Hair Care Tips: पुरुषांनी केसगळती थांबवण्यासाठी करावे हे सोपे घरगुती उपाय...कधीही पडणार नाही टक्कल!

Health Tips : केस हे आपल्या व्यक्तिमत्त्वातील अत्यंत महत्त्वाची बाब असते. सुंदर, मुलायम, दाट, काळेभोर केस (Beautiful Hair) असल्यास कोणाचेही व्यक्तिमत्त्व खुलून येते. मात्र अलीकडच्या काळात केसांच्या समस्यांनी (Hair Problems) उग्र रुप धारण केले आहे. अर्थात ही समस्या पुरुष आणि महिला दोघांमध्येही आढळून येते. आपल्या सगळ्यांनाच वाटते की गळणाऱ्या केसांमुळे फक्त महिलांनाच त्रास होतो. पण तसे नाही आजकाल पुरुषांनाही चुकीचा आहार, तणावामुळे केस गळण्याची (Hair Loss) समस्या भेडसावत आहे.

Hair Care tips for men
पुरुषांच्या केसगळतीवर घरगुती उपाय 
थोडं पण कामाचं
  • बदललेल्या जीवनशैलीमुळे केसांच्या समस्या वाढल्या
  • पुरुष आणि महिला दोघांनाही भेडसावतायेत केसांच्या समस्या
  • काही सोपे घरगुती उपाय केल्याने पडणार नाही टक्कल

Hair Loss Home Remedies For Male : नवी दिल्ली : केस हे आपल्या व्यक्तिमत्त्वातील अत्यंत महत्त्वाची बाब असते. सुंदर, मुलायम, दाट, काळेभोर केस (Beautiful Hair) असल्यास कोणाचेही व्यक्तिमत्त्व खुलून येते. मात्र अलीकडच्या काळात केसांच्या समस्यांनी (Hair Problems) उग्र रुप धारण केले आहे. अर्थात ही समस्या पुरुष आणि महिला दोघांमध्येही आढळून येते. आपल्या सगळ्यांनाच वाटते की गळणाऱ्या केसांमुळे फक्त महिलांनाच त्रास होतो. पण तसे नाही आजकाल पुरुषांनाही चुकीचा आहार, तणावामुळे केस गळण्याची (Hair Loss) समस्या भेडसावत आहे. अशा परिस्थितीत केस गळणे टाळण्यासाठी पुरुष विविध उपाय करतात. मात्र त्यानंतरही कोणताही परिणाम दिसून येत नाही. अशा परिस्थितीत तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही, काही घरगुती उपाय करून तुम्ही केसगळतीच्या समस्येपासून मुक्ती मिळवू शकता. चला जाणून घेऊया... (Top home remedies for the prevention of hair loss in men)

अधिक वाचा : Covid-19 Maharashtra Report । राज्यात कोरोनाचे इतके नवीन रुग्ण

केस गळती रोखण्यासाठी करा हे उपाय -

1. पेपरमिंट तेल (Peppermint Oil)

जर तुमचे केस सतत गळत असतील तर तुम्ही पेपरमिंट ऑइल वापरू शकता. पेपरमिंट तेल केसांच्या वाढीस मदत करू शकते. तुमच्या माहितीसाठी पेपरमिंट ऑइल स्कॅल्पमध्ये म्हणजे केसांखालील त्वचेमध्ये रक्ताभिसरण  गतिमान करण्याचे काम करते. एवढेच नाही तर केसांची वाढ होण्यास मदत होते. याशिवाय पुरुष नारळाचे तेल म्हणजे खोबरेल तेल, ऑलिव्ह ऑईल देखील वापरू शकतात.

अधिक वाचा : Lawn Bowls CWG 2022: लॉन बॉलमध्ये भारताने रचला इतिहास , महिला संघ 'फोर्स' च्या अंतिम फेरीत पोहोचून निश्चित केले पदक 

2. कांद्याचा रस (Onion Juice) 

हे सर्वज्ञात आहे की कांद्याचा रस केसांच्या वाढीसाठी एक अतिशय प्रभावी घरगुती उपाय आहे. केसांच्या मुळांवर कांद्याचा रस लावल्याने केसांची मुळे मजबूत होतात. यामुळे केस गळणे थांबते. एवढेच नाही तर कांद्याचा रस नवीन केस वाढण्यास मदत करतो.

3. तणाव कमी करा- (Stress Reduction)

पुरुषांमध्ये केस गळण्याचे कारण तणाव हे देखील असू शकते. जर तुमचे केस गळत असतील तर तणाव आणि काळजी घेणे थांबवा. तणाव कमी करण्यासाठी तुम्ही रोज व्यायाम करता. यासोबतच चांगली झोप घेणे हा तणाव कमी करण्याचा उत्तम उपाय आहे.

अधिक वाचा : Optical Illusion: फोटोत अशा ठिकाणी लपला आहे मुलगा, समोर असूनही त्याला शोधणे अवघड

पावसाळा हा आपल्या केसांच्या आरोग्यासाठी सर्वात वाईट मानला जातो. हवामानातील आर्द्रतेमुळे केस तुटण्यास सुरुवात होते, त्यामुळे या ऋतूत केसांची चांगली काळजी घेणे (Hair care) खूप गरजेचे आहे. पावसाळ्यात केस वारंवार धुणे टाळा कारण टाळूवरील ओलावामुळे ते कोरडे आणि निर्जीव होतात आणि गळू लागतात. याशिवाय पावसात केस ओले झाले तरी आधी ते कोरडे होऊ द्या आणि तेल लावल्यानंतरच केस सौम्य शाम्पूने धुवा.

आरोग्यदायी आहार तुमच्या आरोग्यासाठी तसेच तुमच्या त्वचेसाठी आणि केसांसाठीही महत्त्वाचा आहे. या ऋतूत केसांना पोषण देणारे सुपरफूडच खावेत. अशा हवामानात जंक फूड आणि तेलकट पदार्थ टाळावेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी