Skin Care Tips: त्वचेवरील टॅन दूर करण्यासाठी 'हे' फ्रूट Face Pack अत्यंत फायदेशीर

तब्येत पाणी
Pooja Vichare
Updated Aug 15, 2022 | 13:23 IST

Skin Care: अनेक वेळा स्त्रिया त्वचेला टॅनिंगपासून वाचवण्यासाठी सूर्यकिरणांपासून स्वतः चा बचाव करतात. यासाठी त्या सनस्क्रीन वापरतात. मात्र काहीवेळा बराच वेळ बाहेर राहिल्याने त्याचा हवातसा फायदा होत नाही आणि टॅनिंग होतं. यामुळे तुमची त्वचा डल आणि पॅची दिसू लागते.

Skin Tips
फ्रूट फेस पॅक 
थोडं पण कामाचं
 • त्वचा हा आपल्या शरीराचा आणि व्यक्तिमत्त्वाचा महत्त्वाचा घटक आहे.
 • अनेक वेळा स्त्रिया त्वचेला टॅनिंगपासून वाचवण्यासाठी सूर्यकिरणांपासून स्वतः चा बचाव करतात.
 • टॅनिंगमुळे त्वचेचा टोनही वेगळा दिसण्यास सुरूवात होते. हे टाळण्यासाठी अनेक महिला ब्युटी ट्रीटमेंट (Beauty Treatment)घ्यायला लागतात.

मुंबई: Tan Removing Tips:  प्रत्येकाच्या दिनचर्येत त्वचेची काळजी  (Skin Care Tips)ही खूप महत्त्वाची भूमिका बजावत असते. त्वचा हा आपल्या शरीराचा आणि व्यक्तिमत्त्वाचा महत्त्वाचा घटक आहे.  त्यामुळे त्वचेची निगा (Skin Care) राखणे आवश्यक आहे. आजच्या जीवनशैलीत त्वचेची काळजी घेणे खूप गरजेचं झालं आहे. अनेक वेळा स्त्रिया त्वचेला टॅनिंगपासून वाचवण्यासाठी सूर्यकिरणांपासून स्वतः चा बचाव करतात. यासाठी त्या सनस्क्रीन वापरतात. मात्र काहीवेळा बराच वेळ बाहेर राहिल्याने त्याचा हवातसा फायदा होत नाही आणि टॅनिंग होतं. यामुळे तुमची त्वचा डल आणि पॅची दिसू लागते. 

टॅनिंगमुळे त्वचेचा टोनही वेगळा दिसण्यास सुरूवात होते. हे टाळण्यासाठी अनेक महिला ब्युटी ट्रीटमेंट (Beauty Treatment)घ्यायला लागतात. ज्यामध्ये कधीकधी अशी काही केमिकल वापरली जातात, ज्यामुळे त्वचेला नुकसान होते. अशा परिस्थितीत येथे जाणून घ्या असे काही फ्रूट फेस मास्क जे तुम्हाला टॅनिंग दूर (Tan Removing Tips) करण्यात मदत करतात.

अधिक वाचा-  स्वातंत्र्यदिनी बनवा टेस्टी तिरंगी ढोकळा, जाणून घ्या सोपी रेसिपी

पपई-मधाचा फेस मास्क 

पपई  (Papaya)आणि मधाचा फेस मास्क तुमच्या डल आणि पॅची त्वचेतून टॅन रिमूविंगसाठी खूप प्रभावी ठरतो. पपई त्वचेतील छिद्रे उघडतात आणि मध नैसर्गिक चमक देते. तसेच सूर्यप्रकाशापासून त्वचेचे रक्षण करते. हे तुमच्या त्वचेसाठी एक नैसर्गिक उत्पादन असल्याचं देखील सिद्ध होतं. 

अशा प्रकारे करा त्याचा वापर 

 • एक चमचा पपईचा लगदा आणि एक चमचा मध घ्या.
 • एका भांड्यात पपई मॅश करा, नंतर त्यात मध घाला.
 • आता दोन्ही मिक्स करून स्मूद पेस्ट बनवा
 • चेहरा पूर्णपणे स्वच्छ करा आणि नंतर हा पॅक त्वचेवर लावा.
 • सुमारे 15-20 मिनिटे चेहऱ्यावर राहू द्या.
 • आता हलके मसाज करताना चेहरा पाण्याने धुवा.

पपई-संत्र्याच्या ज्यूसचा पॅक

टॅन काढण्यासाठी हा सर्वोत्तम फेस पॅक मानला जातो. हा फेस पॅक सर्व प्रकारच्या त्वचेवर वापरता येतो.

असा बनवा पॅक 

 • सर्वात आधी पिकलेल्या पपईचा एक तुकडा आणि दोन चमचे संत्र्याचा ज्यूस घ्या.
 • पपई चांगली मॅश करा.
 • आता त्यात थोडा संत्र्याचा ज्यूस घाला.
 • चेहरा पूर्णपणे स्वच्छ करा आणि हा पॅक लावा.
 • सुमारे 30 मिनिटे तसंच ठेवा.
 • आता चेहऱ्याला हलका मसाज करत चेहरा धुवा.

स्ट्रॉबेरी आणि क्रीम फेस पॅक

 • प्रथम चार ते पाच स्ट्रॉबेरी आणि दोन चमचे दुधाची साय घ्या.
 • स्ट्रॉबेरी कुस्करून त्यात क्रीम टाका आणि मिक्स करा.
 • साधारण 20-30 मिनिटे चेहऱ्यावर पॅक ठेवा.
 • त्यानंतर चेहरा थंड पाण्याने नीट धुवा.

संत्र्याचा ज्यूस आणि दही फेस पॅक

संत्री हे असेच एक फळ आहे जे चेहरा चमकण्यासाठी खूप मदत करते. यामध्ये आढळणारे अँटिऑक्सिडंट गुणधर्म मेलेनिन कमी करतात. त्याच वेळी दही त्वचेला आर्द्रता देते आणि तिची लवचिकता देखील वाढवते.

अधिक वाचा- Google कडूनही 15 ऑगस्ट साजरा, सर्च इंजिन दिसलं रंगीबेरंगी रंगात; स्पेशल Doodle

असा बनवा फेस पॅक 

 • एक चमचा संत्र्याचा ज्यूस आणि एक चमचा दही घ्या.
 • संत्र्याचा ज्यूस आणि दही नीट मिक्स करून पेस्ट बनवा.
 • आता ही पेस्ट चेहऱ्यावर लावा.
 • साधारण अर्धा तास चेहऱ्यावर तसंच राहू द्या.
 • आता चेहरा पाण्याने नीट धुवा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी