्हिटॅमिन सी सारखे घटक असतात. ही क्रीम त्वचेचा पोत सुधारू शकते.

  • अल्ट्रा हायड्रेटिंग क्रीम
  • नैसर्गिक घटकांचा वापर
  • पॅराबेन फ्री आहे

ही क्रीम रोज लावल्याने तुमची त्वचा सुरकुत्या मुक्त होऊ शकते आणि बारीक रेषा देखील बर्‍याच प्रमाणात कमी होऊ शकतात. त्वचेला हायड्रेट ठेवण्यास देखील हे मदत करू शकते.

WOW Skin Science Retinol Face Cream

ही कोरफड, शिया बटर आणि आर्गन ऑइल सारख्या घटकांसह बनविलेले अँटी रेटिनॉल क्रीम आहे. ही क्रीम लावल्याने तुमची त्वचा हायड्रेट राहते तसेच पोषणही मिळते. या क्रीमची डर्मेटोलॉजिकली टेस्टे केली जाते, तसेच ते पॅराबेन, सिलिकॉन आणि ऑइल फ्री आहे.

  • 50 मिली पॅक
  • सर्व त्वचेसाठी योग्य
  • टॉप यूजर रेटिंग 

हे क्रीम त्वचेवर लावल्याबरोबर लगेच शोषले जाते. ही क्रीम रोज लावल्याने तुम्हाला चांगले परिणाम मिळू शकतात. हे क्रीम त्वचेवरील मृत पेशींचा थर काढून टाकण्यास मदत करते.

अधिक वाचा: Wheatgrass Juice : व्हीट ग्रास ज्यूसने करा दिवसाची हेल्थी सुरुवात, होतील अनेक फायदे

Plum 0.5% Retinol Renewing Night Cream


जर तुम्हाला तुमच्या त्वचेमद्ये कोलेजन वाढवायचे असेल तर तुम्ही हे रेटिनॉल स्किन केअर क्रीम वापरू शकता. ही क्रीम त्वचेवरील सुरकुत्या आणि बारीक रेषा कमी करण्यासोबतच त्वचेचा पोत सुधारू शकते.

  • 100% व्हेगन क्रीम आहे
  • FDA अप्रूव्‍ह
  • 50 ग्रॅम पॅक

तुम्ही ही क्रीम फक्त रात्रीच वापरू शकता, ज्यामुळे त्वचा रात्रभर मुलायम होऊ शकते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी